Posts

Showing posts from July, 2020

शारिरीक श्रमतेची कस पाहणारी भटकंती: कावळ्या घाट

Image
ट्रेक कावळ्या घाट घोल  गाव   ता : वेल्हा   जि :  पुणे  मार्ग - पुणे- पानशेत - घोल      जून महिन्याची सुरुवात झाली की वेध लागतात ते पावसाचे. जून महिन्यातील  हा आमचा पहिलाच  ट्रेक.        सह्याद्री रांगेत अनेक विशाल पर्वत , शिखरे , गड-किल्ले  आहेत. यात एक उत्कृष्ट असा अभेद गड म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड आहे.रायगड ही  राजधानी  असल्यामुळे यावर नजर ठेवण्यासाठी अनेक गडांच्या साखळ्या बनविल्या त्यापैकी एक कोकणदिवा आहे. हा रायगड व कावळ्या घाटाच्या जवळच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला . कोकणदिव्याच्या दक्षिणेला रायगड , दक्षिण - पूर्व लिंगाणा व पूर्व दिशेने तोरणा दिसतो.       हा  ट्रेक करण्यासाठी आम्ही  प्रथम  घोल ( ता:  वेल्हा , जि : पुणे )  या  गावी पोहचलो.       घोल  गावातून वाटाड़या ला सोबत  घेउन येथूनच  ट्रेकला सुरुवात केली.    ट्रेक च्या  सुरुवाती पासूनच पर्जन...

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर

Image
सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन,पुणे  या संस्थे  कडून महाराष्ट्रातील माऊंट एवरेस्ट समजल्या जाणाऱ्या  कळसुबाई शिखरावर यशस्वी चढाई       बारी गाव,      ता : अकोले      जि : अहमदनगर            महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराचा मान कळसुबाई ला जातो, याची समुद्रापासून उंची १६४६ मी.(५३९९ फुट)आहे. याचा आम्हा महाराष्ट्र वासीयांना सार्थ अभिमान आहे.     कळसुबाई  शिखर सर  करण्यासाठी  आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन,पुणे  च्या ४२ सदस्यांनी  बारी या गावी  (ता:अकोले, जि : अहमदनगर) जाण्यासाठी खाजगी बस वाहनाने शनिवारी रात्री २९ एप्रिल २०१७ रोजी प्रवासास सुरुवात केली.  ३० एप्रिल ला पहाटे बारी गावात पोहचलो. सर्व नित्य कर्मे उरकून  पहाटे ६.३०  वाजता शिखराच्या दिशेने वाटचालीस सुरुवात केली.   बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखराकडे जाण्याचा मार्ग आहे. ...

डेरे घाट वाट

Image
खडसांबळे लेणी - डेरे घाटवाट नागशेट,  ता : सुधागड   जि : रायगड   मार्ग : पुणे -ताम्हिणी घाट मार्गे नागशेट .           ८४  लक्ष्य योनीनंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो, असे म्हणतात. म्हणजे हा जन्म खूप हालअपेष्टा सहन करून मिळालेला आहे. तर या मनुष्य जन्माचा आपण पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे.आम्ही ट्रेकर्स मंडळी तर याचा पुरेपूर उपभोग घेत असतो.ऊन,वारा,पाऊस,थंडी अश्या सर्व आव्हानांचा सामना करीत आम्ही दर रविवारी ट्रेक करीतच असतो. मनुष्य जन्म पुन्हा नाही, जे काही करायचे ते याच जन्मात. दैनंदिन जीवन शैलीतून बाहेर पडा, निसर्गाचा आनंद घ्या, तुम्हाला वाटत असेल बाहेर खूप ऊन आहे, पण तुम्ही जंगलात भटकायला गेलात कि तुम्हाला वाटेल कि हा गारवा आला कोठून.         तर मित्रांनो, या सह्याद्रीच्या डोंगर कड्या-कपाऱ्यात फिरायला या,आणि ताजेतवाने व्हा.     आज ५ मार्च २०१७ रोजी सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन, पुणे या ग्रुप ने आयोजित केलेल्या डेरे घाट वाट हा ट्रेक करण्यासाठी,   पुणे-ताम्हिनी घाट मार्गे नागशेट या गावी खाजगी वाहनान...