न भूतो न भविष्यती अशी हरिचंद्रगडावर असलेल्या कोकणकड्यावरून केलेली कमांडो रॅपलिंग ची यशस्वी मोहीम

कोकणकडा कमांडो  रॅपलिंग 
    
      पाचनई गाव 
      ता : अकोले 
      जि : अहमदनगर 



      अनिल वाघ व हिना पटेल  यांच्याकडून माननीय  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना अनोखी व अविस्मरणीय  वाढदिवसाची भेट.     
        कोकणकडा म्हणजे हरीचंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान.अर्ध्या किलोमीटर परिघाचा  वाटीसारखा अर्ध गोल आकाराचा काळा भिन्न रौद्र भिन्न कोकणकडा हा एकमेव अद्वितीय.पायथ्यापासून उंची साधारणतः ४५०० फूट,कड्याची सरळधार लांबी  १७००  फूट, संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताच्या नयररम्य सोहळा या कड्यावरून पाहण्याचा आनंद अविस्मरणीय . गिरिदुर्ग प्रकारातील अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज डोंगररांगेतील नाशिक मार्गावर आळेफाटा येथून कल्याण मुरबाड कडे जाणाऱ्या हमरस्त्यावर माळशेज घाटाच्या अलीकडे खुबी हे गाव आहे, येथे उतरून खुबी रस्त्याने खिरेश्वर गावातून गडावर जाता  येते.गडावर पोहचायला ४ ते ५ तास लागतात. व दुसरी वाट नळीची वाट  बेलपाडा (वालीवरे) या मार्गे,  व तिसरी वाट पाचनई या मार्गे  जाते. हा गड पूर्व पश्चिम असा आहे, ठाणे,नगर व पुणे यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र पर्वत म्हणजे  हरीचंद्रगड.

       आम्ही पुण्याहून  १३ सप्टेंबर रोजी  रात्री ११.३०  वाजता खाजगी वाहनाने प्रवासास  सुरुवात केली ,राजूर मार्गे पाचनई येथे १४ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता  पोहचलो.भास्कर बादड  च्या घरी थोडा वेळ आराम केला.त्यानंतर सर्व नित्यकर्मे आटोपली. 


न्याहारी करून रोप,हर्णेस,हेल्मेट हे सर्व रॅपलिंग चे साहित्य घेऊन कोकणकड्याच्या दिशेने  निघालो.






 गावातील फक्त ४ जण मदतीला मिळाली, एकुण रोप ४५०  मीटर (१८००) चे ४. या पैकी दोन रोपचे बंडल  घेतले गावातील मंडळींनी. आता प्रश्न पडला की उर्वरित दोन रोप घ्यायचे  कोणी, कारण एका रोप च्या बंडलाचे  वजन चक्क ४५ किलो, एवढे रोप घेऊन चढण चढायची कोणी,


 मग काय आमचा अनिल वाघ पुढे  आला व त्याच्या सोबतीला श्रितिज  व महेश आणि  दुसरा रोप घेण्यासाठी  विकी व विशाल  अवघ्या २१ ,२२  वर्षाची कोवळी पोरं मग काय निघालो मोहिमेवर.विशाल चा हा पहिलाच ट्रेक, त्यात एवढे वजन वाहुन नेणे म्हणजे तारेवरची कसरत.




 सुरुवातीपासून चढण सुरु झाली, 





 थोड्या- थोड्या अंतराने विश्रांती घेत दुपारी १२.३०  वाजता आम्ही मंदिरापाशी पोहचलो.



या येथे   तासभराच्या विश्रांतीनंतर  कोकणकड्याकडे कूच केले.


दुपारी  २.३०  वाजता कोकणकड्यावर पोहचलो. 


सर्वाना जाम भूक लागली होती, सावळा ने मस्त पिठलं , भाकरी , व मिरची ठेचा चा  बेत केला होता,मग काय सर्वांनी त्यावर यथेच्छ ताव मारला. पोटभर जेवण केले व नंतर,





 कोकणकड्या वर  जाऊन  फेरफटका मारला. फोटो शूट केले.



खरं तर आज च विचार होता रॅपलिंग करण्याचा ,परंतु सर्व जण दमले असल्याने आज  विश्रांती घेण्याचा आम्ही निर्णय घेतला. उद्याच्या मोहिमेविषयी नियोजन केले, 

 रोप फिक्सिग केले ,





व नंतर  गुहेमध्ये येऊन मुक्काम केला. 


दुसऱ्या दिवशी १५  सप्टेंबर रोजी पहाटे ७ वाजता कोकण कड्यावर पोहचलो.वातावरण अजून योग्य नव्हते, धुके चे धुके होते, 


संपूर्ण दिवस आमचा वातावरण निवारन्याची वाट पाहण्यात गेला.





 १६ सप्टेंबर ला पहाटे आम्ही सर्व जण परत कोकणकड्यावर जमलो.१० वाजता वातावरण योग्य झाले, लगेचच आम्ही श्रणभराचा ही विचार न करता,

  विकी व महेश यांना रॅपलिंग करित पहिल्या टप्प्यांपर्यत म्हणजे ९०० फुटापर्यत  खाली सोडले.




