पद्भ्रमण ठोसेघर ते जुंगटी



            'मज वेड लागे गडांचे' अशी माझी अवस्था झाल्यामुळे मी ट्रेक कमी करून विविध  गड पादाक्रांत करण्याचा मानस केला व माझे गडांचे शतक ही पूर्ण झाले असल्यामुळे, आता वेध लागले होते ते द्विशतक करण्याचे  त्यामुळे आपोआपच  पाऊले गडांच्या दिशेने फिरू लागली.
         सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन चा मी नियमित सदस्य. जवळपास १३  वर्षांपासून या संस्थेमार्फत सुरेंद्र(भाऊ) दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेक करीत आहे. सुरूवातीला मी गड भ्रमंती करीत असायचो, पन या संस्थेची माझे नाते जोडले गेल्याने मी ट्रेक करीत राहिलो.ट्रेक करने म्हणजे काही सोपी गोष्ट नाही ते मला येथे आल्यावर समजले. ट्रेक करताना आपल्या संपूर्ण शरीरिक श्रमतेचा कस लागतो.आपण  फिट आहोत की नाही याची खात्री पटते.ट्रेक हे जवळपास कमीत कमी ७  ते ८  तास व जास्तीत जास्त ३०  ते ३२  किलोमिटर अंतर एका दिवसात पार करण्याचे असतात.
         या संस्थेबरोबर मी १२  नोहेंबर  २०१७ रोजी झालेला घाटवाट खुटा हा ट्रेक  केला होता, त्यानंतर मी ट्रेक ला गेलो न्हवतो.आज तो योग परत आला व आजच्या ट्रेक मध्ये मी शरीराने व मनाने सहभागी झालो याचा मला खूप आनंद झाला.व मला या ट्रेक मध्ये बघून सर्व सदस्यांना देखील  खूप आनंद झाला.
         २९ जुलै २०१८ रोजी पहाटे ४.३०  वाजता आम्ही पुण्याहून निघालो.आजच्या ट्रेकमध्ये पुण्याहून ९७  सदस्य सामील झाले होते.पुणे बँगलोर महामार्गाने गाडी सातारा च्या दिशेने निघाली.७.३० वाजता आम्ही साताऱ्याला ,

राजपुरोहित स्वीट  येथे पोहचलो.


राजपुरोहीत  काकांनी उपिट व जिलबी चा नाष्टा तय्यार ठेवला होता.सर्वानी यथेच्छ उपिट व जिलेबि वर ताव मारला. सकाळी ८.३०  वाजता भाऊंनी राजपुरोहित काकांचे आभार मानून आम्ही पुढे  मार्गस्थ झालो.आता येथून पुढची ट्रेकची सर्व जबाबदारी कन्हैया राजपुरोहित यांच्या कडे सोपविण्यात आली.आम्ही ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी मार्गस्थ झालो.

         ठोसेघर धबधबा

       पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होतो सफेद पाणी अती उंचा वरून वाहते.
    हा धबधबा तारळी नदीवर आहे. १५० ते १८०  मी.उंचीवर वाहणारा हा धबधबा ,

पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे. 


या ठिकाणी ३ धबधबे आहेत, एक मुख्य आणि त्या लगतच एक छोटा. तिसरा धबधबा या दुसऱ्या धबधब्या  पासून थोडा लांब वाहतो. धबधब्याच्या जवळचे गांव ठोसेघर आहे. ठोसेघरच्या तसेच पुढे गेल्यावर चाळकेवाडी हे गाव आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की पासून वीज निर्मिती केली जाते, चाळकेवाडीचे पठार सुद्धा पाहण्या सारखे आहे.
     धबधबा पाहून मन प्रसन्न  झाले. 

या येथूनच हॉटेल हिमालय रेस्टॉरंट च्या मागील  बाजुने  ट्रेकला  सुरुवात केली.

आज पाऊस थोडा आमच्यावर नाराजच होता किंबहुना रुसला म्हणायला हरकत नाही. ' उम्मीद पे दुनिया कायम है' या विचाराने पदभ्रमण चालू केले.पाऊण तास अंतर चालून व दीड किलोमीटर ची पायपीट करून मालदेव या जेमतेम ३५  घरांची वस्ती असलेल्या गावी पोहचलो.

 येथून स्थानीक सोबती ला बरोबर घेतले व पदभ्रमण सुरू केले.

अर्धा किलोमिटर अंतर पार केल्यानंतर पठार भाग चालू झाला.जांभा दगड असलेली वाट सुरू झाली, मधून -अधून वरून राज बरसत होते. श्रावण महिना सुरू होणार असल्यामुळे फक्त सर येत होती व जात होती.

पठार काही केल्या संपत न्हवते


५ किलोमिटर अंतर पार करून झाल्यावर आम्ही भाऊंनी आणलेल्या सूप वर ताव मारला. निसर्गाचा व पावसाचा मनमुराद आस्वाद घेत थोडी श्रणभर विश्रांती घेऊन पुढे  जात राहिलो.पद्भ्रमण मार्गावर जळू आ वासून आमचे स्वागत करीत होते.वाट खूपच चिखलमय झाली होती,त्यात मोठमोठी दगडी असल्यामुळे शेवाळे खूप झाले होते.पडत धडपडत आम्ही पुढे मार्गस्थ होतं राहिलो. साधारणता ३.३० तासांचे  पदभ्रमण  झाल्यावर आमचा वाटाड़या  माघारी फिरला, व आम्ही पुढे  निघालो.धुके खूप असल्यामुळे वाट दिसेनाशी झाली,वाट काही सापडेना. एका गुराख्याची आमची भेट झाली , त्याला सोबतीला घेऊन पुढे मार्गस्थ झालो.जवळपास ८  किलोमिटर चे  विस्तिर्ण असे पठार पार करुन , व एकून १२  किलोमिटर चे पद्भ्रमण करुन  आम्ही  जलकेवाडी येथे पोहचलो.येथून पुढे उतार असलेली वाट सुरू झाली.उतरणीच्या वाटेवर  लाल माती चिकट झाल्यामुळे उतरणे खूप जिकिरीचे झाले होते.घसरण खूप होती, बरेच जन या मार्गावर पडत धडपडत एकमेकांना साथ देत पुढे-पुढे  जात राहिलो.ज्या साठी केला होता अट्टाहास तो श्रण  आला, 

आम्ही ६ तासांचे   व १३.५०  किलोमिटरचे  पदभ्रमण करून जुंगटी  या गावी पोहचलो.हे गाव जावळी तालुक्यात येते व जिल्हा सातारा.



     लगेचच येथे स्वयंपाकाची तय्यारी केली,


     स्वयंपाक झाल्यावर जेवणाचा आस्वाद घेउन 
पुण्याकडे मार्गस्थ झालो.
       आजच्या ट्रेकमध्ये वय वर्ष ७  ते वय वर्ष ७०  या सर्व वयोगटातील तरुण तुर्क म्हातारे अर्क सहभागी झाले होते.
        श्री सुरेंद्र (भाऊ) दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली आजची मोहीम संपन्न झाली.

वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर