भटकंती कात्रज जुना बोगदा ते बापदेव घाट
- भटकंती कात्रज जुना बोगदा ते बापदेव घाट
कात्रज जुना बोगदा येथून पहाटे ६.३० वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली.कात्रज ते सिंहगड(K2S) असा ट्रेक बरेच भटके करित असतात, पण कात्रज ते कनिफनाथ हा ट्रेक फारसे भटके करित नाहीत.आज आम्ही हा ट्रेक करण्यासाठी निघालो.पण आम्ही कात्रज ते कानिफनाथ च्या अलिकडे असणारया बापदेव घाटावरिल महादेव मंदिराच्या अलीकडच्या असलेल्या डोंगरापर्यत जाऊन परत कात्रज च्या जुन्या बोगद्यापाशी असलेल्या pwd रेस्ट हाउस येथे परत येण्याचा बेत आखला.
pwd रेस्ट हाउस पासुन वर जानारया वाटेने पुढे निघालो,तिन-चार मिनिटातच आपल्याला एक डावीकडची वाट वाघजाई मंदिराकडे जाणारी लागते, व उजवीकडची वाट मुंजोबा मंदिराकडे जाते.वाघजाई मंदिराकडूनही वाट कनिफनाथ जाते,वाघजाई मंदिराच्या उजवीकडची वाट ज्या ठिकाणी टॉवर दिसतात त्या ठिकाणाहुन ही जाता येते.आम्ही
मुंजोबाच्या मंदिरापासुन उजवीकडची वाट पकडून चालु लागलो.
आज माझ्या बरोबर माझे फेसबुक मित्र दिपक झोरे हे पहिल्यांदाच माझ्या बरोबर ट्रेक ला आले होते.पद्भ्रमण मार्गाची वाट खुपच छान व मळलेली आहे.आमचे मित्र सोनवणे साहेब या मार्गाने बरयाच वेळा गेलेले असल्याने, आज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरु केली, थोडक्यात सांगायचे तर तेच आमचे वाटाड़या होते.
व सोबतीला सुधाकर कुलकर्णी(भाऊजी) हे ही वाटाड़या होते.सुरुवातीला वाट सपाटीची आहे.नंतर चढणीची वाट सुरु झाली.साधारणतः पाऊण तासात व १.३६ किलोमीटर चे पद्भ्रमण केल्यावर पहिली टेकडी लागते, अतिशय खढी चढण.साधारणतः ३५ मि.ची खढी चढण व १.७१ किलोमीटर चे अंतर पार करुन चढून गेल्यावर टेकडी च्या माथ्यावर (९९२ मी.३२५४ फूट)पोहचलो.
येथून परत थोडी उतरुन चालु झाली,सपाटी मार्ग चालु झाला.वाट मळलेली व वाटेवर बरयाच ठिकाणी झाडाच्या फांदयाला लाल-पांढरया रंगाच्या लिबिनी वाट दाखविण्यासाठी लावलेल्या आढळतात.आज वातवरण खुपच आल्हाददायक होते, हवेत गारवा होता.मागील आठवड्यात या भागात पाऊस येउन गेल्याने निसर्गाची मुक्त उधळण पाहायला मिळाली.सभोवतालच्या टेकड्या हिरव्या शालू परिधान करुन आमचे स्वागत करित होत्या.
सपाटी भाग काही वेळातच संपून, आता अतिशय खढी चढनिची टेकडीची वाट सुरु झाली.स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या टेकडीला आंबीळ ढग टेकडी म्हणतात.
आता मात्र चालण्याचा वेग मंदावला,पाऊले हळू-हळू चालायला सुरुवात झाली.
वीस मिनिटांची खढी चढण संपवून आम्ही टेकडीच्या माथ्यावर (१०५६ मी.३४६४ फूट) पोहचलो.
येथून खाली गोगलवाडी चे छोटेसे धरण नजरेस पडते.ही टेकडी पार केली की आपला प्रवेश भोर तालुक्यात होतो, असे आम्हाला एक स्थनिक गावकरी भेटला होता,त्याने सांगितले.या येथे मस्त थंडगार वारे वाहत होते,श्रनार्धात सर्व थकवा नाहिसा झाला.उतार उतरुन सपाटी भाग सुरु झाला, थोड्याच वेळात म्हणजे ,
सुरुवातीच्या पद्भ्रमानंतर जवळपास ३ किलोमीटर अंतर पार केल्यावर आम्हाला जमिनीत एक आर-पार जाणारे उंचीला लहाण असलेले व जवळपास सहा फुटांचे भुयार दुष्टीस पडले.
हे भुयार घोरपडी चे असावे असे आम्हास समजले,नुकतीच त्या ठिकाणी घोरपड आत गेली असावी.
त्याठिकाणी असलेल्या मातीत तश्या प्रकारच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.
भुयार पाहुन तसेच पुढे निघालो.येथून साधारणतः एक किलोमीटर चे व दोन तासांचे पद्भ्रमण करुन आम्ही एका ठिकाणी थांबलो,येथून उजवीकडे खाली एक मंदीर दिसत होते, तेथून खाली उतरुन डाव्या बाजुने जाणारी एक वाट आहे,ती वाट येथून साधारणतः एक तासात बापदेव घाटाच्या महादेव मंदिरापाशी जाते.आम्ही खाली न उतरता,येथूनच समोर दिसत असलेल्या बापदेव घाट येथील महादेव मंदीर व त्याच्या पुढे साधारणतः एका तासाच्या अंतरावर असलेल्या कानिफनाथ मंदिराचे दुरुनच दर्शन घेतले.या येथे आम्ही सुरुवातीपासुन पद्भ्रमण करुन चार किलोमीटर व दोन तासांच्या चालीने पोहचलो होतो.येथून परत माघारी फिरुन आल्या वाटेने पद्भ्रमण सुरु केले.परतीच्या मार्गावरुन जाताना आम्ही मोठ्या टेकडीवर न जाता,बाजुच्या सपाटीमार्गाने मार्गक्रमण केले.रमत-गमत पुढच्या
छोट्या-मोठ्या टेकड्या चढत-उतरत परत pwd च्या रेस्ट हाऊस पाशी येउन-जाऊन ११.१८ किलोमीटर व ४.१२ तासांचे व १०५५ मी.ची चढाई पुर्ण करित पोहचलो.
तसे पाहिले तर आम्ही pwd रेस्ट हाउस च्या पासुन (२२८ मी. ७४८ फुट) ची चढाई केली.pwd रेस्ट हाऊस ची उंची ही स.स.पासुन ८११ मी.२६६० फुट आहे.व आम्ही ज्या उंच टेकडीवर गेलो होतो,त्याची उंची स.स.पासुन १०५५ मी.(३४६० फुट) आहे.
असा हा आमचा ट्रेक आनंदात व खेळी-मेळीच्या संगतीत पुर्ण झाला.
आजच्या या मोहिमेत सुधाकर कुलकर्णी, सोनवणे साहेब,दिपक झोरे , अतुल हरगुडकर व मी सुशिल दुधाणे यांचा विशेष सहभाग होता.








खुप छान मस्त
ReplyDeleteधन्यवाद
Deleteस्तुत्य प्रयत्न...असेच चालू ठेवा लिखाण...
ReplyDeleteभाऊजी आपला वरदहस्त असू द्या
DeleteChhan sir
ReplyDeleteधन्यवाद
Delete