त्यानंतर अनिल व हिना यांना कमांडो  रॅपलिंग करण्यासाठी खाली सोडणार, इतक्यात  वातावरण पुन्हा बिघडले, सर्वत्र धुक्याचे साम्राज्य विखुरले. सायंकाळी ५  वाजेपर्यत वाट पाहत बसलो , परंतू धुके काही कमी झाले नाही.खरतर धुके होते म्हणून आम्ही  रॅपलिंग करण्याचे थांबवले न्हवते.आम्हाला कमांडो  रॅपलिंग करित असताना चे ड्रोन च्या माध्यमातून  शूटिंग घ्यायचे होते, धुके असल्याने शूटिंग घेता येत न्हवते, म्हणून आम्ही आजची मोहीम थांबवली.नंतर आम्ही रॅपलिंग करित  खाली गेलेल्या विकी व महेश यांना मोबाईल वरुन संपर्क  साधून सांगितले की तुम्ही दोघे पहिल्या टप्प्यावरच थांबा, व तेथेच आज  मुक्काम करा.


 दोघांना आम्ही खाली  जेवण पाठवले व राहण्यासाठी टेंट ही पाठविला.



परंतू ते ज्या ठिकाणी म्हणजे जवळपास ९०० फुटावर होते, त्या ठिकाणी टेंट लावण्याइतकी सुद्धा जागा न्हवती.तरी पण त्या दोघांनी कशी-बशी त्या ठिकाणी रात्र जागत काढली. 





 त्यांच्या साठी रात्र वैऱ्याची होती, ज्या  ठिकाणी ते थांबले होते ती जागा खूप च लहान होती, त्यांच्याशी खाली संपर्क साधण्या साठी आम्हाला त्यांना आवाज द्यावा लागत असे, आवाज सुद्धा लवकर त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हता,मोबाइल वर  मधून अधून संपर्क होत होता.
    तिसऱ्या दिवशी म्हणजे १७   सप्टेंबर रोजी सकाळी  ८.३० वाजल्या नंतर हळू हळू धुके कमी होऊ लागले, लगेच आम्ही सर्व तय्यारी पूर्ण केली.


मी मोहिमेचा नेता असल्याने माझ्या हस्ते कोकणकड्यावर  पुजा करण्यात आली, व नारळ फोडण्यात आला.





     तसेच कमांडो रॅपलिंग चे फोटो शुट घेण्यासाठी सर्व अद्ययावत कॅमेरा व  ड्रोन सज्ज झाले.





९ वाजून १० मिनिटांनी अनिल व हीना पटेल यांना  खाली सोडले , जाताना ते  कमांडो रॅपलिंग करीत खाली गेले,



 व ५०  फुटानंतर खाली डोके व वर पाय अश्या पद्धतीने भारताचा तिरंगा व मोदिसाहेबांचा बॅनर यशस्वीपणे खाली फडकवीला.




त्यानंतर  एकच जल्लोष झाला, 'जय शिवाजी जय भवानी' या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.




त्याला  कारण ही  साजेसे असेच होते, अश्या  प्रकारे कमांडो  कोकणकडा   रॅपलिंग मोहीम यशस्वी झाली होती व तीही भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवशी.
 सकाळी  ९.४० मिनिटांनी म्हणजे अर्ध्या तासात हे  दोघे जण  प्रथम टप्प्यावर ९००  फूट रॅपलिंग करून  पोहचले. नंतर उर्वरीत दोन टप्पे पार करण्यासाठी रोप फिक्सिंग  करून पुढील वाटचाल चालू केली. 


दुपारी २.४५ वाजता त्यांनी उर्वरीत दोन्ही  टप्पे  रॅपलिंग करित पूर्ण केले. 




मी या मोहिमेचा नेता असल्याने मी लगेचच सावळा ला  रॅपलिंग करण्यासाठी खाली सोडले, कारण जे चौघे जण खाली पोहचले त्यांना नळीच्या वाटेने पुन्हा कोकणकड्यावर येणारी वाट माहित न्हवती.त्यासाठी सावळा ला खाली सोडण्याचा मी महत्व पुर्ण निर्णय घेतला.त्या नंतर ते सर्व जण  नळीच्या वाटेने कोकणकड्यावर येण्यासाठी  निघाले.  रात्री ९.२५ मिनिटांनी सर्व जण कोकण कड्यावर पोहचले.नळीच्या वाटेवरून येताना खुप पाऊस पडत होता , त्यात नळीची वाट म्हणजे कठीण पारिस्थिती दगडावरून पाय घसरत होते, खूपच त्रास झाला सर्वाना,धुके जास्त असल्याने पुढची वाट ही त्यांना  नीट दिसत न्हवती.अश्यातच सोबतीला  होता  काळा कुट्ट अंधार. सर्व जण सुखरुप कोकणकड्यावर पोहचले.आल्यानंतर जेवणासाठी  काही नसल्याने, भेळ खाऊन पोटातील अग्नी त्यांनी  शांत केली.एवढय़ा वरच हे थांबले नाहीत,  लगेच रोप खेचण्यासाठी तय्यारी सुरु झाली.आम्ही ७ जणांनी मिळुन ४५० मीटर चे ४  रोप, अंदाजे वजन एका रोपचे  ४५ किलो, खेचून वर घेतले. रोप खेचून ते  कॉइल  करून ठेवायला मध्य रात्रीचे २.३० वाजले. लगेचच  बॅगा भरून मध्यरात्री ३.१५  ला गड उतरण्यास सुरुवात केली, व १८ सप्टेंबर रोजी  पहाटे ५.४५  वाजता पाचनई येथे भास्कर च्या घरी  पोहचलो. आवरा आवरी करून लगेचच  पुण्याला मार्गस्थ  झालो. 
    आजची मोहीम आमची खूपच आव्हानात्मक झाली, ज्या मुलांनी रॅपलिंग  व कंमोंडो रॅपलिंग केले, त्यांनीच आल्यानंतर लगेच रोप काढले. सलाम त्यांच्या  शारीरिक श्रमतेला, व त्यांच्या जिद्दीला.



       कोकणकड्यावरन  आत्तापायांत कोणीही कमांडो  रॅपलिंग केलेले नाही,

 पण एक महाराजांचा मावळा अनिल वाघ 




व अहमदाबाद ची रनरागिनी हिना पटेल 


या दोघांनी ही न भूतो न भविष्यती अशी किमया करुन दाखवली. 
     अनिल वाघ याने हि मोहीम करण्याचा ध्यास घेतला होता, या मोहिमेसाठी   १३ मावळ्यांची  फौज जमा झाली. व न भुतों न भविष्यती घटना एका अवलीयाने करून दाखवली , ती म्हणजे कड्याची सरळधार ९००  फुटाची कंमोडो रॅपलिंग व उर्वरीत ८०० फुटांची साधारण रॅपलिंग  करण्याचे. आपले आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या  वाढदिवशी हि कामगिरी भारताचा तिरंगा व मोदीजींचा बॅनर घेऊन कमांडो  रॅपलिंग करण्याचा अविस्मरणीय  असा पराक्रम फायर ब्रिगेड मध्ये काम करणारा, व ७ जुन २०१७ रोजी अवघ्या
 २२  मिनिटात कोणत्याही साधनसमुग्रीचा वापर न करता लिंगाणा सर केलेला सह्याद्री च्या रांगेतील  आडनावाने ही वाघ असलेला अनिल वाघ  याने हि किमया करून दाखवली.
         या मोहिमेसाठी अनिल वाघ याने खूप मेहनत घेतली. जवळपास २  महिन्यापासून त्याने  खूप तय्यारी सुरु केली हॉती . अहमदाबाद येथील हीना सावलिया पटेल हिला दहा दिवस पुणे येथे प्रशिक्षण दिले , उद्धिष्ट होते महिलांना या श्रेत्रात  काहींतरी नवीन व अनपेक्षित अशी कामगिरी करून दाखवणे.  महिला हि पुरुषांच्या बरोबरीने  सरस कामगिरी करू शकतात हे सिद्ध करणे.
     या मोहिमेचा खर्च हि फार मोठा होता, परंतु हा सर्व खर्च पिंपरी-चिंचवड  पालिकेने केला.


    तसेच ड्रिफ्टर  ट्रेकिंग ग्रुप  शहापूर,


मुंबई चे सदस्य यश जगे, 



प्रथमेश तेंडुलकर,



शंतनू पिसाट,



अक्षय शिंदे,



 सिद्धार्थ गायकवाड 


अवीनाश वाघमारे 


यांनी खूप सहकार्य केले, तसेच त्यांनी या मोहिमेचे  फ़ोटो शूट ही  केले.

 नाशिक हुन आलेला क्षितिज भावसार



 याने उत्तम असे शूटिंग ड्रोनच्या साहाय्याने केले, 

तसेच नवसरी बिल्ली मोरा येथून आलेला पारस पंचाल 

याने सर्व टेक्निकल  जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली. 

महेश घनवट,


विकी आनंदकर , 



विशाल खेतमाळीस ,



सावळा राम बादड ,



 गोरख भांगरे 



व सुशील दुधाणे ,
यांनी मोहीम यशस्वी होण्यास मोलाचा वाटा उचलला. 




    जवळपास  ४ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आम्हाला यात यश आले.



       हि मोहीम सुशिल दुधाणे(मी)  यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.




महेश बढे यांचे विशेष आभार.

     ही मोहीम यशस्वी पणे संपन्न झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे रामकृष्ण मोरे सभागृह येथे मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचा महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.



वरिल कमांडो रॅपलिंग मोहिमेचे कॅमेरा ड्रोन च्या माध्यमातून घेतलेला  वीडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.


Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर