Posts

कुंडमळा रांजनखळगे : एक उपेक्षित ठिकाण

Image
भटकंती अपरिचित धार्मिक व नेसर्गिक कुंडमळा  येथील  रांजणखळग्यांची कुंडमळा, ता: मावळ  जि: पुणे       आज पहाटे २६ जुलै २०२० रोजी तळजाई टेकडी सिंहगड रोड येथे  सुप्रभात फेरीसाठी गेलो होतो,  साधारणतः तिन किलोमिटर पर्यंत गेलो असताना सचिन मांढरे यांचा सकाळी  सव्वासात ला  फोन आला,आपणाला कुंडमळा या ठिकाणी जायचे आहे.नविन ठिकाण असल्याने मी लगेचच त्यांना होकार दिला, व सुप्रभात फेरी अर्धवट सोडून  माघारी फिरलो.सकाळी पावणे आठ वाजता टू व्हीलर वरुन प्रवास सुरु केला.सिंहगड रोड ने पुढे वडगाव वरुन मुंबई च्या दिशेने  हाईवेने प्रवासास सुरुवात केली.वारजे, कोथरुड, चांदणी  चौक, बावधन, बाणेर, सोमाटणे फाटा, घोराडेश्वर येथे  पोहचलो. घोराडेश्वर च्या समोरच्या बाजुला ,म्हणजे पुण्याहून आल्यानंतर उजवीकडच्या बाजुला बेगडेवाडी रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या फाट्या पासुन आत पुढे निघालो.हा संपूर्ण परिसर देहूरोड लष्करी तळाच्या हद्दीतून जातो, त्यामुळे जागोजागी चौक्या उभ्या केलेल्या दिसतात. या भागात फोटो काढण्यास मनाई आहे. थोड्याच वेळात बेगडेवाडी रेल्वे स्था...

भटकंती अपरिचित चिकना घाट वाटेची

Image
सह्याद्रि ट्रेकर्स फाउंडेशनच्या मावळ्यांकडून अपरिचित अशी चिकना घाट वाट मोहीम यशस्वी      किये गाव,      ता: महाड       जि: रायगड        महाराष्ट्रा च्या पश्चिम भागात अरबी समुद्राला समांतर ४०  ते ८० किलोमिटर  दक्षिनोत्तर सह्याद्रि पसरला आहे, यालाच पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. याचा विस्तार खुप लांबवर आहे. उत्तरेस तापि नदीच्या खोऱ्या  पासून, दक्षिनेस कन्याकुमारी पर्यन्त आहे.याची दक्षिनोत्तर लांबी १६०० किलोमिटर, तर  महाराष्ट्रातील लांबी  ४४० किलोमिटर  आहे. साधारणतः ऊंची ९००  ते १२००  मी.पर्यंत  आहे. या पर्वताचा पश्चिम उतार अतिशय त्रिव्र व पूर्व उतार एकदम मंद स्वरुपाचा आहे. सह्याद्रि ची रुंदी उत्तरेस जास्त व दक्षिनेस कमी आहे. तसेच उत्तरेस ऊंची जास्त व दक्षिनेस कमी आहे. सह्याद्री पर्वताची निर्मिति प्रस्तर भंग प्रक्रिये तुन झाली.या प्रक्रियेत दक्खन च्या पठाराचा पश्चिमे कडिल भाग मोठ्या प्रमाणात खचला त्याचबरोबर पश्चिम कीनारा व त्या लगतचा सागर तल मोठ्या प्रमाणात खचला. दक्खन च्या ...