भटकंती अपरिचित घाट वाटेची: भोरांड्याची नाळ ते नाणेघाट

      ट्रेक भोरांड्याची नाळ घाटवाट ते नाणेघाट 
      आवळ्याची वाडी,
       ता: मुरबाड 
       जि: ठाणे.

       सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन ने  भोरांड्याची घाट वाट  ते नाणेघाट असा ट्रेक आयोजित केला होता. फाऊंडेशनचे ३८  सदस्य या ट्रेक मधे सामिल झाले होते. ५ नोव्हेंबर २०१७ ला  पहाटे ४  वाजता आम्ही प्रवासास सुरुवात केली.पुणे, मंचर मार्गे नारायणगाव फाटा येथून पुढे जुन्नर, गणेश खिंड मार्गे माळशेज खिंड पार करून गाडी,

 आवळ्याची वाडी ( ता. मुरबाड, जि. ठाणे ) येथे आम्ही पोहचलो.


न्याहारी करुन, बाळू गाईड या वाटाड़याला  सोबतीला घेउन येथूनच ट्रेकला सुरुवात केली. 

सुरुवाती पासून चढण सुरु झाली,

 वाट थोडी मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नाही. एक तासांचे पद्भ्रमण करुन  आम्ही टॉवर चे काम चालू आहे, त्या भागात  पोहचलो. 

जवळपास १०० फुट  उंचीचे मोठमोठे टॉवर या भागात आहेत.

 औरंगाबाद येथून विजेचा पुरवठा ,पारगाव मार्गे  मुंबई येथे पोहचणार अशी व्यवस्था करण्यासाठी हे मोठे टॉवर येथे उभारले जात होते.या भागाची  थोडी पाहणी करून पुढे  मार्गस्थ झालो. 

चढण काय संपता संपणे, मोठं मोठी दगड धोंडी 
पद्भ्रमण मार्गावरुन पार करत

 आम्ही ३  तासांच्या अथक परिश्रमानंतर  नाणेघाट येथे पोहचलो.

या येथील केव (गुहा) मध्ये पेटपूजा उरकून, नाणेघाट उतरायला सुरुवात केली. आता खरी सत्त्वपरीक्षा सुरु झाली.

या घाटवाटेवरच्या मार्गावर  मोठं मोठाली दगड धोंडे पार करुन जाने,

हे फार मोठे आव्हान आमच्या समोर होते. प्रत्येक पाऊल जपून टाकावा लागत होते , काही दगडी  घसरत होती, गुळगुळीत झाली होती, त्यामुळे सावकाश उतरणे या शिवाय दुसरा काही पर्याय आमच्या समोर न्हवता. उतरताना गुडघ्यावर खुप त्राण पडत होता, 

जवळपास नाणेघाटेच्या केव पासुन अडीच तासांचे पद्भ्रमण करुन  आम्ही वैशाखरे येथे पोहचलो.
या येथे ट्रेकची सांगता झाली.

      आवळ्याची वाडी ते नाणेघाट केव व नाणेघाट केव ते वैशाखरे या येथे सव्वापाच तास व साडेनऊ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पोहचलो.

      वैशाखरे येथे  खिचडी भात व कोशिंबीर या जेवणावर ताव मारून  पुण्याकडे मार्गस्थ झालो.   
      हा  ट्रेक सहसा कोणी ट्रेकर्स  मंडळी करीत नाही, त्यामुळे हा अपरिचित असा ट्रेक आहे.
   आजच्या ट्रेक चे वैशिष्ट  म्हणजे एक घाट चढून दुसरा  घाट उतरणे हे म्हणता येइल. सहसा कोकण भागात  हा दुर्मिळ योग समजावा.

    वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर