पांडव लेणी, नाशिक
पांडव लेणी, नाशिक
८ मार्च २०२०
गडगडा किल्ला पाहुन आम्ही पांडव लेणी पहावयास गेलो.
नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.
महाराष्ट्र हे बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असणारे राज्य आहे.
महाराष्ट्रातील त्रिरश्मी लेणी ही नाशिकमधील लेणी आहेत.
त्रिरश्मी बौद्ध लेणी ही सुमारे इ.स. पूर्व २०० च्या दरम्यान खोदलेल्या बौद्ध लेणी आहेत.
भारत सरकारने या लेण्यांना महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक ३ एप्रिल, इ.स. १९१६ रोजी घोषित केलेले आहे.
सातवाहन राजांनी या लेणी खोदण्यासाठी वेळोवेळी दान दिले असा उल्लेख येथील शिलालेखात आढळून येतो.
सातवाहन आणि क्षत्रप या राजवंशाने लेणी कोरण्यास अमूल्य योगदान दिलेले आहे. शिलालेख हे त्रिरश्मी लेण्यांचा इतिहास सांगणारा महत्वाचा स्रोत आहे.
नाशिक या भूभागावर सातवाहन राजांचे अधिराज्य असल्याचे पुरावे पाहायला मिळतात. नाशिक चा उल्लेख शिलालेखातून पाहायला मिळतो.
यात अनेक लेणी असून काही लेण्यांत स्त्रियांचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय कलाकुसरीनी कोरलेली आहेत. या गुहांमध्ये संपूर्ण सुस्थितीतले एक प्रमुख चैत्यगृह आहे. त्याचे पूर्व दिशेचे प्रवेशद्वार चांगल्या स्थितीत आहे.
या लेणी पाहण्यास फी आकारली जाते. तसेच या टेकडीवर प्राचीन काळी केलेली पाण्याची टाके आहेत, परंतु ही पिण्याच्या पाण्याची सोय नसू शकते.
या टेकडीवर आता वनखात्याने वृक्षराजी वाढवली आहे.
त्रिरश्मी लेण्यांवरून नाशिक शहराचे विहंगम दृश्य दिसते. टेकडीखाली बुद्ध विहार व दादासाहेब फाळके स्मारक आहे. त्रिरश्मी बौद्ध लेण्यांवर जाण्यासाठी पायऱ्यांची बांधलेली वाट आहे. वर चढण्यास सुमारे ३० मिनिटे वेळ लागतो.
लेणी पाहुन आम्ही लेणीच्या पायथ्याशी असलेल्या महानगर पालिकेच्या जलतरण तलावात मानसी नव्वद रु.फी भरून प्रवेश केला.व मनमुराद जलतरणाचा आनंद लुटला.










Comments
Post a Comment