भटकंती अपरिचित चिकना घाट वाटेची
सह्याद्रि ट्रेकर्स फाउंडेशनच्या मावळ्यांकडून अपरिचित अशी चिकना घाट वाट मोहीम यशस्वी
किये गाव,
ता: महाड
जि: रायगड
महाराष्ट्रा च्या पश्चिम भागात अरबी समुद्राला समांतर ४० ते ८० किलोमिटर दक्षिनोत्तर सह्याद्रि पसरला आहे, यालाच पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. याचा विस्तार खुप लांबवर आहे. उत्तरेस तापि नदीच्या खोऱ्या पासून, दक्षिनेस कन्याकुमारी पर्यन्त आहे.याची दक्षिनोत्तर लांबी १६०० किलोमिटर, तर महाराष्ट्रातील लांबी ४४० किलोमिटर आहे. साधारणतः ऊंची ९०० ते १२०० मी.पर्यंत आहे. या पर्वताचा पश्चिम उतार अतिशय त्रिव्र व पूर्व उतार एकदम मंद स्वरुपाचा आहे. सह्याद्रि ची रुंदी उत्तरेस जास्त व दक्षिनेस कमी आहे. तसेच उत्तरेस ऊंची जास्त व दक्षिनेस कमी आहे. सह्याद्री पर्वताची निर्मिति प्रस्तर भंग प्रक्रिये तुन झाली.या प्रक्रियेत दक्खन च्या पठाराचा पश्चिमे कडिल भाग मोठ्या प्रमाणात खचला त्याचबरोबर पश्चिम कीनारा व त्या लगतचा सागर तल मोठ्या प्रमाणात खचला. दक्खन च्या पठाराचा पश्चिमे कडिल न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि. या मुलेच सह्याद्रि पश्चिमे कडुन अत्यंत उंच व भिंति सारखा सरल, पठारकडुन अत्यंत मंद उताराचा दीसतो.पर्वत रांगेतिल दोन्ही प्रदेशात जाण्या येण्या जोगा किंवा दळन वळनाचा रस्ता म्हणजेच घाट होय.
कोणी निंदा कोणी वंदा ट्रेक करणे हाच आमचा छंद. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःला सुद्धा वेळ द्यायला तयार नाही. फक्त काम एक काम एवढेच त्याचे जीवन आहे, असे समजून तो राब-राब राबत असतो. पण एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवणे त्याला पसंद नाही. प्रत्येकाने महिन्यातून एक दिवस तरी ट्रेक करण्यासाठी स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. निसर्गाचा खरा आनंद उपभोगावयाचा असेल तर तुम्हाला भटकायला जावेच लागेल.
आम्ही सह्याद्रि ट्रेकर्स चे सदस्य दर रविवारी श्री.सुरेन्द्र भाऊ दुगड यांच्या नेतृत्वा खाली ट्रेक चे आयोजन करीत असतो. १२ एप्रिल २०१६ रोजी २६ सदस्यांनी अपरिचित असा चिकना घाट हा ट्रेक करण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवासास सुरुवात केली.पुणे-भोर- वरंधा घाट-माझेरी- वरंध गाव-भावे मार्गे ,
पदाजी कोंड-कीये २२७ मी.स.स.पासुन उंची (ता.महाड)
या गावी पोहचलो.
गावातुन स्थानिक वाटाडे श्री. कोंडीबा
मालुसरे (वय ७० ) यांना सोबतीला घेतले, व या येथूनच ट्रेक ला सुरुवात केली.
अतिशय अपरिचित अशी सहसा कोणी ट्रेकर्स मंडळींनी न केलेली अशी घाट वाट करण्यासाठी आम्ही निघालो.
सुरुवातीपासूनच अगदी खढी चढ़ण व वाटे वर सुकलेले गवत आणि भुसभुशित माती असल्यामुळे चढणीची वाट चढून जाणे, अत्यंत कठिन व कष्टदायक होत होते.
किये गावापासून जवळपास ५६८ मी.(१८६३ फुट) खढी चढण चढून आम्ही सपाटीवर पोहचलो.
या मार्गावर कोठेही पाणी व वस्त्या नसल्यामुळे आपणाला तिन ते चार लिटर पाणी जवळ बाळगावे लागते.
मजल दरमजल करित व थोडीफार विश्रांति घेत,
अतिशय कठिण व दमछाक करणारी अशी चिकना घाट वाट पार करुन आम्ही शिरगाव (ता.भोर) येथे जवळपास ६ तासांचे व ८ किलोमिटर चे पद्भ्रमण करून पोहचलो.
प्रत्येक ट्रेकर्स मंडळींनी ही घाट वाट एकदा तरी अवश्य करावी. जे नियमित ट्रेकर्स आहेत, अश्यांनिच हा ट्रेक करावा, शक्यतो नवख्या ट्रेकर्स ना बरोबर घेऊन करु नये.
या ट्रेक मधे साताऱ्याहून आलेले श्री.पुरोहित काका (वय ७५ ) यांचा विशेष सहभाग होता. तसेच पद्भ्रमण मार्गावरुन वाटचाल करित असताना श्री. यशवंत साळूंखे यांच्या बासरीच्या मधुर वाणीने सर्वाना मंत्र मुग्ध केले.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.

Comments
Post a Comment