Posts

Showing posts from August, 2020

भटकंती शिडीडाक, चकदेव व पर्वत ची

Image
घाटवाट शिडीडाक , चकदेव व पर्वत  ता : खेड   जि :  रत्नागिरी   मार्ग : पुणे - सातारा - आंबिवली.   मेट शिंदी व पर्वत    ता : महाबळेश्वर     जि :  सातारा        वासोटा - बामनोली परिसर भटक्यांना कायमच रानभूल पाडणारा . उन्हाळा - पावसाळा - हिवाळा अशा सर्वच परिस्थितीत निसर्गप्रेमी इथल्या दऱ्या खोऱ्यात उनाडत असतात .त्याच रानात काहीसा आडवाटेला असणारा चकदेव मात्र काहीसा उपेक्षित आणि अपरिचित आहे. देश आणि कोकण यांना जोडणारा , पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा जपणारा , निसर्गरम्य तितकाच रौद्र असा चकदेव मनाला एक आगळाच तजेला देऊन जातो. जय शंभू महादेव  कैलास पर्वतावर असतो. म्हणूनच सहसा सर्व पुरातन महादेव मंदिरे उंच , बिकट डोंगरावर आहेत. महादेवाच्या पुजेचा मान जंगम समाजाला आहे. एकूण ११ शिवपुऱ्या आहेत. त्यापैकी ७ शिवपुऱ्या या जावळीच्या खोऱ्यात आहेत.       धारदेव , तालदेव , मल्लिकार्जुन , पर्वत , चकदेव , मुळेश्वर , गारदेव या सर्व उंच पर्वतावर आहेत. या सर्व शिवपुऱ्या स्वयंभू आहेत . या सर्व शिवपुऱ्या पा...

लिंगाणा : सह्याद्री च्या रांगेतील प्रत्येक भटक्याचे एक सुखद स्वप्न

Image
        लिंगाणा मोहीम स्वप्न पूर्ती                  मोहरी गाव         ता : वेल्हा         जि: पुणे         मार्ग : पुणे-नसरापूर-वेल्हे-मोहरी गाव.            लिंगाणा हा रायगड गडाचा उपदुर्ग आहे.मानगड,सोन गड, महिंद्र गड, लिंगाणा,कोकण दिवा हे गड रायगड कडे जाणाऱ्या घाट वाटांवर पहारा  देतात.कावळ्या,बोचेघळ ,निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड,शेवत्या, मढे घाट या सर्व  सह्याद्रीतील घाट वाटांनी खाली उतरुन  कोकणात  जाता येते. बोराट्याच्या नाळे लगत लिंगाच्या आकाराचा डोंगर आहे.लिंगाच्या आकाराचा हा गड महाडपासून ईशान्येस सोळा मैलावर असून सह्यादीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांच्या दरम्यान आहे.या गडाची  उंची स.स.पासुन २९६९ फुट  आहे. व चढण ४ मैल आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे,या दुर्गावर स्वराज्याच्या  शत्रुंना कैदेत ठेवत असे.वरती अतिअवघड अशी वाट नसलेला सुळका आणि घसरडी वाट ,त्यामुळे येथे कैद्यांन...