श्री श्रेत्र कुंडेश्वर मंदीर

भटकंती कोंडेश्वर शिव मंदीर व कोंडेश्वर  धबधब्याची 

जांभवली  गाव 
ता : मावळ 
जि : पुणे 
मार्ग : सिंहगड रोड हिंगने खुर्द,पुणे-बाणेर- देहूरोड फाटा-तळेगाव दाभाडे-कामशेत- कांबरे -भजगाव-जांभवली.



     १५ ऑगस्ट २०२० रोजी  आम्ही कोंडेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी सकाळी ९.४५ वाजता चारचाकी वाहनाने प्रवासास सुरुवात केली. बाणेर,देहू रोड फाटा,तळेगाव दाभाडे,कामशेत वरुन जांभिवली रोड च्या दिशेने निघालो.इंद्रायणी नदीचा पुल ओलांडून कामशेत-कुंडलि रोड ने  पुढे निघालो.


 भजगाव येथे वडवली धरण नजरेस पडले,या धरणाला उसकान धरण असे ही म्हणतात. या येथे थोडा वेळ थांबून फोटो शुट केले.





वडवली धरणाला जाण्यासाठी उसकान गावातून जावे लागते.

भजगाव पासुन पुढे  गेल्यावर  कोंडेश्वर ढाकभैरी असा बोर्ड लावलेला आहे,



 येथून जांभवली कडे निघावे, या येथे देवस्थान ची ५० रु.ची रितसर पावती घेउन, 



जांभवली  या गावी ७७ किलोमीटर प्रवास करुन पोहचलो.



या येथे श्री.श्रेत्र कोंडेश्वर प्राचीन शिव मंदीर आहे.या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज अनेकदा येत असत.


मंदीर बंद असल्याने बाहेरुनच दर्शन घेतले.



मंदिराच्या परिसरात नंदी व काही शिल्पे तसेच वीरगळ ही आहे.



मंदिराच्या वरच्या बाजुला धबधबा पाहण्यासाठी गेलो.


आम्ही या ठिकाणाहून काही वर्षापूर्वी जांभवली ते ढाक भैरी असा ट्रेक केला होता.या येथून आपण ढाक भैरी ला जाऊ शकतो.


पाऊस जास्त असल्याने धबधबा ओथंबुन वाहत होता.खुपच नयनरम्य  असा धबधबा पाहुन  मन प्रफुल्लित झाले.


पावसाचा जोर  खुप असल्याने धबधब्याच्या  आत न जाताही,पावसाच्या पाण्याने ओलेचिंब झालो.पावसाचा जोर खुपच वाढत चालला होता, त्यामूळे आम्ही येथे जास्त वेळ न थांबता गाडीत जाऊन बसलो.थोडा वेळ थांबून पुण्याकडे मार्गस्थ झालो.


      आजच्या भटकंती मधे मी सुशिल दुधाणे व सचिन मांढरे आम्ही दोघे जण सामिल होतो.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर