ढाक पठार

              ट्रेक ढाक पठार 
          वदप,
          ता: कर्जत 
          जि: रायगड 

       सह्याद्री ट्रेकर्स  फाउंडेशन या संस्थेचा  सलग एक हि रविवार न चुकता ५००  वा ट्रेक.
       पावसाळा म्हटले की मस्त पैकी रविवारी घरी आराम करण्याचा दिवस, परिवारासोबत मस्त गरमागरम कांदा  भजी चा बेत , असा कार्यक्रम करायचा तर उगीचच भटकायचं डोंगर दऱ्या बघत. 
  पण जरा सावधान बरं का, रविवार या दिवसाचा  पूर्णपणे कसा विनियोग करायचा हे फक्त जंगल भटकंती    करणाऱ्यांना  विचारा. आम्ही तर भटके ,आम्हाला मेकॅनिकल लाईफ जगण्याचा बिलकुल गंध नाही, आम्ही रविवार सार्थकी लावतो. पावसाळा आला की आम्हाला वेध लागतात ते निसर्गाचे , कोसळणारा धबधबा बघण्याचे व त्यात मनसोक्त भिजण्याचा पुरेपूर आनंद घेण्याचे.
   २३ जुलै २०१७ वार  रविवार या दिवशी संस्थेने ढाक पठार हा ट्रेक आयोजित केला. तसा हा ट्रेक मी दोन वेळा केला आहे, मग करणार काय, घरी स्वस्थ बसेल तो ट्रेकर कुठला! 

         पुणे-लोणावळा-खंडाळा मार्गे वदप या गावी (ता.कर्जत) पोहचलो.

  चहा, दूध,टोस्ट चा मनमुराद आस्वाद घेऊन येथूनच आम्ही ट्रेकला सुरुवात केली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता, नंतर हळू हळू वाढू लागला, सुरुवातीला थोडी चढण लागली,

त्या नंतर  ढाक चे पठार सुरु झाले,

 खूप विस्तीर्ण असे हे पठार आहे.

या पठारावरून जाताना  जागोजागी खूप धबधबे दृष्टीस पडतात. 


फोटो शूट करित  पुढे  मार्गस्थ होत होतो, 



नंतर आम्हाला ढाक गारुआई माते चे  मंदिर लागले. 

येथे पेटपूजा उरकून पुढे  मार्गस्थ झालो. पद्भ्रमण मार्गावरुन जाताना  चढ- उतार हे  येतच  होते. पावसात मार्ग शोधत आम्ही जात राहिलो, ओले चिंब  भिजून ट्रेकचा पुरेपूर आनंद आम्ही  घेत राहिलो. पावसाचा जोर जास्त असल्याने नदीला खुप पाणी आले होते,आम्ही ही  मोठी नदी एकमेकांचा आधार घेत मानवी साखळी करून  पार केली.

अखेर ७  तासांच्या अथक परिश्रमा नंतर    आम्ही  जांभवली (ता. मावळ) येथे व १४.५ किलोमिटर चे  अंतर पार करून पोहचलो.

      
   वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
       आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर