लवासा ते नीलकंठेश्वर मंदीर
भटकंती...श्रावण महिन्यातील ' लवासा ते निलकंठेश्वर'
लवासा.
ता: मुळशी,
जि: पुणे
हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला,
तांबुस कोमल पाऊल टाकीत,
भिजल्या मातीत श्रावण आला
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या काव्यपंक्ती आज आवर्जून आठवतायत... ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा, तनामनात चैतन्य फुलविणारा, पाचूसारखा हिरवागार श्रावण आजपासून सुरू होत आहे. सण-उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाच्या स्वागतासाठी सृष्टी सजली आहे. पावसाची आषाढ-झड थांबली आहे. बालकवींनी म्हटल्याप्रमाणे,
श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरूनि ऊन पडे
असे रमणीय वातावरण आसमंतात आले आहे.
श्रावण हा भारतीय वर्षगणनेतील पाचवा महिना. पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव. चातुर्मासातील श्रेष्ठ मास श्रावण म्हणजे सणसमारंभांच्या रूपाचे चैतन्यपर्व. शुद्ध आणि सात्त्विकतेचे आवरण पर्यावरण. प्रत्येकाच्या मनात श्रावणाचे रंग वेगळे असतात. महाराष्ट्राचे वाल्मीकी महाकवी ग. दि. माडगूळकरांचे,
‘बरसू लागल्या रिमझिम धारा,
वारा फुलवी मोरपिसारा,
हलू लागली झाडे वेली नाच सुरू जाहला’
श्रावण मासी हर्ष मानसी
क्षणात ऊन, श्रणात पाऊस.
श्रावण महिना चालू झाली की पावसाचे रूप बदलते, श्रणात पाऊस, तर श्रणात ऊन असे निसर्गाचे चक्र चालू होते.
ट्रेकर्स या शब्दाची व्याख्या प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करीत असतो, काही जण म्हणतात की हा उगीचच भटकत असतो, तेच डोंगर, तोच निसर्ग, त्यात काही बदल नाही. उगीचच पावसात भिजायचे, व नंतर आजारी पडायचे हि सर्वसामान्य लोकांचा ट्रेकर्स बद्दल असलेला गोड गैरसमज.
मित्रांनो खरे ट्रेकर्स काही हटके स्वरुपाचा असतात. प्रत्येक वेळेस निसर्गाचे रुप बदलत असते, तोच तोच पणा नसतो, निसर्गाचे रूप पावसाळा चालु असताना बघण्यासारखे असते, खरे सांगायचे तर बघण्याची नजर च तशी असावी लागते.ती नजर खऱ्या ट्रेकर्स मध्ये आपणाला पाहावयास मिळते.
श्रावण महिन्याचे औचित्य साधून सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन ने लवासा ते नीलकंठेश्वर हा ट्रेक आयोजित केला. ३० जुलै २०१७ रोजी पहाटे खाजगी वाहनाने आम्ही प्रवासास सुरुवात केली.
पुणे,चांदणी चौक, भुकूम मार्गे लवासा येथे पोहचलो.
ट्रेक सुरु करण्याच्या अगोदर भगवान चवले यांनी ट्रेकविषयी सुचना व मार्गदर्शन केले.
लवासा येथूनच ट्रेकला सुरुवात केली.
ट्रेक च्या सुरुवातीस थोडा पाऊस पडला, नंतर ऊन पावसाचा खेळ चालू झाला.
साधारणतः तासाभराचे पद्भ्रमण करुन आम्ही रामनगरच्या धनगर वाड्यापाशी पोहचलो.
आज आम्ही सह्यादी ट्रेकर्स फाऊंडेशन चे प्रमुख सुरेंद्र भाऊ दुगड यांच्या अनुपस्थित हा ट्रेक सुरु केला.आजच्या ट्रेकचे नेतृत्व भगवान चवले व विजय बुटाला यांनी केले.
पावसाचा जोर कमी असल्याने,पद्भ्रमण मार्गावर खूप चिखल झाला होता.
वाट खुपच घसरनीची झाली होती. बरेच सदस्य पडत-धरपडत मार्गक्रमन करित होते.
मज्जा मस्ती, फोटो सेशन करित आम्ही निसर्गाचा मनमुराद आनंद घेत पद्भ्रमण करित राहिलो.
मजल-दर मजल करित भोंडे, वातुंडे, मालेगाव,कोंदण अश्या वाड्या पादाक्रांत करीत आम्ही निलकंठेश्वर (ता : हवेली, जि : पुणे) येथे पोहचलो.
५.३० तासांत व १८ किलोमिटर चे पद्भ्रमण करुन पोहचलो.

आजच्या ट्रेकमध्ये एकुण ९२ सदस्य सहभागी झाले होते. वय वर्ष ११ ते वय वर्ष ७१ या सर्व वयोगटातील सदस्यांचा समावेश होता.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Comments
Post a Comment