भटकंती अपरिचित बैलदरा घाट वाटेची
ट्रेक बैलदरा घाट वाट
दस्तुरी गारमाल
सप्टेंबर महिना चालु झाला की परतीचा पाऊस चालू होतो, या महिन्यात पावसाचा जोर कमी -अधिक असतो.
आज आम्ही ३ सप्टेंबर २०१७ रोजी चार शिलेदार एकत्र येऊन बैलदरा घाटवाट करण्याचा बेत आखला, व त्या दिशेने वाटचाल चालू केली. शिवाजी नगर स्टेशन गाठले व लोकलने लोणावळा येथे गेलो. हॉटेल अन्नपूर्णा येथे न्याहारी केली व,
जीपने प्रवास करुन दस्तूरी गारमाल येथे पोहचलो.
स्थानिक वाट्याड्या शोधला परंतु कोणी यायला तय्यार होईना,
मग आम्हीच वाट शोधत निघालो.
सुरुवातीला थोडी वाट चुकलो नंतर बरोवर वाट सापडली. थोडी सपाटी लागली, चिखल तुडवत निघालो.वाट मोठी व गावातील वाहिवाटी ची आहे.त्रीव उतार सुरु झाला, दगडावर शेवाळे झाल्यामुळे पाय घसरत होते. त्यातच वरुन राजा ची कृपा ही आमच्यावर जास्त असल्याने ओलेचिंब होउन पुढे जात राहिलो. जवळपास ३.१५ किलोमीटर अंतर चालल्यानंतर,
आम्ही कोंडवल या गावी पोहचलो.
त्यानंतर मजल दर करित आम्हाला ६ किलोमीटर अंतरावर चाचणी गाव लागले. येथे फराळ करून आम्ही पुढे मार्गस्थ झालो.येथून साधारणतः दिड किलोमीटर अंतरावर,
आम्हाला उंबर खिंड लागली.
या येथे थोडे थांबलो व परत पद्भ्रमण सुरु केले.
येथून पुढे डांबरी रस्ता सुरु झाला,
आता मात्र पाय बोलू लागले. आम्हा ट्रेकर्स मंडळींना चढाई,उतराई कितीही असली तरी त्याचे काही वाटत नाही , परंतु डांबरी रस्ता लागला की वाट कधी संपते अशी अवस्था होते. त्याच अवस्थेत आम्हीं पद्भ्रमण सुरु ठेवले. पुढे गेल्यावर कोंडीची वाडी लागली. ती पार करून पुढे मार्गस्थ झालो. आता मात्र पायाची पूर्ण वाट लागली होती. तसेच पुढे चालू लागलो व नंतर ,
आम्ही शेमडी ( ता. खालापूर , जि. रायगड) या गावी १२ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पोहचलो.
येथील मंदिरात पेटपूजा उरकून टेम्पोने खोपोली येथे पोहचलो. खोपोली येथून एस.टी.बस ने लोणावळा स्टेशन गाठले. व लोकलने शिवाजीनगर ला पोहचलो.
या ट्रेक चे नेतृत्व जगन्नाथ पारगे यांनी केले व त्यांना सुनील घम,सोनू घोडे, व मी सुशील दुधाणे यांनी साथ दिली.
आजचा आमचा ट्रेक हा नवीनच होता, फारसे कोणी या घाटाने जात नाहीत.
उंबरखिड भाऊंच्या बरोब मी सुध्दा केला
ReplyDeleteआहे. खुपच छान वर्णन केले आहे आपण वाचत असताना आपणच ट्रेक करतो आहे आसे वाटले.. छान
धन्यवाद
DeleteShort and sweet. Good narration. Love this.
ReplyDelete