एक उपेक्षित लेणी : येळघोल लेणी

येळघोळची लेणी
येळघोल 
ता : मावळ 
जि : पुणे 
मार्ग : पुणे-तळेगाव-कामशेत-कडधे-आर्डव-येळघोल.
अंतर : ७६ किलोमिटर 
येळहोल गाव स.स.पासुन उंची: ५५२ मी.(१८११ फुट)
येळहोल लेणी स.स.पासुन उंची: ७४६ मी.( २४४७ फुट)
पायथ्यापासुन लेणी प्रत्यक्ष चढाई : १९४ मी.( ६३६ फुट)



    येळहोल ची लेणी पाहण्यासाठी आम्ही बेडसे लेणी पाहुन, बेडसे लेणी पासुन ९ किलोमीटर वर असलेल्या येळहोल या ठिकाणी आलो.
      
   येळहोल  गावात जवळपास १२५ ते १५० घरे आहेत.अंदाजे लोकसंख्या १ हजार च्या आसपास आहेत.
घारे, भिलारे, येनपुरे,कदम,सुतार,ओझरकर , शेडगे ही सर्व मंडळी गुण्या गोविंदाने राहतात.



   गावातूनच लेणी कडे जाण्यासाठी वाट आहे.येथूनच आम्ही वाटचाल सुरु केली.
वाट मळलेली आहे.



परंतू काही ठिकाणी वाट सापडणे कठिण जाते.गावातील स्थानिक सोबतीला बरोबर  घेतला तर अडचण येत नाही.काही-काही ठिकाणी ऑइल पेंट ने दिशादर्शक खुणा केलेल्या आढळतात.


लेणी च्या अगोदर एक छोटासा धबधबा लागला.येथेच  एक देवीचे मंदीर ही आहे.


    गावापासून 
दिड किलोमीटर व अर्ध्या तासात आम्ही  लेणी पाशी पोहचलो.


    
  येळघोळ गावाच्या पश्चिम दिशेला, गावाच्या पातळीपासुन थोडे उंचीवर डोंगराच्या कुशीत एक धबधबा आहे.



 धबधब्याच्या उत्तरेकडे एक नैसर्गिक कपार तयार झाली आहे. 




येलघोलची ही लेणी याच नैसर्गिक कपारीत/घळीत खोदलेली आहेत. 


सरत्या पावसाळ्यात येथे आल्यास लेणी समोर अविरत पडणाऱ्या धबधब्याचे कमालीचे सुंदर दृश पाहायला मिळते.


 पूर्वाभिमुख असणाऱ्या या लेणीच्या एका कोपऱ्यात दगडात कोरलेला साधारण पाच फूट उंचीचा एक स्तूप आहे.


 तर दुसऱ्या बाजूला खोल्यांचे अर्धवट अवस्थेतील बांधकाम दिसते.




लेण्याच्या मध्यभागावरील भिंतीवर बऱ्याच मानवी आकृत्या कोरलेल्या दिसतात.

     लेणी पाहुन आम्ही  परत आल्या मार्गाने येळहोल गावातील मारुती मंदीरापाशी आलो.
   मावळ तालुका! 
  निसर्गाने नटलेल्या या तालुक्याला मानवनिर्मित शिल्पांचं भरभरून वरदान लाभलं आहे. कार्ले, भाजे, बेडसे, घोरवडेश्वर, भामचंद्र, भंडारा यांसारख्या सुपरिचित लेणी तर इथे आहेतच पण निगडे, फिरंगाई, कल्हाट, पाल, उकसण, पाटण, कांब्रे, गडद अशा अल्पपरिचित लेण्या देखील याच परिसरात आहेत. अशाच पवन मावळातल्या येलघोल गावात एक प्राचीन लेणं लपलेलं ज्याच नाव येलघोलचं लेणं!
   येलघोल हे पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात अगदी डोंगराच्या कुशीत वसलेलं एक छोटेसे गाव. नकाशावर शोधतानाही आपली दमछाक होईल इतकं छोटं अस्तित्व असणारं हे गाव मात्र आपल्या पदरात एक प्राचीन ठेवा बाळगून आहे. महाराष्ट्रात ज्या – ज्या अर्धवट गुहा, लेण्या सापडतात त्यापैकीच एक लेणी म्हणजे हे येलघोल. येथे प्राचीन काळी एक सुंदर लेणं निर्मिती होता होता राहिलं. कारण माहित नाही, बहुदा खोदताना खडक ठिसूळ लागला असेल अथवा राजाश्रय न मिळाल्याने लेणी खोदण्यासाठी लागणार मनुष्यबळ कमी पडलं असेल. कारण त्या अज्ञात इतिहासालाच ठाऊक. या लेण्यांच अजून एक दुर्दैव म्हणजे या लेण्याचा उल्लेख कुठल्याही पुस्तकात अथवा शासनाच्या गॅझेटमध्ये सापडत नाही. जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्गेस या इंग्रज विद्वानांनी भारतातील लेण्यांचा रितसर अभ्यास करुन "केव्ह टेंपल्स ऑफ इंडिया" या शीर्षकाचे एक पुस्तक १८८० साली प्रकाशित केले. त्यांनी नमुद केलेल्या मावळातील लहान लेण्यांमध्ये देखील येळघोळचा उल्लेख आढळत नाही.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर