शिंदे छत्री


           सरदार महादजी  शिंदे छत्री 
                वानवडी,पुणे.

      पुण्यात काही- काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत जिथे आजपर्यत आपण कधी गेलेलो 
 नसतो.
पुण्यातच आहे ना? मग बघू जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जाऊ असे नेहमी पुणेकर मंडळी म्हणताना,आपण नेहमी पाहत,ऐकत असतो.
     या पैकी पुण्यात असलेले हे ठिकाण  वानवडी येथील पेशवाईतील मातब्बर सरदार 'महादजी शिंदे' यांची समाधी/छत्री आहे. 
       स्वारगेट हुन हडपसर च्या दिशेने जाताना आपणाला  रेसकोर्स मैदान लागते, त्याच्या पुढे लगेच भैरोबानाका लागतो, भैरोबा नाक्याच्या पुढे   फातिमानगरचा बिगबाझार  पासून वानवडीकडे जो  रस्ता जातो,हॉटेल शिवसागरच्या चौकातून  उजवीकडे वळुन पुढे गेल्यावर ४०० ते ४५० मीटरवर  डावीकडे शिंदे छत्री ची  वास्तू दिसते. बाहेरून गेटपर्यंत जाईपर्यंत ही वास्तू जाणवतच नाही. छोटी घरं, मंदिर यांचे दर्शनच होते. 

मुख्य दरवाज्यात गेल्यावरच संपूर्ण दर्शन होते.


   पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे. 

महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले. शिंद्यांची छत्री हे महाराष्ट्राच्या पुणे शहराजवळील वानवडी येथे बहिरोबा नाल्याच्या काठावर असलेले स्मारक आहे. हे स्मारक इ.स.च्या १८व्या शतकातील मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी सेनानी महादजी शिंदे यांच्या स्मृत्यर्थ बांधले गेले आहे. 

इ.स. १७९४ सालाच्या सुमारास वर्तमान शिंद्यांच्या छत्रीच्या जागी महादजीने बांधवलेले शिवालय होते.


 महादजी शिंदे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे  अंत्यसंस्कार याच जागेत करण्यात आले. 

समाधीच्या बाजूला मोठे शिवमंदिर आहे. 


मंदिरावर अप्रतिम नक्षीकाम व रंगकाम केलेले आहे.



    राजस्थानी शैलीने बांधकाम केलेली ही वास्तू, 'वास्तू-हर' शास्त्राप्रमाणे बांधली आहे.   


मंदिरावर ऋषी-मुनींचे पुतळे पिवळ्या खडकातून कोरलेले आहेत.


 मंदिराचा हॉल मोठा असून,

 त्यात शिंदे घराण्यातील सदस्यांचे तैलचित्र लावलेले  आहेत, या मधे माधवराव सिंदियांचे ही तैलचित्र आहे.
 स्मारकाच्या पुनर्बांधणीकरिता ग्वाल्हेरच्या श्रीमंत माधवराव शिंद्यांनी देणगी दिली आहे. पानिपतच्या तिसर्‍या लढाईनंतर महादजी शिंदे यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौजांनी काही लढायांमध्ये ब्रिटिशांचा निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. १२ फेब्रुवारी इ.स. १७९४ रोजी वयाच्या ६७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर