म्हसोबाची खिंड ते पोळे
ट्रेक म्हसोबाची खिंड ते पोळे
शिवजयंती स्पेशल ट्रेक
कादवे गाव
ता : वेल्हे
जि: पुणे
मार्ग: पुणे-नसरापूर-वेल्हे-कादवे गाव.
मकर संक्रांति नंतर सूर्य देवता मकर राशीत प्रवेश करतात, व वातावरणातही बदल होतो. थंडी कमी होऊन उन्हाची झळ बसायला सुरुवात होते.परुंतु फेब्रुवारी महिन्यात अजून काही तसा उन्हाचा त्रास जाणवत नाही. अजून हि हवेत थोडा गारवा असतो. उन्हाळा हा ऋतू थोडा दमछाक करणारा. आम्ही भटकी मंडळी ऊन असो कि थंडी वा असो पावसाळा आम्ही दर रविवारी भटकत असतो.उन्हाळ्यात थोडा त्रास होतो, ऊनाची झळ खूप बसते, या दिवसात पदभ्रमण करताना खूप काळजी घ्यावी लागते.पाणी सोबत जास्त घ्यावे लागते त्यामूळे सॅक चे वजन वाढते, त्यामुळे चालताना दमछाक खूप होते. पण तुमची शारीरिक श्रमता किती आहे, व तुम्ही या ऋतूत कसे सामोरे जाता याची हि आत्मपरिक्षा बघण्याची खरी वेळ हीच आहे.
जसे आपण नम्रदा परिक्रमा करतो, त्याप्रमाणे भटकी मंडळी पानशेत परिक्रमा करतात.पूर्ण पानशेत परिक्रमा करण्यासाठी ५ दिवस लागतात.
हा ट्रेक करण्यासाठी आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे ३२ सदस्य १९ फेब्रुवारी २०१७ रोजी पहाटे पुण्याहून खाजगी वाहनाने प्रवासास सुरुवात केली.
नसरापूर,वेल्हे मार्गे कादवे गावात पोहचलो. या येथे दुगड भाऊंनी आम्हाला ट्रेक विषयी माहिती दिली.
कादवे हे गाव पुण्यापासुन ६५ ते ७० किलोमिटर अंतरावर आहे.तसेच वेल्हे पासुन १३ किलोमिटर अंतरावर आहे.
या येथूनच ट्रेकला सकाळी ८ वाजता सुरुवात केली.
स्थानिक लोक याला कादवे खिंड म्हणतात, परुंतु टेक्निकली ही म्हसोबाची खिंड म्हणून प्रचलित आहे. पश्चिमेकडून १० डिग्री साऊथ साइड ने उंच डोंगर रांग डावीकडे ठेऊन उजव्या बाजूने स्थानिक सोबतीला बरोबर न घेता पद्भ्रमण सुरु केले.
सुरुवातीस १ ते १.३० तासांची सपाट व गाडीची वाट होती.
येथून पुढे खरी ट्रेकला सुरुवात झाली, नागमोडी वळणे घेत आम्ही निघालो. चढण थोडी लागली.
काही ठिकाणी पद्भ्रमण मार्गावरुन जाताना सावलीचा आश्रय घेउन विश्रांती घेत राहिलो.
परंतू उन्हाचा त्रास झाला नाही. परुंतु पायपीट जास्त झालि.
धनगर वस्ती, जोगोबा देव वस्ती असे मार्गक्रमण करित दुपारी ३.३० वाजता १६ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पोळे या गावी पोहचलो.
पोळे गावातील धरणावर जाऊन काही सदस्यांनी आंघोळी केल्या.
त्यानंतर जेवण करून पुण्याला मार्गस्थ झालो.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
👉 Add me as a Friend
👉 Please Visit
👉 Please Follow
👉 Do Subscribe , Like & Share
👉 Please Follow
Please Follow Above Links.
like, Subscribe, Share,
Regards
Sushil Dudhane
9822377653
Comments
Post a Comment