खंडोबा डोंगर परिक्रमा
श्री.खंडोबा डोंगर परिक्रमा
रायकर मळा, धायरी, पुणे.
सिंहगड रोड हिंगणे खुर्द,पुणे येथून ८ किलोमीटर अंतरावर असलेले खंडोबा डोंगर येथे खंडोबाचे प्राचीन म्हणजे साधारणतः ३५० वर्षापूर्वीचे मंदिर आहे. स्थानिक गावातील लोकांना हे मंदिर माहिती आहे. येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव भरतो. रायकर मळ्यातून पुढे गेल्यावर ,एक वाट डावीकडे थेट १ किलोमीटर अंतरावर मंदिराकडे जाते. व उजव्या बाजूने पायवाटेने डोंगराची परिक्रमा करण्यासाठी जाते. ट्रेकर्स मंडळींना ही वाट फारशी परिचित नसलेली आहे. आम्ही २३ एप्रिल २०१७ रोजी शशी उत्तेकर, डॉ.विनोद मेहता , व मी सुशील दुधाणे ही परिक्रमा करण्यासाठी निघालो.
उजवीकडच्या पायवाटेने डोंगराची परिक्रमा करण्यासाठी पहाटे ६.३० वाजता पदभ्रमणाला सुरुवात केली.
वाटेत आमराई लागली.
तेथून पुढे छोटे- मोठे डोंगर पार करावे लागले.
वाट खूपच चांगली आहे,
जनावरे या वाटेने जातात.
थोडी विश्रांती घेत न्याहारी करून पुढे चालू लागलो.
११ वाजता आम्ही खंडोबा मंदिरात पोहचलो.
मनोभावे दर्शन घेतले व रायकर मळ्याच्या दिशेने मार्गक्रमण चालु केले. दुपारी १२.१५ वाजता रायकर मळ्यात पोहचलो.व नंतर पुण्याकडे मार्गस्थ झालो. साधारणतः ५.३० तासांचा व अंदाजे १२ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन ही परिक्रमा पुर्ण झाली.
Comments
Post a Comment