मोहीम डांग्या सुळका प्रस्तारारोहण
सह्याद्रीच्या मावळ्यांनी केला अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा
६ ऑक्टोबर २०१९
मोहीम डांग्या सुळका प्रस्तरारोहण
भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे.भारताला खूप मोठा अध्यात्मीक व इतिहास चा वारसा लाभलेला आहे.भारतातील महाराष्ट्र राज्यात अनेक साधू संत व महात्मे होऊन गेले.संत ज्ञानेश्वर महाराज , तुकाराम महाराज , सोपान महाराज. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील भूमीत आपण जन्मास आलो हे आपले थोर भाग्य....
पण आजची परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे , आजची पिढी ही पाश्चिमात्य देशाकडे झुकताना व तेथील परंपरा अवलंबताना दिसत आहे.जन्मदिवस आपण तेथील परंपरेनुसार साजरा करतो, रात्री बारा वाजले की मित्र मंडळी घरी येऊन केक कापतात, व नंतर बियर , दारू ची यथेच्छ पार्टी साजरी करतात...अरे हे काय चाललंय ???
कोठे वाहत चालली आपली संस्कृती, हि संस्कृती नसून विकृती निर्माण झाली आहे
बस्स झाले हे पोरं खेळ हे आता थांबायला हवे...
ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला , स्वराज्य निर्माण करण्यासठी दिवसाची रात्र केली, ऊन, वारा , पावसाची कश्याचीही तमा न बाळगता अनेक मावळ्यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण केले, अहोरात्र कष्ट करून हा महाराष्ट्र घडविला ...अनेक क्रांती कारकांनी इंग्रजा विरुद्ध लढा दिला आणि आपण पाश्चत संस्कृतीला खतपाणी घालतोय....?
आता ढाबा संस्कृती बंद करून आम्ही वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचं ठरविले ते म्हणजे "गड संस्कृती".
हीच प्रेरणा मनात घेऊन भटकंती ..गड दुर्गांची या मित्र परिवाराने हा निश्चय केला आहे,,
शिवाजी महाराज व जिजामाता यांचा आशीर्वाद घेऊन, गडावरून जाऊन तेथील मातीचा कपाळी गंध लावून,वीरांचे स्मरण करून अनोख्या व हटके अंदाजात जन्म दिवस साजरा करण्याचा..
आज आम्ही गडावर जाऊन वाढदिवस साजरा करणार होतो , पण आम्ही आज नाशिक येथील डांग्या सुळका सर करण्याचे ठरविले.
मी व डॉ.अजय इंगळे
ज्यांचा आज वाढदिवस आहे , दोघे जण ५ ऑक्टोबर ला रात्री शिवाजी नगर येथुन ११.३० च्या शिवशाही गाडीने नाशिक येथे पहाटे ४.३० वाजता पोहचलो.नाशिक येथुन आमचे मित्र दीपक पवार ५.३० वाजता आम्हाला घेण्यासाठी नाशिक ठक्कर बस स्टँड ला आले.तेथून आम्ही शिरसाटे या गावी ६.३० वाजता पोहचलो.अमोल तेलंग यांच्या घरी नाष्टा करून पुढे गाडीने प्रवास करून सप्रेवाडी या गावी आलो.७ .१५ वाजता डांग्या सुळका चा ट्रेक चालू केला.तास-दिड तासात पदभ्रमण करून आम्ही,
डांग्या सुळक्याच्या पायथ्याशी पोहचलो.
९ वाजता क्लाइंबीग चालू केले ,
प्रथम मुंबई वरून आलेले दहा जणांनी सुरुवात केली , एक-एक सदस्य सुळक्याच्या दिशेने क्लाइंबीग करु लागलो.आम्ही शेवटच्या पंधरा जणांनी दुपारी ३ वाजता ,
सुळक्याच्या माथ्यावर पाऊल ठेवला.
वरती जेमतेम दहा ते पंधरा उभे राहण्याची जागा आहे.महाराजांचा जयघोष केला व डॉ.अजय इंगळे यांचा वाढदिवस माथ्यावर पेढे भरवून साजरा केला.
व पंधरा-वीस मिनिटे माथ्यावर थांबलो ,
फोटो सेशन करून रॅपलिंग करित खाली उतरलो.
जेवण करून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला .
टिम पॉइन्ट ब्रेक अँडवेंनचर्स यांनी ही मोहीम आयोजित केली होती.
पठारावर बारा महिने जिवंत असणारा झरा डांग्या खोकला बरा करतो
अशी श्रद्धा असल्याने येथील सुळक्याचे नाव ‘डांग्या’ असे पडले आहे.
साधारण १८० फूट चढाई उंची असलेला हा डांग्या सुळका ‘सोप्या’ चढाई श्रेणीचा आहे.तसेच मार्गाच्या मागील बाजूस मधमाश्यांची पोळी असल्याने चढाईची खबरदारी घेऊन सुद्धा काही अपघात झाले आहेत.
डांग्या सुळक्याची उंची १८० फूट असून त्रंबकेश्वर पर्वत रांगेतील गिर्यारोहकाच्या मनाला भुरळ घालनारी हि सुळक्यांची नगरी आहे. याच परिसरात नवरा-नवरी, नंदीची धार, संडे१, संडे२, कॉटीश कडा, हि सुळक्यांची माळच आपल्याला बघावयास मिळते. डांग्या सुळक्याच्या माथा गाठण्यासाठी सरासरी तीन टप्प्यांत प्रस्तरारोहण करून सुळक्याचा माथा गाठावा लागतो. माथ्या वरून दुर्ग घरगड ,आंजनेरी,ब्रम्हगीरी,रांजनगिरी,कावनाई,त्रिंगलवाडी,हरिहर,बसगड हे गिरीदुर्ग सहजच नजरेस पडतात.
डांग्यासुळका या वर्णनापेक्षाही अधिक काहीतरी आहे!
तसेच ही मोहीम लिंगाणा वीर अनिल वाघ , जॉकी साळुंखे , चेतन शिंदे ,तुषार पटिल , अमोल तेलंगी , अभिषेक वाघ व जेष्ठ गिर्यारोहक सुशिल दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
भटकंती गृप चे सदस्य डॉ.अजय इंगळे
व सुशिल दुधाणे हे मोहिमेत सहभागी झाले होते.














Comments
Post a Comment