सह्यादीच्या मावळ्या व रनरा गिनिंनी 'सारपास' शिखरावर फडकवीला भगवा व राष्ट्रध्वज
सह्यादीच्या मावळ्या व रनरागिनिंनी 'सारपास' शिखरावर फडकवीला भगवा व राष्ट्रध्वज
हीमाचल प्रदेशमधील अत्यंत कठीण समजला जाणारा ट्रेक पास करण्यासाठी आम्ही पुण्यातील १८ सदस्यांनी १३ मे २०१८ ला प्रवासास सुरवात केली , १५ मे ला कसोल या बेस कॅम्पच्या ठिकाणी पोहचलो .
१६ मे ला ट्रेकला कसोल ( १५२६ मीटर ५००५ ) येथून सुरवात केली.
जवळपास तीन किलोमीटर सपाट पदभ्रमण केल्यानंतर छोट्या मोठ्या प्रमाणात चढ - उतार सुरू झाले.
मज्जा-मस्ती करीत आम्ही १४ किलोमीटर अंतर साडेचार तासांत पुर्ण करित ग्रहण ( २२७८ मोटर ७४७२ फूट ) या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो.
१७ मे ला सकाळी ८ वाजता ग्रहण येथून ट्रेकला सुरवात केली.
सुरवातीपासून खडी चढण सुरू झाली.खूपच अंगावर येणारी खढी चढण, त्यात काही ठिकाणी सरळसोट वाट होती.
प्रत्येक पाऊल श्वास घेऊन टाकावे लागत होते. साडेचार तास पदभ्रमण करून आम्ही फक्त ३ किलोमीटर अंतर पार करून,
मीन थास ( ३१५५ मीटर १०४३८ फूट) येथे पोहचलो.
सर्वाची पुरती झाली दमछाक झाली होती.
१८ मे ला सकाळी ९ वाजता मीन थास येथून ट्रेकला सुरवात केली.
एकदम खढी चढण सुरू झाल्याने, प्रत्येक जण ठरावीक मिनिटांच्या अंतरावर विश्रांती घेत पुढे निघत होते.
पदभ्रमण मार्गावर बरेच ट्रेकर भेटत होते, गप्पागोष्टी मारत आम्ही थकलेल्या अवस्थेत,
नगारू ( ३८११ मीटर १२५०० फूट ) या ठिकाणी चार तास चालून अडीच किलोमीटर अंतर पार करुन पोहचलो.
१९ मे ला पहाटे ५.३० ला आम्ही सार पासच्या दिशेने निघालो.
एकदम खढी चढण, त्यात काही ठिकाणी बर्फ असलेल्या मार्गावरून वाट काढत पुढे जात होतो .थोड्या वेळानंतर म्हणजे अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पूर्ण बर्फ़ाची वाट सुरू झाली.आता मात्र बरेच जणांची अवस्था बिकट झाली होती.
बर्फावरून चालताना नाकीनऊ आले.
सारखे पडत -उठत, एकमेकांना सावरत आम्ही ज्यासाठी केला होता अट्टाहास, ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो,तो क्षण आला सकाळी ७.१५ वाजता आम्ही,
सार पासच्या ( ४२०८ मीटर १३४७५ फुट ) माथ्यावर दीड किलोमीटर अंतर पार करून पाऊल ठेवले.
मग काय एकच जल्लोष ' शिवाजी महाराज की जय, 'जय भवानी जय शिवाजी ' , ' हर हर महादेव ' या घोषणा देऊन भगवा ध्वज माथ्यावर फडकविला.
आम्ही तासभर सर्व परिसर फिरलो व परतीच्या मार्गाला लागलो. उतरताना बर्फावरून घसरगुंडी करीत खाली आलो. एका ठिकाणी मला घसरत येत असताना माझा तोल सुटला व मी दूरवर घसरत जाऊ लागलो, काही अघटित घटना घडायच्या आत आमचा लीडर पुष्पेंद्र ठाकूर याने मला धावत येऊन अडविले व एक मोठ्या येणाऱ्या संकटातून बाहेर काढले. कसोल येथे ट्रेकचा समारोप झाला.
या ट्रेकचे नेतृत्व पारुल मोता व शशी उत्तेकर यांनी केले. तसेच , वय वर्ष २३ ते ६३ या सर्व वयोगटातील सदस्यांचा ट्रेकमधे समावेश होता.
सुशील दुधाणे , सुनील ताम्हाणे,डॉ. विनोद मेहता, नाथा राणे , दीपक कोलगावकर , निकिता शाह , मिलिंद तुपे , जयंत तुपे , कोमल राजपाठक , श्रिप्रा गोखले , नीरजा गोगटे , अंकुर परासर , रोहन व शिवानी गोरे , जितेंद्र आगरवाल , हेमा आगरवाल या सह्याद्रीच्या मावळ्यांनी सारपास शिखरावर भगवा फडकविला.

















Comments
Post a Comment