श्री रेणुका माता मंदिर सोनई

श्री रेणुका माता मंदिर सोनई 
     ८ सप्टेंबर २०१९


   ता : नेवासा 
   जि : अहमदनगर 

     

        नेवासा तालुक्यातील  पाहण्याजोगे ठिकाण म्हणजे श्री रेणुका माता मंदिर सोनई  हे जागृत देवस्थान आहे.


सोनई नजीक बेल्हेकरवाडी येथे,

 हे काच मंदिर आहे


 श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पासून ७ की. मी. अंतरावर रेणुकादेवी मंदिर आहे. सन १९५४ मध्ये श्री अण्णा स्वामी महाराजांना संचार होऊन जगदंबा भगवतीने संदेश दिला कि - तुमच्या सोनई च्या वडिलोपार्जित भूमीत मी प्रकट होईन तेथे मंदिर स्थापून माझी प्राणप्रतिष्ठा करा व भक्तीने सेवा उपासना करा. उज्ज्वल भविष्यकाळ निकट येत आहे.
श्री क्षेत्र रेणुकामाता दरबार परिसरात अन्य काही देवतांची स्थापना केलीली दिसून येते

 विशेषतः जलदेवता, नागदेवता, काळभैरव, सप्तयोगिनी, श्री दत्तात्रय, औदुंबर, छाया , वेताळ , चतुराई ईत्यादि . 

मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारावर सन १९९१ मध्ये श्री दुर्गामातेची ८ फुटाची प्रसन्न मूर्तीची स्थापना केलीली आहे. मंदिरात वर्षभर उत्सव साजरे केले जातात. त्या पैकी वासंतिक नवरात्र, गुरुपोर्णिमा , शारदीय नवरात्र या उत्सवांना भाविकांची अलोट गर्दी असते.

     रेणुका माता भगवान परशुरामची आई


 (भगवान विष्णूचा सहावा अवतार) आहे. शनिशिंगापूर शनि मंदिराजवळ एक सुंदर रेणुका माता मंदिर आहे.
   मचेंद्रनाथजींनी या भूमीवर सोन्याचा एक घन तुकडा टाकला आहे आणि हेच नाव कायम राहिले आणि सोनई म्हणून लोकप्रिय झाले.

Comments

Popular posts from this blog

पद्भ्रमण ठोसेघर ते जुंगटी

कान्हुर पठार

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर