कारकाई परिक्रमा

कारकाई परिक्रमा 

ता : जुन्नर 
जि : पुणे
 मार्ग : पुणे -आळेफाटा - माळशेज घाट -खुबी फाटा - खीरेश्वर गाव.


      हरीश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर ! ठाणे , पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्र पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड.






     कारकाई परिक्रमा करण्यासाठी आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे सदस्य वर दर्शविल्या मार्गाने खाजगी वाहनाने ३ एप्रिल २०१६ रोजी  प्रवास करुन  खीरेश्वर या गावी पोहोचलो.

येथूनच स्थानिक वाटाड्याला बरोबर घेऊन पदभ्रमणाला सुरुवात केली. येथून आम्ही तोलार खिंडीच्या दिशेने चालत राहिलो. 


एका  तासाभरात आम्ही  तोलार खिंडीत दाखल झालो.



तोलार खिंडी पासुन  पुढे कोथळे गावापर्यंत संपूर्ण  उताराची वाट  सुरू झाली. वाट मळलेली , प्रशस्त व  न चुकण्यासारखी आहे.


    घनदाट जंगल असल्यामुळे थकवा जाणवत नाही . नजरेच्या समोर कोथळ्याचा भैरवगड दिमाखात उभा असलेला दृष्टीस पडतो. खिंडीतून वर जाणारी वाट व गडावरचे लोखंडी रेलिंगही नजरेस पडतात. घनदाट जंगलातून जरी वाट जात असली तरी ,अधून-मधून  उघडे माळरानही लागते.ऐन उन्हाळ्यात ही परिक्रमा करायची असल्यास उन्हाची तीव्रता प्रचंड जाणवते, तसेच  अंतरही जवळजवळ पाच तासांचे पार करून जावे लागते.


डांबरी रस्ता ओलांडून आम्ही  एक ओढा क्रॉस करून  सपाटी भाग  संपवून, वाट दाट झाडीमधून वर चढायला लागलो.



साधारणतः दोन ते अडीच तासात आम्ही  टॉपला पोहोचलो. 




येथून उजव्या बाजुस पाहिले तर, भैरवगड  खुपच ठेंगणा झालेला भासतो.समोर हरिश्चंद्रगडाचा संपूर्ण  परिसर , तारामती शिखर व बालेकिल्ला आम्हाला  खुणवत होता. 


येथून पुढची वाट एका घळीतून सुरु झाली. तीव्र घसाऱ्यामुळे घसरण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही  सावकाश उतरने पसंद केले.येथून  समोर तळात खूप खोल व लांबवर आम्हाला  उतरण्याचे ठिकाण कोल्हेवाडी दिसले. परंतु त्या ठिकाणा  पर्यंत पोहचणे, बरेच वेळखाऊ व दमछाक करणारे होते. उन्हाची झळ आम्ही नाळेत असल्यामुळे आम्हाला जाणवली  नाही.


समोरच कोल्हेवाडीच्या पलीकडे पिंपळगाव जोगा धरणाचा पाणीसाठा नजरेस पडला.



 त्याच्या डावीकडे हाटकेश्वरचा डोंगर व उजवीकडे सिंदोळा  गड लक्ष वेधून घेत होता. जवळपास पाच ते सहा तासांचे पदभ्रमण करून आम्ही  कोल्हेवाडी येथे पोहचतो.



वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर