Posts

Showing posts from December, 2021

आडवाटेवरची भटकंती : काळ भैरवनाथ मंदीर व सोनजाई मंदिराची

Image
सोनजाई डोंगर  ता : वाई  जि : सातारा  पायथ्याचे गाव बावधन धनगर वाडा : स.स.पासुन उंची ७३२ मी.(२४०१ फुट) मार्ग : पुणे-बंगलोर हाईवे-शिवापुर-कापूरहोळ-किकवी-सारोळा-पारगाव  खंडाळा-वाई फाटा-वाई सुरुर रोड-बावधन रोड-बावधन-सोनगिरवाडी रुरल-सोमजी नगर-बावधन धनगर वाडा. अंतर :  पुण्यापासुन ८६ किलोमिटर. वाई फाट्यापासुन ३९ किलोमिटर. स.स.पासुन डोंगराची उंची: ९३० मी.( ३०५० फुट) डोंगराची पायथ्यापासुन प्रत्यक्ष चढाई: १९८ मी.( ६५०  फुट)      सोनजाई डोंगर या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही वरिल दर्शविलेल्या मार्गाने चार चाकी वाहनाने प्रवासास सुरुवात करुन प्रथम,  बावधन येथील काळ भैरवनाथाचे  मुळ  स्थान असलेल्या मंदीरापाशी पोहचलो .या मंदिरापर्यत  जाण्यासाठी दगडातील पायरी मार्ग आहे. पायथ्याची उंची स.स.पासुन ६९३ मी.(२२७३ फुट) आहे. पायरी मार्ग पार करुन आम्ही  पंधरा मिनिटात मंदिरापाशी  पोहचतो. मंदिराची स.स.पासुन उंची ७५९ मी.( २४९० फुट) आहे.पायथ्यापासुन आम्ह...