भटकंती कानिफनाथ मंदिराची/चंद्र पर्वत

                   अभ्यास मोहीम 
         भटकंती अपरिचित कानिफनाथ मंदिराची/चंद्र पर्वत  व प्राचीन गुहेची/लेणीची 
             २४  मार्च २०१९
               
      पोखर गाव
      ता :पुरंदर , 
      जि.:पुणे.

           नारायणपूर मंदीरा(एकमुखी  दत्तात्रयांचे ठिकाण) च्या समोरच्या बाजूला एक रस्ता वरती,

पोखर गावी जातो.
साधारणतः नारायणपूर येथून  ३०० मिटर वर हे गाव आहे.

गावातून मंदिराकडे जाणारी वाट आहे.
स्थानिक सोबती ला बरोबर घ्यावे.गावात जेमतेम पन्नास घरे आहेत.

सुरुवातीपासून खढी चढण सुरू होते.
उन्हं असल्याने दमछाक जाणवते.वाट तशी मळलेली आहे, चुकण्याची शक्यता कमी, तरी पण स्थानिक सोबती बरोबर असलेला बरा.

पद्भ्रमण मार्गावर आम्हाला भिवडी गावातील स्थानिक भेटले.

      कानिफनाथ हे पोखर गावातील लोकांचे  ग्रामदैवत आहे.

पद्भ्रमण मार्गावरुन दुरवर आपणाला कनिफनाथ/चंद्र पर्वत चे दर्शन घडते.
रंगपंचमी च्या दिवशी येथे यात्रा भरते.ज्या ठिकाणी कानिफनाथांची मंदिरे आहेत , त्या सर्व ठिकाणी रंग पंचमी ला यात्रा भरते.आम्ही ज्या वेळेस या ठिकाणी गेलो होतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रा होते. गावातील लोकांनी ज्या ठिकाणी घसरण आहे,

   अश्या ठिकाणी मातीतील  पायऱ्या ची वाट बनवली आहे.

    तासाभरात आपण कानिफनाथ मंदिरापाशी पोहचतो.
जवळपास १११८ मिटर उंचीवर हे ठिकाण आहे.या डोंगराला चंद्र पर्वत असे ही म्हणतात.मंदिरा चा परिसर फार ऐसपैस नाहि.परंतु माथ्यावर जवळपास ७० ते ८० लोकं बसतील एवढी जागा आहे.

येथून आसपासचा परिसर खूप छान दिसतो.
समोर गराडे गावातील धरण दृष्टीस पडते, या धरणातील पाणी पुरवठा  सासवड शहराला होतो. दहा -पंधरा मिनिटे वर माथ्यावर थांबून आम्हि परत आलेल्या वाटेने गावाच्या दिशेने निघालो.

पोखर गावाजवळ च एक प्राचीन गुहा/लेणी आहे.
जवळपास ८० ते ९० फूट लांब, उंची अंदाजे आठ ते नऊ फूट असावी.
पांडव कालीन गुहा/लेणी असावी, असे स्थानिक लोकं सांगतात.तसा हा परिसर ऐतिहासीक आहे, 

समोर पुरंदर गड , 
बाजूला वज्रगड .एक मुखी नारायणपूर येथील दत्त मंदीर व,

 त्याच्या बाजूला प्राचीन श्री.नारायनेश्वर शिवकालीन मंदिर.
शिव मंदिरात  राजमाता जिजाऊ माता नेहमी येत असे, असा उल्लेख सापडतो.त्यामुळे या गुहा/लेणी ही प्राचीन असाव्यात असे मानायला हरकत नाहि.
          आजूबाजूच्या परिसरातील गावातील लोकांना हे ठिकाण माहीत आहे.आम्हाला भिवडी गावातील सहा ते सात मुले या ठिकाणी भेटली.त्यांनी सांगितले की आम्हि दर रविवारी येथे येतो.
         आमच्या दृष्टीने हे मंदीर अपरिचित आहे , काही ट्रेकर्स मंडळींना हे माहीत ही असेल किंवा नसेल ही.पण प्रत्येकाने या ठिकाणी जरूर भेट द्यावी, असे हे ठिकाण आहे.गावापासून फक्त दीड किलोमीटर आहे , परंतु खढी चढण असल्यामुळे वेळ लागतो.उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागते.घसरण खूप आहे.
जाण्याचा मार्ग:
पुणे , बोपदेव घाट मार्गे नारायणपूर येथून पोखर या गावी जावे.
       आजच्या मोहिमेत डॉ.अजय इंगळे व मी सुशिल दुधाणे सहभागी झालो होतो.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर