सरदार पवार वाडा

              सरदार पवार वाडा
             २३ फेब्रुवारी २०२०

ता : शिरूर 
जि : पूणे 
मार्ग : पूणे -वाघोली -लोणीकंद -शीक्रापुर -रांजणगाव महागणपती -मळठन फाटा-मळठन.
अंतर : ८० किलोमीटर 

    पुण्यापासून ८० किलोमीटर वर  'मलठण' या गावात सरदार पवारांचा एक भव्य वाडा आपले काही अवशेष घेऊन उभा आहे. 

वाड्याचा भव्य दरवाजा त्याला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या तटबंदीच्या भिंती व बुरुज आजमितीस व्यसस्थित पाहावयास मिळतात. 

बांधकाम घडीव दगड व वीटकामातील आहे. दरवाजावर पडिक अवस्थेत नगारखाना आपले अस्तित्व दाखवतो. आत समोर अतिशय सुंदर अशा घडणीचे जोते दिसते. जोत्याच्या मध्यभागी प्रवेशद्वाराच्या खुणा दिसतात. घडीव दगडांच्या भिंती, खांबांचे तळखडे आहेत. इमारतींच्या भिंतींचे अवशेष चारही बाजूंस दिसतात. डाव्या बाजूस तटबंदीलगत एक इमारत सुस्थितीत असून ती परवानगीने ती पाहता येते. आत तळघर, बारव, गच्चीत प्रशस्त खोलीसारखे दालन आहे.
           बाहेरचा दिवाणखाना रेखीव खांब व कमानीयुक्त असून त्याचे जुने सरदारीपण स्वरुप दाखवून देतो. दिवाणखान्याच्या बाजूस देवघर असून दिवाणखान्यात कारंजेदेखील आहे.
           छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वराज्याच्या सेवेत असणाऱ्या , धार  येथून आलेल्या पवार मंडळींनी राजाराममहाराजांच्या कारकिर्दीत पराक्रम केला आणि 'विश्वासराव' हे पद प्राप्त केले. त्यांचे याच मलठण गावात दोन वाडे असून कवठे यमाई, व आमदाबाद (शिरुर) येथे भव्य वाडे आहेत.


    मित्रांनो आज मला माझा सार्थ अभिमान वाटतो कि आज माझ्या पाहण्यात पवार वाडा आला.माझे मुळ आडनाव पवार आहे.आमचे आजोबा, पणजोबा हे कधी काळी दूध विकत असे , म्हणुन आमचे आडनाव दुधाणे पडले, असे मला समजले होते.मी आत्तापर्यंत बराच शोध घ्यायचा प्रयत्न केला पवार घराण्याचा , इतिहास कालीन आमचे काही योगदान होते का ते.पण आज मळठन येथील पवार वाडा पाहिल्या नंतर खरा इतिहास पवार घराण्याचा मला समजला.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर