सफर साठीपायरी घाट वाटेची
साठीपायरी /सात पायरी घाट वाट
अदरवाडी,तम्हिनी.
ता: मुळशी
जि : पुणे
सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन बरोबर माझे खुप जुने स्नेह आहे.जवळपास एक वर्षांनंतर मला ग्रूप बरोबर ट्रेक करण्याचा योग आला.मागील एक वर्षभर मी दुर्ग भ्रमंती, अभ्यास मोहीम अश्या अनेक मोहिमेमध्ये व्यस्त असल्याने, व या ग्रुप चे बरेचशे ट्रेक माझे झालेले असल्याने मी ग्रूप बरोबर ट्रेक करायला जात न्हवतो.पण दोन-तीन दिवसांपूर्वी मेसेज आला सातपायरी घाट वाटेचा, मग काय लगेच नावनोंदणी करून टाकली , कारण हा ट्रेक मी केलेला नसल्यामुळे , व सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन या संस्थेने देखील हा ट्रेक केला न्हवता.
२५ ऑगस्ट २०१९ रोजी पहाटे ४ वाजता सिंहगड रोड, हिंगणे खुर्द येथून प्रवासास सुरुवात केली. पुणे-चांदणी चौक-पिरंगुट-मुळशी-ताम्हीनी गाव-या मार्गाने डोंगरवाडी च्या पुढे चार किलोमिटर असलेले ,
अदरवाडी या गावात पुण्याहून ८५ किलोमीटर अंतर गाडीने प्रवास करून पोहचलो.
अदरवाडी या गावात ५० ते ५५ कुटुंब राहतात.गावात बामगुडे, गव्हाणे , शिंदे ,भामे, येनपुरे , शेलार , बहिरट , ठोकले , चोरगे , दिघे , गुंड , मारणे, ढमाले अशी कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. अदरवाडी या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे या गावातून आपण साठीपायरी या घाट मार्गाने उतरून रायगड जिल्हय़ात म्हणजे कोकणात प्रवेश करतो.आजच्या ट्रेक मधे एकूण ९० सदस्य सहभागी झाले होते.
अदरवाडी या गावातून स्थानीक सोबती राजू यांना बरोबर घेऊन ट्रेक ला सकाळी ९.१५ वाजता सुरुवात केली.
अदरवाडी येथून डांबरी रस्त्याने ४५० मीटर वर हॉटेल पिकनिक पॉइंट च्या उजव्या बाजुने ट्रेकची सुरुवात होते.साधारणतः १० ते १५ मिनिटे सपाटीभागातून चालून आपण साठीपायरी घाट वाट , याला सातपायरी घाट वाट अश्या नावाने ओळखले जाते.
साठीपायरी घाट वाट उताराच्या दिशेने उतार उतरायला सुरुवात करतो.
श्रावण महिना असल्याने या दिवसात पावसाचा जोर जास्त नसतो.हवेतील आद्रतेचे प्रमाण जरा जास्त होते.उतार अतिशय त्रिव स्वरूपाचा सुरू झाल्याने,अत्यंत सावध पणे व आवश्यक ती खबरदारी घेत उतार उतरायचा.
साधारणतः ३.३० किलोमीटर वर जवळपास ३०० ते ३५० फुटावरून खाली कोसळणाऱ्या अजस्त्र अश्या धबधबा च्या कुंड्यापाशी आपण पोहचतो.
बरयाच सदस्यांनी या ठिकाणी डुंबण्याचा आनंद घेतला.आम्ही मात्र पुढे निघालो.
येथून ५०० मीटर वर वर दुसरा धबधबा नजरेस पडला.
त्या ठिकाणी आम्ही गेलो.या येथून म्हसेवाडी कडे जाणारी वाट लागते. या येथून पुढे आपण रायगड जिल्हय़ात प्रवेश करतो.आम्ही मात्र पुढे गेलो नाहि.कारण आमचा ट्रेक या येथेच पूर्ण करून , परत आल्या वाटेने वर जाऊन अदरवाडी येथे पूर्ण करायचा होता.
या येथेच आम्ही पेटपुजा उरकून घेतली.या येथुन डावीकडची वाट मसेवाडी येथे जातो , तर उजवीकडची वाट वीळे या गावी जाते.या येथेच आम्ही स्थानीक सोबती राजू ला निरोप दिला.या येथून पुढे जवळपास बारा वाड्या लागतात.यात प्रामुख्याने सणसवाडी , कोलवाडी व नंतर आडनावाने वाड्या लागतात.
या येथे अदरवाडी वरून आपण जवळपास चार किलोमीटर चे पदभ्रमण करून पोहचतो.या येथे पोहचायला आम्हाला जवळपास अडीच तास लागले.
या येथे पेटपुजा उरकून आम्ही साठीपायरी घाट चढण्यास सुरुवात केली.
आता मात्र, सुरवातीस जो घाट उतरून आलो होतो , तोच घाट वर चढून जाण्याचे मोठे आव्हान होते.घाट चढताना खूपच दमछाक होत होती.
अतिशय खढी चढण असल्याने,
त्यात पाऊस नसल्याने अंगातून घामाच्या धारा सुरू झाल्या.आता मात्र पाण्याची कमतरता जाणवू लागली.घाट काही संपता संपत न्हवता.चढ चढून काही अंतरावर आम्ही थोडी चढण चढली कि काही श्रणभर विश्रांती घेऊन पुढे जात राहिलो.
दुपारी अडीच च्या दरम्यान आम्ही ८ किलोमीटर चे पदभ्रमण व सहा तासांच्या अथक परिश्रमाने अदरवाडी येथे पोहचलो.
या येथे जेवण्याच्या आस्वाद घेऊन आम्ही ४.३० वाजता पुण्याकडे मार्गस्थ झालो.
असा हा अपरिचित ट्रेक आम्ही यशस्वीपणे पुर्ण केला.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Comments
Post a Comment