भटकंती शिडीडाक, चकदेव व पर्वत ची
घाटवाट शिडीडाक , चकदेव व पर्वत
ता : खेड
जि : रत्नागिरी
मार्ग : पुणे - सातारा - आंबिवली.
मेट शिंदी व पर्वत
ता : महाबळेश्वर
जि : सातारा
वासोटा - बामनोली परिसर भटक्यांना कायमच रानभूल पाडणारा . उन्हाळा - पावसाळा - हिवाळा अशा सर्वच परिस्थितीत निसर्गप्रेमी इथल्या दऱ्या खोऱ्यात उनाडत असतात .त्याच रानात काहीसा आडवाटेला असणारा चकदेव मात्र काहीसा उपेक्षित आणि अपरिचित आहे. देश आणि कोकण यांना जोडणारा , पूर्वापार चालत आलेल्या प्रथा परंपरा जपणारा , निसर्गरम्य तितकाच रौद्र असा चकदेव मनाला एक आगळाच तजेला देऊन जातो. जय शंभू महादेव कैलास पर्वतावर असतो. म्हणूनच सहसा सर्व पुरातन महादेव मंदिरे उंच , बिकट डोंगरावर आहेत. महादेवाच्या पुजेचा मान जंगम समाजाला आहे. एकूण ११ शिवपुऱ्या आहेत. त्यापैकी ७ शिवपुऱ्या या जावळीच्या खोऱ्यात आहेत.
धारदेव , तालदेव , मल्लिकार्जुन , पर्वत , चकदेव , मुळेश्वर , गारदेव
या सर्व उंच पर्वतावर आहेत. या सर्व शिवपुऱ्या स्वयंभू आहेत . या सर्व शिवपुऱ्या पांडवांनी एका रात्रीत बांधल्या आहेत, अशी आख्यायिका आहे. चकदेव येथे कार्तिकी एकादशीला मोठा उत्सव भरतो. या चकदेवची अशी आख्यायिका आहे की , पांडव याची निर्मिती करीत असताना पहाटे कोंबड्याने बांग दिली, फक्त नंदादीप पांडवांना बांधता आला नाही. त्यामुळे ते निराश होऊन परत गेले , चकवा लागला म्हणून याचे नाव चकदेव पडले.
हा ट्रेक करण्यासाठी आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे सदस्य ७ जानेवारी २०१७ रोजी ट्रेकला जाण्यासाठी वर दर्शविलेल्या मार्गाने पुण्याहून खाजगी वाहनाने प्रवासास सुरूवात करून ,
आंबिवली येथे पोहोचलो.
गावातील स्थानिक वाटाड्याला बरोबर घेऊन या येथूनच ट्रेकला सुरुवात केली.
सुरुवातीसच दगडी पायऱ्या असलेली वाट सुरू झाली.कोकण भाग असल्याने काही मिनिटातच घामाच्या धारा सुरू झाल्या.
सुरुवातीचे विरळ जंगलाचे दोन डोंगर चढून गेल्यावर,
आम्हाला शिडीची वाट लागली.
शिडी वाट पार करून आम्ही जवळपास चार तासांचे पदभ्रमण करून चकदेव पर्वतावर पोहचलो.
पूर्वी येथे जाड वेलींच्या शिड्या होत्या , म्हणून याला शिडीडाक घाट म्हणायचे. परंतु आता येथे लोखंडी शिड्या लावल्या आहेत.
येथून पुढे आम्ही पाऊण तासात श्री शैल्य चौकेश्वर मंदिरात विराजमान झालो.
या ठिकाणी आम्ही जेवणाचा बेत उरकून घेतला.व थोडा वेळ आराम केला.
थोडा वेळ विश्रांती घेतल्यावार आम्ही पुढे मार्गस्थ झालो. या येथून पुढे आम्ही कंदाटी नदीच्या खोऱ्यात प्रवेश करायला सज्ज झालो. कंदाटी नदी ही कोयणेची उपनदी आहे. डोंगर उतरताना आम्हाला प्रत्यक्ष वेलींनी तयार केलेली जाडजूड व भलीमोठी शिडी डोंगरावर लावलेली दिसली.
डोंगर उतरून आम्ही शिंदी मेट ता. महाबळेश्वर , जि. सातारा येथे पाऊण ते एक तासांच्या अंतराने वळवन जंगम वस्ती येथे पोहचलो.
या ठिकाणी आम्ही आमच्या पहिल्या दिवसाच्या ट्रेकची पूर्तता केली. येथेच टेंट लावुन थकलेल्या शरीराला थोडा आराम दिला.
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सर्व नित्य कर्मे उरकून आम्ही ट्रेकला सुरुवात केली.
आता आमचे लक्ष्य होते पर्वत. साधारणतः एक तासांचे पदभ्रमण करून आम्ही अलीकडील डोंगराच्या पहिल्या धारेवर पोहोचलो.
एखाद्या माचीसारखी ही डोंगररांग दिसत होती. याच धारेवरून तिरपी उंच जाणारी वाट चढताना घामाच्या धारा सुरू झाल्या. धारेच्या दोन्ही बाजूने खाली गर्द झाडी आहेत.
साहजिकच या सर्व गोष्टी निदर्शनास येतात , कारण हेच ते जावळीचे खोरे. अतिशय निबिड अरण्य धार चढून वर आल्यावर हवेत गारवा जाणवला.
साधारणत: दोन तासात आम्ही पर्वतच्या जंगलात प्रवेश केला.
येथून पुढे तासाभरात आम्ही पर्वतवरील जोम मल्लिकार्जुन मंदिरात पोहचलो.
पर्वतपासून पूर्वेकडे वासोटा , पश्चिमोत्तर दिशेला मधूमकरंदगड , दक्षिण पूर्वेकडे महिमंडनगड नजरेस पडतात.
पुन्हा डोंगर उतरून आल्या मार्गेच परत फिरून ठीक मुक्कामाच्या ठिकाणी येऊन आजची भटकंती पूर्ण केली.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
👉 Add me as a Friend
👉 Please Visit
👉 Please Follow
👉 Do Subscribe , Like & Share
👉 Please Follow
Regards
Sushil Dudhane
9822377653
Comments
Post a Comment