पावसाळ्यातिल भटकंती: वांद्रे ते भीमाशंकर

वांद्रे ते भिमाशंकर

ता : खेड 
जि : पुणे 
गाव : वांद्रे 
मार्ग : पुणे -राजगुरू नगर च्या अलीकडून-पायीट शिरोली फाटा -शेवटचे गाव वांद्रे.


       हा ट्रेक करण्यासाठी आम्ही  १३ सप्टेंबर २०१४ रोजी वर दर्शविलेल्या मार्गाने खाजगी वाहनाने प्रवास करुन  वांद्रे या  गावी पोहोचलो.



आपण जर खाजगी वाहनाने येथे आला असाल तर ड्रायवर ला सांगून गाडी भीमाशंकर येथे नेण्यास सांगावे.


      वांद्रे गावातून स्थानीक वाटाड्या ला बरोबर घेऊन येथून च पदभ्रमण चालू केले. 




गावातुन बाहेर पडल्यावर डाव्या बाजुची गाडीवाट जी पुढे वरसुबाई डोंगररांगेतील पवनचक्क्याकडे जाते त्या वाटेने चालायला सुरवात केली. जर आपणाला  पावसाळ्यात हा ट्रेक करावयाचा असल्यास  वातावरण एकदम छान  असते.पावसाळ्यात सगळीकडे दाट धुके पसरलेले असल्यामुळे आजुबाजुच्या महत्वाच्या खाणाखुणा नजरेस पडत नाहीत.काही झाडांना करवंदे व जांभळे नजरेस पडतात.गावठी आंबेही नजरेस पडतात. 

थोड्या वेळात आम्ही  मुख्य रस्ता सोडून एक ब-यापैकी रुंद वाटेने, उजव्या बाजूच्या जंगलात शिरलो.





काही अंतर चालून गेल्यावर एका ठिकाणी पक्के बांधकाम आढळले.येथुन वाट डाव्या बाजुला खाली उतरली.दाट धुक्यामुळे व अधेमधे येणा-या पावसांच्या किरकोळ सरींमुळे घामाचे प्रमाण बरेच कमी झाले होते. खरपुड वनौषधी केंद्राकडून येणा-या वाटेला दोनही बाजुंनी अधेमधे दगड रचून ठेवल्यामुळे येथे वाट चुकण्याची शक्यता तशी कमी आहे.  

खालुन खेतोबाकडुन येणारी वाजंत्री घाटाची वाट ओलांडून  वेळवली/कमलजा माता मंदिराजवळ आम्ही  पोहोचलो.




येथुन पुढचा रस्ता तुलनेने सोपा व  न चुकण्यासारखा होता.
येथुन पुढे ट्रँक्टर जाऊ शकेल असा रस्ता आहे.

तासाभरात भिमा नदीचे पात्र ओलांडून शेवटची चढण चढून आम्ही  जवळपास पाच ते साडे पाच तासांचे पदभ्रमण करून  भिमाशंकर मंदिर परिसरात पोहोचतो.



     भिमाशंकर मंदिराच्या येथे आमच्या ट्रेकची सांगता झाली.




वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.




Comments

  1. सुशील असेच लिखाण करत जा, तुझें ट्रेक चे फोटो पाहून जुन्या आठवणी ना उजाळा मिळत आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर