लिंगाणा : सह्याद्री च्या रांगेतील प्रत्येक भटक्याचे एक सुखद स्वप्न
लिंगाणा मोहीम स्वप्न पूर्ती
मोहरी गाव
ता : वेल्हा
जि: पुणे
मार्ग : पुणे-नसरापूर-वेल्हे-मोहरी गाव.
लिंगाणा हा रायगड गडाचा उपदुर्ग आहे.मानगड,सोन गड, महिंद्र गड, लिंगाणा,कोकण दिवा हे गड रायगड कडे जाणाऱ्या घाट वाटांवर पहारा देतात.कावळ्या,बोचेघळ ,निसनी, बोराटा, सिंगापूर, फडताड,शेवत्या, मढे घाट या सर्व सह्याद्रीतील घाट वाटांनी खाली उतरुन कोकणात जाता येते. बोराट्याच्या नाळे लगत लिंगाच्या आकाराचा डोंगर आहे.लिंगाच्या आकाराचा हा गड महाडपासून ईशान्येस सोळा मैलावर असून सह्यादीच्या मुख्य रांगेत तोरणा व रायगड यांच्या दरम्यान आहे.या गडाची उंची स.स.पासुन २९६९ फुट आहे. व चढण ४ मैल आहे. तटबंदी पूर्ण नष्ट झाली आहे,या दुर्गावर स्वराज्याच्या शत्रुंना कैदेत ठेवत असे.वरती अतिअवघड अशी वाट नसलेला सुळका आणि घसरडी वाट ,त्यामुळे येथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्तिथीचा परिणाम होऊन कैदी अगदी खचून जात असे.पळून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे.पळण्याचा प्रयन्त केला तर,जीव गमवावा लागत असे.
स्वराज्याचे कारागृह किल्ले लिंगाणा
प्रत्येक ट्रेकर उराशी स्वप्न बाळगून असतो की लिंगाण्याची चढाई उभ्या आयुष्यात एकदातरी करावी.
लिंगाण्याचा आकाशात घुसु पाहणारा सुळका प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतो, जितका तो दिसायला मनमोहक तितकाच रौद्र आणि राकट.
लिंगाणा हा गड महाड तालुक्यात व रायगड जिल्ह्यात येतो.
मित्रांनो असा गड सर करण्याचा मला आज योग आला. खरतर मी हा प्रयन्त प्रथम १४ डिसेंबर २०१४ रोजी केला होता, त्यावेळेस माझा छोटा फॉल झाला होता.फॉल म्हणजे रोप पकडून जात असताना , रोप वरचा हात सटकुन माझा डावा पाय एका मोठ्या दगडावर जोरात आपटला.त्यामुळे माझा पाय जागेवरुन किंचीत ही हलत न्हवता.अशी बिकट परिस्थीती असताना मी पुण्यातील माझे मित्र अप्पा जगताप यांना फोन करुन सविस्तर माहिती दिली.तसेच मोहरी गावातील सरपंच शिवाजी पोटे यांना ही मी फोन वर सर्व हकीकत सांगितली.दोन तासात पुण्याहून माझे मित्र आप्पा जगताप व त्यांचा मित्र आनंदा माळी हे माझ्यापर्यत पोहचलो.आप्पा जगताप यांनी मला खांद्यावर बसवून पायथ्या पासुन पुढे छोटा चढ चढून वरती नेऊ लागले.तितक्यात मोहरी गावातील १० गावकरी माझ्या पर्यत पोहचले.नंतर त्यांनी मला मला डोलीत टाकून बोराट्याची नाळ चढवून मोहरी गावापर्यंत उचलून आणले.त्यानंतर मी पुण्यात आल्यावर दवाखान्यात गेलो, तेथे माझ्या पायाला आठ दिवसांसाठी प्लास्टर घालण्यात आले.एक महिना भराच्या आरामा नंतर पुन्हा मी लिंगाणा सर करण्याचा १५ जानेवारी २०१५ मध्ये प्रयत्न केला. त्यावेळेस मी गुहेपर्यंत ६०० फुटापर्यंत चढाई केली होती.गुहेच्या वरती कठिण असलेला रॉक पॅच मला पार करता आला नाही.गुहेपासुन रॅपलिंग करित मी खाली परतलो. दोन्ही वेळेस अपयश आले तरी मी खचलो नाही.मी माझे आत्मचिंतन केले, मला अपयश का येत होते त्याचे.त्यातून मला जाणवले की प्रस्तरारोहण करताना आपल्या हाता पायात जोर पाहिजे व आपले वजन ही कमी पाहिजे.त्यावेळेस माझे वजन ही खुप होते.त्यानंतर मी माझे वजन १० किलोने उतरविले.पुन्हा एकदा लिंगाणा सर करण्यासाठी सज्ज झालो.
लिंगाणा गडाला भेट देण्यासाठी आम्ही २८ ऑक्टोबर २०१७ रोजी पुण्याहून रात्री खाजगी वाहनाने प्रवासास सुरुवात केली. चेलाडी फाट्यापासुन आत वळुन नसरापूर,वेल्हे मार्गे सिंगापूर गावाच्या फाट्यापासून आत वळुन मोहरी या गावी २९ ऑक्टोबर ला मध्यरात्री ३.३० ला पोहचलो.मोहरी गावात अनु मावशीच्या घरी चहा व नाश्ता करुन बोराट्याच्या नाळीच्या दिशेने निघालो.
मोहरी गावापासुन पुढे १० ते १५ मिनिटांची सपाट चाल चालल्या नंतर बोराट्याची नाळ उतरायला सुरुवात केली.अतिशय खतरनाक अशी ही वाट उतरने, म्हणजे तारेवरची कसरत च म्हणावी लागेल.
मोठ-मोठाली दगड धोंड्याची वाट उतरत असताना अगदी वाट लागली.बोराट्याची नाळ उतरुन मध्यवर्ती भागात पोहचल्यावर उजव्या बाजुला एक वर जाणारी वाट लागली.तेथून वर जाणारी वाट पकडून आम्ही पुढे निघालो.
या येथे एक दगडी रॉक पॅच ट्रॅव्हल्स पार करून जावे लागते.
या येथे रोप ला धरुन पुढे जावे लागले.येथून पुढे थोडा छोटासा चढ चढून वर गेलो.
त्यानंतर लगेचच छोटा उतार उतरून गडाच्या पायथाशी पोहचलो.
येथून पुढचा मार्ग खडतर व अवघड समजला जातो.रोप च्या साहाय्याने वर जावे लागते.
या येथून पुढे चालताना एक पाऊल जरी वाकडे पडले तर थेट यमलोकी मुक्काम हा ठरलेलाच.रोप ला पकडून गेल्यास भिती वाटत नाही.पायथ्यापासुन गडाचा माथा हा जवळपास ९०० ते १००० फुटांचा आहे.रोप ला पकडून वर जात राहिलो.
६०० फुटांवर एक गुहा लागली, याच गुहेत शत्रूंना कैद करुन ठेवले जात असे.
गुहेत थोडा वेळ आराम करुन, पुढे निघालो.येथून पुढचा टप्पा अतिशय अवघड समजला जातो.
अतिशय खढी सरळसोट कातळटप्पा पार करुन जावे लागते.
गौतम इंगवले याच्या मदतीने मी हा टप्पा आरामात पार केला.पाहता पाहता एक एक टप्पा पार करित मी गडाच्या माथ्यावर पोहचलो.
माथ्यावर पोहचताच मी रायगडाला साष्टांग नमस्कार घातला.
आज माझे लिंगाणा सर करण्याचे स्वप्न पुर्ण झाले.दोन वेळा मला हुलकावणी दिली होती गड माथा गाठण्यास.दोन वेळेस अपयश येऊनही मी खचलो नाही.हार मानने व माघार घेणे हे मराठ्यांच्या रक्तातच नाही.
अर्धा तास गडाच्या माथ्यावर थांबलो.संपूर्ण परिसर मन भरुन पाहिला.
रायगड वरच्या जगदीश्वर मंदिराचे मनोभावे दुरुनच दर्शन घेतले.
व नंतर रॅपलिंग करित गडाच्या पायथ्याशी पोहचलो.
त्यानंतर बोराट्याची नाळ चढून मोहरी गावात पोहचलो.
सर्व सदस्य आल्यावर अनु मावशी च्या घरी जेवण करुन पुण्याकडे मार्गस्थ झालो.
अनिल वाघ याच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम मी पार करु शकलो.तसेच गौतम इंगवले याने मला खुप मदत केली.
या मोहिमेत डॉ.अजय इंगळे, निखिल गोसावी, राहुल नलावडे, विठ्ठल कडू , केतन पवार, व इतर सदस्य या सर्वाचा समावेश होता.
सर्व प्रथम लिंगाणा हा गड २५ डिसेंबर १९७८ रोजी मुंबई येथील हॉलिडे हायकर्स ग्रुप च्या सदस्यांनी हिरा पंडित यांच्या नेतुत्वाखाली सर केला होता. या नंतर यांच्याच म्हणजे हॉलिडे हायकर्स ग्रुप चा एक सदस्य संतोष गुजर यांनी २५ डिसेंबर १९७९ साली एकट्याने हि कामगिरी (सोलो ) सर करण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी हि झाले.परंतु उतरत असताना त्यांचा दुर्दवी मुत्यू झाला. त्या नंतर दिलीप झुंजार राव यांनी कोणत्याही साधनसामग्रीचा वापर न करता लिंगाणा सर केला.हा एक विक्रम च झाला होता. त्यानंतर बऱ्याच ट्रेकर्स संस्थेने दोर खंडाच्या साहाय्याने लिंगाण्याच्या माथ्यावर यशस्वीपणे पाऊल ठेवले.
त्यानंतर न भूतो न भविष्यती असा विक्रम एक अवलिया अनिल वाघ याने कोणत्याही साधन सामुग्रीचा वापर न करता ७ जून २०१७ रोजी भर पावसात अवघ्या २२ मिनिटात लिंगाणा सर केला, व २३ मिनिटात खाली पायथ्याशी आला.विक्रम हे मोडण्यासाठीच असतात की काय, याचा प्रत्यय लवकरच आला.सागर नलवडे याने अवघ्या १६.३० मिनिटात कोणत्याही साधनसामुर्गीचा वापर न करता लिंगाणा गडाचा माथा गाठला.
मस्त माहिती
ReplyDeleteमी पन एकदा try fail करून दुसऱ्या वेळेस *💐लिंगाणा*💐 सर केला.
कौतुकास्पद
Deleteखूप सुरेख लिखाण बंधू ...
ReplyDeleteखूपच धीरोदात्त चढाई .. !!!
जरी दोनदा मोहीम अयशस्वी झाली तरीही चिकाटीने तिसऱ्यांदा प्रयत्न करून यश मिळवलेत ..
सिम्पली ग्रेट ... !
मराठ्यांचे रक्त जाणवते आहेच मुळी .. !!
खुप खुप अभिनंदन बंधू ... !!! 👌👌👍👍
धन्यवाद बंधू
Deleteअत्यंत अवघड लिंगाणा व आपण सुरेख वर्णन केले आहे, मलाही तो सर करायची इच्छा आहे
ReplyDelete