अनघई घाट वाट

         ट्रेक अनघई घाटवाटा

      चालू वर्षातील पहिला ट्रेक, मागील वर्षात बरेच ट्रेक झाले, याही वर्षी बरेच ट्रेक घडो हि ईश्वर चरणी प्रार्थना. 
         आज आम्ही ७ जानेवारी २०१८ रोजी जगन्नाथ पारगे, रमेश कळसकर, व मी सुशील दुधाणे आम्ही तिघे निघालो मोहिमेवर.शिवाजीनगर येथून ६.३५ ची पुणे ते लोणावळा लोकल सुटते.त्या लोकल ने लोणावळा येथे  पोहचलो.लोणावळा येस.टी.स्टँड च्या बाहेर अन्नपूर्णा हॉटेल आहे, या हॉटेलात   नाष्टा   खुप चांगला असतो.या येथे  नाष्टा करुन सकाळी ९  वाजता सुटणारी भांबुर्डे गावाला  जाणाऱ्या येस.टी त बसलो , व माजगाव ( ता. मुळशी, जि. पुणे) येथे उतरलो.

गावातील स्थानिक वाटाड़या ला सोबत घेउन येथूनच ट्रेकला सुरुवात करावी.

आम्ही ज्या वेळेस येथे ट्रेक करायला गेलो होतो, त्यावेळेस आमच्या बरोबर गावातील  राऊत व मेने हे दोघे वाटाड़या म्हणून आमच्या सोबतीला आले होते.

येथून  साधारणतः १.५०  किलोमीटर चे पद्भ्रमण केल्यावर आपण एका धनगर वाड्याजवळ पोहचतो.


येथून पुढे निघावे,

 सुरुवातीला सपाट भागातून चालावे लागले 

 त्या  नंतर त्रीव स्वरुपाचा  उतार सुरु झाला.या दिवसात  या वाटेवरुन जाताना  कुसर खूप लागले .

 परंतु ते खाली जमिनीवर पसरले असल्याने आम्हाला  त्याचा त्रास झाला नाही.

तसेच  उन्हाची त्रिव्रता ही कमी  होती. आमच्या सोबत असलेले वाटाडे  मेने यांनी  सांगितले की या वाटेवरून सहसा कोणी जात नाही.तसा आम्हाला त्याचा प्रत्यय येत होता.कारण वाट असूनही ती दिसत न्हवती, कारण कुसर ( वाळलेले गवत) सगळीकडे विस्तारले होते, उतार खूपच त्रीव स्वरूपाचा होता,

 उतरत असताना धरायला दगड किंवा झाडे हि न्हवती.


त्यामुळे घसरून पडण्याची शक्यता दाट होती, वेळ प्रसंगी आम्ही बसून उतरणे पसंद केले. लहानपणी घसरकुंडीचा जो खेळ खेळला होता त्याची आठवण येत होती, काही ठिकाणी मोठं-मोठे कातळ दगडांचे रॉक पॅच उतरून जावे लागले,


 मजल दर मजल करीत आम्ही अनघई गडाच्या पायथ्याशी पोहचलो.

आमच्यातील   दोन सवंगडी दमले असल्याने ते येथेच थांबले. मी दोन वाटा  वाटाड़या ना  सोबत  घेऊन अनघई  गडाच्या दिशेने निघालो. परंतु दोन्ही वाटाडे  गडावर कधी गेलेले न्हवते.पण ते म्हणाले जाऊया आपण, १५  ते २०  मिनिटे चालून गेल्यानंतर त्यांना वाट काही केल्या सापडेना, नंतर मी विचार केला की जास्त भटकून उपयोग नाही, व मी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला व परत माझ्या सवंगड्याकडे आलो.येथे  पेटपूजा करुन,

  कळंब गावाकडे निघालो.


 येथून ४५ मिनिटांत  आम्ही  कलंब गावात पोहचलो.

        माजगाव येथून कलंब या गावी ९.७५ किलोमीटर व जवळपास ५ तासांचे पद्भ्रमण करुन आमचा ट्रेक पुर्ण झाला.



    कळंब गाव ( ता. सुधागड, जि. रायगड ) मधे येते. येथून नंतर वडाप ने परळी या गावी पोहचलो.येथून परत दुसरी वडाप  पकडून खोपोली येथे पोहचलो.खोपोली येथून येस.टी.ने लोणावळा.लोणावळा येथून लोकल ने पुण्याला पोहचलो.

वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर