शारिरीक श्रमतेची कस पाहणारी भटकंती: कावळ्या घाट

ट्रेक कावळ्या घाट
घोल  गाव 
 ता : वेल्हा 
 जि :  पुणे
 मार्ग - पुणे- पानशेत - घोल 


    जून महिन्याची सुरुवात झाली की वेध लागतात ते पावसाचे. जून महिन्यातील  हा आमचा पहिलाच  ट्रेक. 
      सह्याद्री रांगेत अनेक विशाल पर्वत , शिखरे , गड-किल्ले  आहेत. यात एक उत्कृष्ट असा अभेद गड म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगड आहे.रायगड ही  राजधानी  असल्यामुळे यावर नजर ठेवण्यासाठी अनेक गडांच्या साखळ्या बनविल्या त्यापैकी एक कोकणदिवा आहे. हा रायगड व कावळ्या घाटाच्या जवळच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला . कोकणदिव्याच्या दक्षिणेला रायगड , दक्षिण - पूर्व लिंगाणा व पूर्व दिशेने तोरणा दिसतो.

      हा  ट्रेक करण्यासाठी आम्ही  प्रथम  घोल ( ता:  वेल्हा , जि : पुणे )  या  गावी पोहचलो.



      घोल  गावातून वाटाड़या ला सोबत  घेउन येथूनच  ट्रेकला सुरुवात केली.

   ट्रेक च्या  सुरुवाती पासूनच पर्जन्य राजाने आमच्यावर कृपा केली होती. ट्रेकची  सुरुवात  झाली ती  पावसात भिजतच. सुरुवातीचे दहा  मिनिटे चांगला पाऊस झाला, एकदम चैतन्य निर्माण झाले.जून महिन्याचा पहिला रविवार आणि तो ही पावसाच्या आगमनाने, दुर्ध शर्करा योग च  जणू.सह्याद्री  ट्रेकर्स फाऊंडेशन ही संस्था  नेहमीच वेगवेगळ्या ऋतूत ट्रेक चे आयोजन करित असते. या सर्व ऋतूत  पावसाची मजा काही औरच. निसर्ग देवता हिरवा  शालू परिधान करून आम्हा ट्रेकर्स भटक्याचे स्वागतच करीत असते. पावसाळ्यात ट्रेक करताना धोका हा  कमी-अधिक प्रमाणात  असतो.पद्भ्रमण मार्गावरील माती पूर्णपणे घट्ट झालेली असते, त्यामुळे घसरण कमी असते. परंतु दगडावर पाय व्यवस्थित  ठेवावे लागतात, दगड ओले व  शेवाळलेले झाले  असल्याने पाय घसरायची भीती जास्त असते.
 पहाटेची वेळ व काला कुट्ट अंधार  असल्यामुळे काजव्यांचा  मोठ्या प्रमाणात बघावे तिकडे  लखं प्रकाश पडला होता. चालताना सर्वांचे   हेडलॅम्प  चालू असल्याने, सर्व जण  एका रांगेत  चालत होते.


या ठिकाण ची  वाट अतिशय मळलेली  व मोठी आहे. 



सुरुवातीस ३  ते ३.३०  किलोमीटर चा गाडीचा कच्चा रस्ता आहे.

परंतू आम्ही पायीच निघालो



काही वेळातच  गारजाई वाडी येथे पोहचलो.



येथून पुढे  काही वेळ चालून गेल्यावर अरुंद वाट लागली, थोडी सावधानता बालगूनच येथून  चालावे लागत होते. प्रथम त्रीव उतार सुरु झाला.मजल दर-मजल करीत आम्ही सांडोशी ( ता :  महाड, जि : रायगड ) येथे पोहचलो. 

सभोवताली रायगड,  कोकणदिवा या गडांचे विलोभनीय दर्शन घडले.


येथून आम्ही  परत आल्या वाटेने पद्भ्रमण सुरु केले,  व परत घोल  या गावी १७  किलोमीटर व  जवळपास ७ तासात  ट्रेक पूर्ण केला.



      अश्या पद्धतीने  सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन,पुणे 
या संस्थेकडून कावळ्या घाट हा शारीरिक श्रमता चा कस पाहणारा ट्रेक यशस्वीपणे पूर्ण झाला.या  ट्रेक मधे ३२  जणांचा  समावेश होता.वय वर्ष ७ (कृष्णा कोंडे) ते  वय वर्ष ७६  (अशोक पारखी) या सर्व वयोगटांतील सदस्यांचा  समावेश होता.


वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर