कोटेश्वर मंदीर

            कोटेश्वर मंदीर ,
            भोरगिरी.
          ता: खेड 
           जि: पुणे 

      पुणे-भोसरी-दिघी-चाकण-खेड-राजगुरू नगर टोल नाका सोडला की लगेचच डाव्या बाजूला जो चांडोली फाटा लागतो , तेथून पुढे अमूल डेअरी चा सरळ रस्ता पकडून वाडा मार्गे भोरगिरी गावात शिरतानाच भिमा नदीच्या काठावर मुळ गर्भगृह कायम ठेवुन नव्याने बांधलेले कोटेश्वर मंदिरापाशी आपण पोहचतो.

मंदिराच्या आवारात अनेक कोरीव दगड विखुरलेले आहेत.

 यात मंदिराचे खांब,भारवाहक, कीर्तिमुख, वीरगळ, कळसाचा आतील भाग तसेच दोन शरभ दिसुन येतात.

 पारावर मनुष्य आणि वाघाचा युद्धप्रसंग कोरलेले शिल्प ठेवले आहे. विखुरलेल्या या अवशेषावरून मंदिराच्या भव्यतेची कल्पना करता येते.
 साधारण ९-१० व्या शतकात शिलाहार वंशीय झंझराजाने जी १२ शिवमंदिरे बांधली त्यातील एक म्हणजे भोरगिरी उर्फ भवरगिरी गावातील कोटिश्वर मंदिर होय.
 मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंडी

 असुन गाभाऱ्या बाहेर गणपतीचे एक आगळेवेगळे शिल्प आहे. जेमतेम दीड फूट उंचीच्या उभ्या असलेल्या या गणेशमूर्तीच्या कमरेखालील बाजुस मुलींच्या स्कर्टप्रमाणे वस्त्र कोरलेले आहे. चतुर्भुज गणेशाच्या उजव्या हातात परशू असुन डाव्या हातातील फळावर गणपतीची सोंड टेकलेली आहे.
 भोरगिरी गडावरील गुहेत गावातुन वीज नेली असल्याने या खांबाच्या आधारे गडावर जाणारी वाट सहज कळून येते.
    कोटेश्वर मंदिराबद्दल अशी आख्यायिका सांगतात की, देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते. 

त्यामुळे तो डोह पवित्र झाला आहे. 
म्हणून आजही या भागातील स्थानिक लोक उत्सवाच्या काळात येथे  असलेल्या डोहात आंघोळ करतात. झंझराजाने जी बारा शिवालये बांधली त्यात या कोटेश्वरचाही समावेश आहे, असे मानले जाते.

Comments

Popular posts from this blog

पद्भ्रमण ठोसेघर ते जुंगटी

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण