श्रीराम कड्याची भवानी माता : भटकंती एका आडवाटेवरची

ट्रेक कल्याण गाव ते सिंहगड बॅक साइड व्हाया श्रीराम कड्यावरची भवानी माता 

कल्याण गाव 
ता : हवेली 
जि : पुणे 




      सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन,पुणे या ग्रुप चा  शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी  नागेश्वर व वासोटा हा ट्रेक होता, परुंतु काही कारणास्तव  मला त्या ट्रेकला जाता आले नाही. म्हणून मी  आज कड्यावरची भवानी माता हा ट्रेक करण्यासाठी २६ फेब्रुवारी २०१७ रोजी सिंहगड  रोड येथून दुचाकी वाहनाने  बंगलोर हाईवेने कोंढणपूर फाट्यापासुन आत वळुन,

 कल्याण या गावी प्रवास करुन  पोहचलो.येथूनच  ट्रेकला सुरुवात केली.



आज वातावरण खुप प्रसन्न होते,  हवेत खूप गारवा ही  होता.पद्भ्रमण मार्गावरची वाट ही अतिशय मळलेली असल्याने वाट चुकण्याची शक्यता तशी कमीच.



 मजल  दर-मजल करित  दोन तासांचे पद्भ्रमण  करून कड्यावरच्या भवानी मातेच्या मंदिरात  पोहचलो.या ठिकाणी भवानी मातेचे प्राचीन मंदिर आहे, साधारणतः १०  फूट अंतराची गुहा येथे आहे.








छत्रपती  शिवाजी महाराजांना भवानी मातेने या ठिकाणी  आशीर्वाद दिला होता, अशी स्थानिक लोकांची भावना आहे.

या ठिकाणाला श्रीराम कड्याची भवानी माता या  नावाने  देखील ओळखले जाते. 



मंदिरापाशी पोहचन्या अगोदर आम्हाला १० ते १५  फुटांचा दगडी रॉक पॅच  पार करावा लागला .तो आम्ही अगदी आरामात पार केला.




      मंदीराच्या परिसरात  आम्ही थोडी विश्रांती व पेटपूजा उरकून घेतली.त्यानंतर  सिंहगडाला वर न जाता, खालच्या बाजुने  वळसा मारून परत कल्याण गावाकडे मार्गस्थ झालो.





उन्हाची त्रिव्रता खुप होती,परंतू  उन्हाची झळ जास्त लागली नाही.
       प्रत्येक  ट्रेकर्स मंडळींनी  हा ट्रेक अवश्य करावा. साधारणतः ५  ते ६ तासांचा व जवळपास ११ की.मी. चा हा ट्रेक होतो. तसा हा ट्रेक बऱ्याच जणांना माहिती असेल ही, पण आमच्यासाठी हा ट्रेक नवीन व अपरिचित असा होता.


       या भटकंती मधे डॉ.विनोद मेहता, शशी उत्तेकर, राजेश तिखे व मी सुशिल दुधाणे यांचा सहभाग होता.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर