भटकंती अपरिचित व दुर्लक्षित घाटवाटची
भटकंती अपरिचित व दुर्लक्षित घाट वाटेची
( मुठा खिंड ते उरवडे )
ता : मुळशी
जि : पुणे
मार्ग : स्वारगेट (पुणे )-पौड रोड -चांदणी चौक -भुगाव-पिरंगुट -घोटावडे फाटा -उरवडे -मुठा खिंड.
पायथ्याचे गाव : मुठा खिंड ५७७ मीटर (१८९२ फुट )
स.स.पासून उंची : ९३२ मीटर (३५४१ फुट धनगर वाडा टॉप )
प्रत्यक्ष चढाई : ३५५ मीटर (११६४ फुट )
हा ट्रेक करण्यासाठी आपल्या कडे खाजगी वाहन नसले तरी चालते.स्वारगेट वरून पहाटे ६ .३० वाजता लवासाला जाण्यासाठी एस.टि.महामंडळाची गाडी पकडायची.वर दर्शविलेल्या मार्गाने मुठा खिंड येथे उतरावे.
या येथे हॉटेल निसर्ग आहे, बाजुला एक छोटे मंदीर ही आहे,
या हॉटेल च्या समोर च्या बाजुला जो डोंगर लागतो ,
तेथूनच ट्रेकला सुरुवात करावी.वाट अतिशय मळलेली आहे.स्थानीक सोबतीला बरोबर न घेता सुद्धा तुम्ही हा ट्रेक करु शकता.
सुरुवाती पासूनच खढि चढणाला सुरुवात होते.
साधारणतः अर्धा तास व एक किलोमीटर चा चढ चढून आपण,
पहिल्या डोंगरावर पोहचतो.
त्यानंतर सपाट भागाला सुरुवात होते.जवळपास पाऊण किलोमीटर व,
अर्धा तासांचा सपाट भाग आहे.
पावणे तिन (२.७५ ) किलोमीटर पदभ्रमण करून आपण एका सध्या वापरत नसलेल्या,
गोठ्यापाशी पोहचतो.
हा गोठा बबन रामभाऊ डोईफोडे यांच्या मालकीचा आहे.या भागात खाजगी प्लॉट खुप प्रमाणात नजरेस पडतात.गोठ्यापासून १ किलोमीटर वर उरवडे धनगर वाडा लागतो.या ठिकाणी तिन धनगर वाडे आहेत,
सोनाबाई लक्ष्मण मरगळे , पप्पू विठ्ठल खरात व सोमजि विठ्ठल मरगळे ही त्यांची नावे.
या ठिकाणी विजेची सोय नाहि , प्यायला पाणी ही खुप दूरवरून आणावे लागते.गुर-ढोर येथे असल्याने या कुटुंबाना येथेच नाईलाजास्तव रहावे लागते.यांची बरीचशी मंडळी उरवडे गावात राहायला गेली आहेत.मित्रांनो आपण कधी या ठिकाणी ट्रेक ला आलात तर , आपल्या कडील न वापरात असलेल्या जुन्या किंवा नवीन साड्या , लहान मुला-मुलींचे ड्रेस अवश्य सोबत आणा व या ठिकाणी जरूर द्या.येथे त्यांनी आमचा योग्य तो पाहुनचार केला , व आम्हाला दूध ही पिण्यास दीले.त्यांचे आभार मानून आम्ही उरवडे गावाच्या दिशेने निघालो.ज्या ठिकाणी आपल्याला पहिला गोठा लागला होता , त्या ठिकाणाहूनच खाली उतरायला सुरुवात करायची.साधारणपणे पावणे दोन किलोमीटर अंतर पदभ्रमण केल्यावर आपणाला अजुन एक,
उतरती मार्गाला धनगर वाडा लागतो.

खाजगी मालकीचे साई बाबा मंदिर लागते.
मंदिरातील साईबाबांची संगमरवरी त असलेली मूर्ती खूपच सुंदर आहे.या येथेच आम्ही पेटपुजा व थोडी विश्रांती घेतली.नंतर उरवडे गावाकडे प्रस्थान केले.साधारणतः पावणेपाच (४.४५ तास व ८.३० किलोमीटर चे पदभ्रमण करून ,
उरवडे या गावी पोहचलो.
उरवडे गावात काळभोर वाडी , चोरगे वाडी , बोथल वाडी , गोंधळ वाडी , गाडे वाडी , शेलार वाडी , आंबेगाव तलाव , भिलारे वाडी व बळकवडे वाडी या सर्व वाड्या लागतात.उरवडे गावातून टमटम पकडून घोटावडे फाटा येथे यावे.या ठीकाणाहून स्वारगेट ला जायला बस व एस.टि.उपलब्ध होतात.
अश्या प्रकारे आम्ही आज अपरिचित व दुर्लक्षित अशी घाट वाट पादाक्रांत केली.या वाटेने फक्त स्थानीक गावकरी च जातात.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या वाटेने फक्त तुम्हीच येथे आलात , असे समजले.
अश्या प्रकारे आम्ही आज अपरिचित व दुर्लक्षित अशी घाट वाट पादाक्रांत केली.या वाटेने फक्त स्थानीक गावकरी च जातात.गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या वाटेने फक्त तुम्हीच येथे आलात , असे समजले.
मित्रांनो आपण ही हा ट्रेक जरूर करावा.हा ट्रेक आम्ही १ मार्च २०२० या दिवशी केला.
आजच्या मोहिमेत श्री.जगन्नाथ पारगे , सुनील घम व मी सुशिल दुधाणे यांचा विशेष सहभाग होता.
आजच्या ट्रेकचा स्वारगेट ते स्वारगेट खर्च फक्त ८०
रु.(एस.टि.तिकीट , बस तिकीट , टमटम सर्व मिळून).

















Comments
Post a Comment