भटकंती: अपरिचित व दुर्लक्षित वाटेची
भटकंती दुर्लक्षित वाटेची
(आगलंबे ते उरवडे)
ता : हवेली
जि : पुणे
मार्ग : स्वारगेट, डेक्कन , वारजे , उत्तमनगर , एन.डी.ए., कूडजे , आगलंबे गाव.
या ट्रेकला जाण्यासाठी आपण खाजगी वाहनाने न जाता , मार्केट यार्ड पुणे येथुन पहाटे ५ वाजता पहिली बस , व नंतर ८.४५ वाजता च्या मार्केट यार्ड ते आगलंबे या बस ने जाऊ शकता.ही बस स्वारगेट , नीलामय चौक , डेक्कन(सावरकर पुतळा ) , वारजे , उत्तमनगर या मार्गाने जाते.
आगलंबे गावातून च ट्रेकला सुरुवात करावी.या येथे श्री.मळाई देवीचे मंदीर आहे.
त्याच्या जवळच दगडी बांधकामाची सुंदर विहिर आहे.
आम्ही सुध्दा हा प्रवास पी.एम.टि ने च केला.बापूजी देव मंदिराची वाट विचारून पुढे जायचे.
या येथुन वाट व्यवस्थित आहे , चुकन्याची शक्यता नाहि.पाऊण तासात आपण मालवाडी येथे पोहचतो.मालवाडी येथुन उजव्या बाजूने चढण सुरू होते.मालवाडी येथे चौकशी करून बापूजी देव मंदिराची वाट विचारावी.
येथुन मात्र घाम काढणारी चढण ची वाट सुरू होते.
जंगलातील वाट असल्याने सावली आपली साथ सोडत नाहि.
आगलंबे पासून २ तासांचे व ४.५० किलोमीटर पदभ्रमण करून आपण धनगरवाडी येथे पोहचतो.
दहा ते बारा घरांची ही वाडी आहे.या वाडीत वीज अद्याप पोहचलेली नाहि.सौर दिवे आहेत येथे.खरात , ढेबे , मरगळे या आडनावाची लोकं येथे गुण्यागोविंदाने राहतात.येथील मुले उरवडे येथे सहा किलोमीटर चालून रोज शाळेला जातात.धनगर वाडीतून स्थानीक माणूस बरोबर घेऊन पुढील वाटचाल करावी.
आम्ही समीर खरात हा १३ वर्षाच्या ई.८ वीत शिकत असलेल्या मुलाला बरोबर घेउन पुढे मार्गस्थ झालो.
येथे जवळच पंधरा वीस मिनीटावर बापूजीदेव यांचे मंदिर आहे.दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ व्हावे.
दहा ते पंधरा मिनिटांची सपाट वाट लागते.
येथुन पुढे पाऊण तास व २ किलोमीटर चे पदभ्रमण करून आपण गवळी वाडा येथे पोहचतो.या ठिकाणी फ़क्त एकच घर आहे.येथुन दहा ते पंधरा मिनिटांत आपण,
एका छोट्या ओढ्यापाशी पोहचतो.
या येथे आपण पेटपुजा उरकून घ्यावी.थोडा आराम करून पुढे मार्गस्थ व्हावे.
येथुन पुढची वाट उताराची चालू होते.
साधारणतः येथुन दोन किलोमीटर वर आपणाला,
म्हसोबा मंदिर लागते.
येथुन पुढे थोड्याच अंतरावर आपणाला बोतरे वाडी लागते , गाव आत मधे आहे, आपण गावाकडे न जाता सरळ वाट पकडून पुढे जावे.बोतरे गाव मोठे आहे , जवळपास दोनशे च्या वर घरे आहेत.येथुन पुढे सव्वा किलोमीटर वर शेलार वाडी लागते.येथुन पुढे ३०० मीटर वर उरवडे गाव लागते.
या येथे आपला ट्रेक जवळपास पाच तास व ११.३० किलोमिटर चे पदभ्रमण आणि १००० मीटरची चढाई -उतरायी करून पूर्ण पूर्ण होते.
खूप छान अशी आपली भटकंती होते.या वाटेने सहसा ट्रेकर्स मंडळी जात नाहीत.भटक्या मंडळीनी हा ट्रेक जरूर करावा.एक दुर्लक्षित व अपरिचित असा ट्रेक आहे.
उरवडे येथुन टमटम(वडाप) या वाहनाने घोरावडे फाटा येथे यावे.येथुन स्वारगेट ला जायला सहज गाडय़ा उपलब्ध होतात.
ही भटकंती आम्ही १७ नोव्हेंबर २०१९ रोजी केली.
आजच्या मोहिमेत श्री.जगन्नाथ पारगे , श्री संभाजी नवले , श्री.बाळासाहेब खेसे व मी सुशिल दुधाणे यांचा सहभाग होता.




















Comments
Post a Comment