जर्शेश्वर परिक्रमा

ट्रेक मांडवी ते जर्शेश्वर परिक्रमा

मांडवी गाव 
ता : हवेली 
जि : पुणे 



       या ट्रेकला जाण्यासाठी १९ मार्च २०१७ रोजी  पहाटे ५.४५  वाजता सर्व जण अभिरुची मॉल सिंहगड रोड धायरी येथे जमलो.येथून दुचाकी वाहनाने  मांडवी गावाकडे प्रस्थान केले.धायरी-खडकवासला-कुडजे गाव-मांडवी असा  २२ किलोमिटर चा प्रवास करून मांडवी गावात पोहचलो. मांडवी गाव  स्प्लेंडर कंट्री  येथे आहे. 



मांडवी गावातील  स्मशानभूमी च्या बाजुने जर्शेश्वर परिक्रमेचा मार्ग आहे.ज्या भटक्या मंडळींना ट्रेक करुन जर्शेश्वर मंदिरा पाशी जायचे असेल, त्यांनी या  मार्गाने ट्रेक करण्यास निघावे.जर तुम्हाला ट्रेक करायचा नसेल, फक्त मंदीर पहायचे असेल तर आपण, स्प्लेंडर कंट्री च्या समोरच्या काँक्रिटच्या घाट रस्त्याने थेट चार चाकी अथवा दुचाकी वाहनाने मंदिरापर्यंत जाऊ शकता. 


आम्हाला ट्रेक करत जायचे असल्याने आम्ही स्मशानभुमी च्या बाजुने असलेल्या मार्गाने मार्गक्रमण सुरु केले.




 या मार्गावरुन जाताना, येथे  बराच वणवा पेटविल्यामुळे वाट घसरडी झालेली  होती. 





बऱ्यापैकी चढ सुरु झाला , उन्हाची त्रिव्रता खुपच जाणवत  होती.



 स्थानिक वाटाड़या बरोबर  न घेता, आम्ही  पदभ्रमण सुरु  केले. 

डॉ. विनोद मेहता व शशी उत्तेकर यांच्या मार्गदर्शना खाली आम्ही  वाटचाल सुरु केली.





या मार्गावरुन जाताना आम्हाला  बऱ्याच संकटांचा सामना करत जावे लागले.मज्जा मस्ती, विश्रांती घेत, रमत-गमत, फोटो शुट करित जात राहिलो.







साधारणतः तिन ते चार तासात आम्ही जर्शेश्वर मंदिरात पोहचलो.




मनोभावे दर्शन घेतले.दर्शन घेउन मंदीर परिसराचा फेर फटका मारला.


त्यानंतर परत आल्या मार्गाने मांडवी गावात  मजल दर- मजल करीत पहाटे ६.३०  ला चालू केलेली भटकंती  दुपारी २.३० ला व  एकुण १३ की.मी. चे  पद्भ्रमण  करुन पोहचलो.अश्या पद्धतीने  जर्षेश्वर परिक्रमा आमची  पूर्ण झाली.
      ज्या भटक्या मंडळींनी ही   परिक्रमा केली नसेल त्यांनी आवश्य करावी, आपली शारिरीक श्रमतेची तपासणी  करण्यासाठी जरुर करावी.
     आजचा ट्रेक खूपच छान झाला, परंतु एक घटना वाईट घडली, आमचे सहकारी शशी उत्तेकर यांचा नवीन मोबाईल लिनिओ कंपनीचा पद्भ्रमण मार्गावर  कोठेतरी पडला.आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला पण सापडला नाही. ही बाब आम्हाला ट्रेक पूर्ण झाल्यावर जर्शेश्वर  मंदिरात पोहचल्यावर समजली.त्यानंतर  आम्ही लगेच माघारी आल्या वाटेने फिरलो, मोबाईल ची  रिंग वाजत होती, परंतु मोबाईल काही सापडला नाही.पुढिल आठवड्यात आम्ही परत या ठिकाणी गेलो, परंतू मोबाईल काही सापडला नाही.


     आजच्या भटकंती मधे डॉ.अजय इंगळे, डॉ.विनोद मेहता, शशी उत्तेकर व मी सुशिल दुधाणे यांचा विशेष सहभाग होता.


Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर