त्रिगुणधारी घाट वाट

त्रिगुणधारी ( डोनेदार ) घाटवाट

रामपूर 
ता : मुरबाड 
जि : ठाणे 
मार्ग : पुणे - जुन्नर - मढ माळशेज घाट - मोरोशी - वैशाखरे - रामपूर .



    हा ट्रेक करण्यासाठी आम्ही  सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे सदस्य १८ ऑक्टोंबर २०१५ रोजी  आळेफाट्यामार्गे न जाता जुन्नरहून गणेशखिंडीतून मढमार्गे माळशेज घाट ओलांडून मोरोशी , वैशाखरेच्या पुढे धसईकडे जाणाऱ्या रस्त्याने,


 शेवटचे गाव रामपूर(ता. मुरबाड, जि. ठाणे) येथे खाजगी वाहनाने प्रवास  करुन  पोहोचलो. 



     या येथे सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे संस्थापक श्री.सुरेंद्र भाऊ दुगड  यांनी ट्रेक विषयी माहिती व काही सुचना दिल्या.



मढ या छोट्या गावातून स्थानिक वाटाड्याला बरोबर घेऊन येथूनच  ट्रेकला सुरुवात केली. 



दहा मिनिटात आम्ही वाघवाडी  वस्ती पाशी पोहचलो.



 वस्तीच्या पाठीमागे दिसणाऱ्या उंचच उंच डोंगररांगेच्या दिशेने भातखाचरांच्या कडेकडेने चालायला सुरुवात केली. 




समोरची ती महाकाय पर्वतरांग उरात धडकी भरवीत होती. आपण नेमके कुठल्या ठिकाणी वर निघणार आहोत हे आमचा  स्थानिक वाटाड्या खाणाखुणांनी दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. डाव्या हाताला दूरवर नाणेघाट नानाच्या अंगठ्याच्या आकारावरून ओळखता येत होता. 


त्याच्या बरेच अलीकडे ऑलटाइम फेमस जीवधन किल्ला ही  दिसत होता.



 खडापारशी / वानरलिंगी ओव्हरलॅप झाल्यामुळे वेगळा
लक्षात येत नाही. त्याच्या अलीकडे दाऱ्या घाटाची वाट दिसत होती. 

उजव्या बाजूला दिसणाऱ्या सर्वात मोठ्या डोंगराला सावित्रीचा डोंगर म्हणतात.


थोड्या वेळातच उजवीकडे दिसणारे नदीचे पात्र व धिम्या गतीने वर  चढणारी वाट हे दोन्ही छानच वाटत होते. साधारण अर्धा - पाऊण तासच  हे निसर्ग सौदर्य आम्हास दिसले. 

व नंतर वाट अचानक वर वर चढू लागली, छातीचा भाता जोरात काम करू  लागला,



 तरीपण ऑक्सिजन कमी  पडतोय असे वाटायला लागले. 


उजव्या बाजूला उतरोत्तर खोल होत जाणारी दरी व समोर निसरडी वाट काहीच सुचत  न्हवते.



 गारवा , सावली , घनदाट जंगल , बऱ्यापैकी रुळलेली पायवाट व खात्रीचा वाटाड्या या जमेच्या बाजू भक्कम असल्यामुळे बरे होते. तासाभरात आम्ही  एका लवणात पोहोचलो. 







आता येथून पुढे वर जाईपर्यंत फारसे  कोठे  फाटे नाहीत,  व वाट  चुकण्याची शक्यता ही न्हवती.  आता समोरची वाट म्हणजे ,  आधीची बरी होती अशी म्हणण्यासारखी होती. डाव्या बाजूला वर नजर पोहोचेल, 


तेथपर्यंत दिसणारा कडा व उजवीकडे वरून खाली प्रचंड वेगाने येणाऱ्या धबधब्याच्या पाण्याच्या वेगामुळे खडक फोडून तयार झालेली वेडीवाकडी दरी.





दोन पायांबरोबर आता दोन्ही हातांचाही वापर करावा येथे करावा  लागत होता.भराभर आम्ही  वरवर जात राहिलो.


 पुन्हा तासाभरात एक मस्त स्वच्छ पाण्याचा साठा व सगळ्यांना बसायला सावली असणारी जागा बघून येथे आम्ही  पेटपूजा उरकून घेतली.


     वाट अशी नव्हतीच, वरून प्रचंड वेगाने येणाऱ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे खडक फुटून झालेल्या विविध आकाराच्या शिळांवरून किंवा अधूनमधून जसे जमेल तसे पुढे-पुढे जात राहिलो. या शेवटच्या टप्प्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून वरून प्रचंड वेगाने वाहत येणारे पाणी एकत्र मिळून खाली वाहत होते,  व त्यामुळेच याला त्रिगुणधारी घाट असेही संबोधले जाते. येथून  पुढची वाट बरीचशी घसाऱ्याची,पण कमी धोक्याची होती. जरी  धडपडलो  तरी पडणार जागेवरच , घरंगळत कडेलोट होणार नाही,अशी वाट  होती.
     
     या येथे आम्हाला दुगड  भाऊंनी स्वता  घरी बनवून आणलेले गरमा गरम सुप दिले.



     ट्रेकचे शेवटचे ठिकाण डोने गाव जवळच आले असावे याची प्रचिती येत होती.
    परत पुढची वाटचाल सुरू ठेवली, मध्ये लागणारी एक वस्ती ओलांडून काही वेळ डांबरी सडकेने चालत आम्ही  जवळजवळ १२ कि.मी. अंतर  व  १००० मीटरची खढी  चढण चढून पुणे जिल्ह्यातील व आंबेगाव तालुक्यातील डोने या  गावात  पोहोचलो.


     बराचसा रस्ता हा डिंभे धरणाच्या पाणीसाठ्याच्या कडेकडेनेच जातो व उजव्या बाजूला सोबत करणारी डोंगररांग अजूनही बऱ्यापैकी वनसंपत्तीने नटलेली दिसते.




वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.









Please Follow above links, share & like

Regards

Sushil Dudhane
9822377653

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर