भटकंती अपरिचित व दुर्लक्षित सुर्या पर्वत/डोंगराची
भटकंती अपरिचित व दुर्लक्षित सुर्य पर्वत/डोंगराची
२८ जुन २०२० पहाटे ६.१५ वाजता आम्ही नवले ब्रिज,वडगाव पुणे येथून चार चाकी वाहनाने जुना बेंगलोर हायवे ने नसरापूर च्या दिशेने निघालो. चेलाडी पासून पुढे डाव्या बाजुला २०० ते २५० मीटर वरती,देगाव फाटा लागतो, या येथे लाहिरी महाशय मठ अध्यात्मिक केंद्र असा बोर्ड लावलेला आहे.या फाट्यापासुन पुढे नायगाव, देगाव,नंतर कांबरे गाव लागते.कांबरे गावाच्या येथेच काही पोलट्री फ़ार्म लागतात, पोलट्री फार्म च्या उजवीकडे एक फाटा लागतो,तो शिंदे वस्ती कडे जातो.पुण्यापासुन शिंदे वस्ती ३५ किलोमीटर वर आहे, व देगाव फाट्यापासुन शिंदे वस्ती ५ किलोमीटर आहे.शिंदे वस्तीवर गाडी पार्क करुन येथूनच सुर्या पर्वत कडे जाणारी वाट आहे.शिंदे वस्ती व कांबरे गावात जवळपास ३५० च्या वर घरे आहेत, अंदाजे लोकसंख्या १२०० च्या आसपास आहे.गावात शिंदे,
कोंढाळकर,मोहीते,पवार,गिरे,सुतार,खैरे,सणस,जाधव, चव्हाण,काकडे,गोरे,कचरे,दांगट अश्या आडनावाची लोक गुण्यागोविंदाने राहतात.कांबरे हे गाव ता.भोर,जि.पुणे या भागात येतो.कांबरे हे गाव स.स.पासुन ६९१ मी.( २२६६ फुट) उंचीवर आहे.
शिंदे वस्ती येथून आम्ही पद्भ्रमणाला सुरुवात केली.
खरं तर या वस्तीवरुन स्थनिक वाटाड़या बरोबर घेउनच निघावे.पण आम्ही वाटाड़या न घेता निघालो,कारण आमच्या बरोबर आमचा भोर येथील मित्र रवी गाडे होता,तो जवळपास तिन ते चार वेळा सुर्या पर्वतावर जाऊन आला होता.व रवी गाडे या कांबरे गावातील शाळेत शिक्षक असल्यामुळे त्याला वाट माहित होती.ईतर भटक्या मंडळीनी वाटाड़या घेतल्याशिवाय जाऊ नये.वाट सहजा सापडत नाही.
सुरुवातीला सपाटी भागातून पद्भ्रमण सुरु झाले.
साधारणतः एक किलोमीटर पद्भ्रमणानंतर एका ठिकाणी पाणी असलेले दगडी ओहळ लागले,
नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे थोडे पाणी होते येथे.
साधारणतः २.३९ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन एक पठार लागले.
पठाराच्या खाली उजव्या बाजुला करंदी खेबा गाव दुरवर दिसते.साधारणतः १.२५ किलोमीटर लांबीचे पठार पार केल्यावर सुरुवातीपासुन, म्हणजे शिंदे वस्ती पासुन ३.७५ किलोमीटर व जवळपास १.२५ तासांचे अंतर पार केल्यावर पहिली टेकडी लागली.ही टेकडी अगदी चढणीची होती.ही टेकडी लीलयापणे आम्ही पार करुन टेकडीच्या माथ्यावर जवळपास ५ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पोहचलो,या टेकडीची स.स.पासुन उंची ९३३ मी.(३०६० फुट).टेकडीच्या माथ्यावर एक चिर(दगड)नजरेस पडतो.ही चिर म्हणजे जागेची हद्द दर्शविते.या येथून पुढे तालुका पुरंदर ची हद्द सुरु होते,ता.भोर ची हद्द संपते.या भागात आम्हाला एक भेकर पळताना दिसले.टेकडीच्या माथ्यावरुन डाव्या बाजुला सोमर्डी गाव दिसते.या सोमर्डी गावातून ही सुर्या पर्वतावर जाणारी जवळची वाट आहे.पण जर आपणाला ट्रेक करायचा असेल तर,शिंदे वस्ती येथूनच करावा.पहिली टेकडीच्या माथ्यावरुन पुढे थोडी उतरण सुरु होते, थोडे पठार ही लागते.थोड्या सपाटीच्या चालिनंतर लगेच दुसरी टेकडी लागते,वळणा-वळणाची म्हणजे झिगझ्याग चढणीची वाट पार करावी लागते, थोड्याच वेळात आपण दुसरया टेकडीच्या माथ्यावर म्हणजे ९८४ मी.(३२२८ फुट) उंचीवर पोहचतो.परत थोड्या सपाटीवरुन मार्गक्रमन करित आम्ही तिसरया टेकडीच्या जवळ पोहचलो.आता आमची खरी सत्वपरिक्षा येथून चालु झाली , अतिशय खढी चढण दमछाक करणारी.
या टेकडी वर जाण्यासाठी स्थनिक गावातील लोकांनी दगड रचून वाट केली आहे.
काही प्राचीन दगडी वाट ही लागते.दगडी पायरया ची वाट खुपच दमछाक करणारी व शारिरीक श्रमतेची कस पाहणारी आहे.आम्हाला या येथे येईपर्यंत उन्हाची झळ जाणवली नाही,कारण अजुन या मार्गावर सावली ने आमची साथ सोडली न्हवती.या मार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर व असंख्य डासांनी आमच्यावर हल्ला केला, जो भाग कपड्यांनी झाकला न्हवता , त्या भागावर त्यांनी यतेच्छ ताव मारला,आम्ही सर्वानी पुर्ण बाहेचा व फुल ट्रेक पँट घातल्यामुले थोडा कमी चावा सोसावा लागला.साधारणता ६.४३ किलोमीटर व १०९२ मी.(३५८२ फुट) उंची पार करुन आम्ही तिसरया टेकडीवर पोहचलो.लगेचच चौथी व अंतिम टेकडी खढी चढणीची सुरु झाली.खुपच दमछाक झाली आमची ही टेकडी पार करताना.११५६ मी.(३७९२ फुट) शिंदे वस्ती पासुन या येथे ६.५३ किलोमीटर व जवळपास ३ तासांच्या अथक परिश्रम करुन आम्ही
सुर्य पर्वत/डोंगरावर पोहचलो.वरती माथ्यावर भैरवनाथाचे सुंदर व सुबक छोटे खाणी मंदीर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे या सुर्या पर्वतावर येत असे.तसेच महान संत सोपानकाका ,संत चांगडेश्वर,यांचे पुर्वीच्या काळी येथे वास्तव्य होते.
श्रावण महिन्यात सात दिवस भैरवनाथ मंदिरात ग्रंथ बसला जातो,अमावस्याच्या दिवशी पुजा होते, त्या दिवशी गावातील लोकांना जेवण दिले जाते.कामडी,देवडी,कुडीत या गावातील लोक येथे येतात.
सुर्या पर्वताच्या पुर्व बाजुला नारायणपूर,पोखर ही गावे लागतात.पच्चींम बाजूस सोमर्डी,कांबरे ही गावे लागतात, दक्षिण दिशेला देवडी, कापूरहोळ ही गावे लागतात उत्तर दिशेला कुडीत,गराडे,चामडी ही गावे लागतात.
भैरवनाथाचे मनोभावे दर्शन घेतले.माथ्यावरुन समोरच पोखर गावातिल उंच ठिकाणी असलेले कानिफनाथ मंदीर नजरेस पडले.मित्रांनो बापदेव घाट पार करुन गेल्यावर जे कनिफनाथ मंदीर लागते,ते हे नाही.हे पोखर गाव म्हणजे एकमुखी दत्त नारायणपूर च्या समोर असलेले गाव आहे,या गावातूनच कनिफनाथ मंदिराकडे जाणारी वाट आहे.
सुर्या पर्वता वरुनही कनिफनाथ मंदिराकडे जाणारी वाट आहे.सुर्या पर्वतावरुन समोरच पुरंदर व वज्रगड अगदी स्पष्ट दिसतात.या येथे आम्ही जास्त न थांबता माघारी फिरलो,डास काही आमचा पिच्छा सोडत न्हवते.परत आल्या वाटेने आम्ही रमत-गमत,मज्जा मस्ती करित वाटचाल सुरु केली.शिंदे वस्तीच्या अलिकडे एका पठारावर आम्ही पेटपुजा उरकून घेतली.पेटपुजा आटोपल्यावर आम्ही थोड्याच वेळात शिंदे वस्ती येथे जवळपास ६ तासांच्या व ११२६ मी.ची चढाई-उतराई करित १३ किलोमीटरचे पद्भ्रमण करुन पोहचलो.
शिंदे वस्तीवर पोहचल्यावर आमचे शिक्षक मित्र रवी गाडे यांच्या एका विद्यार्थी च्या घरात लिंबू पाणी पिले.वस्तीवर पोहचल्यावर आम्हाला समजले की या भागात तिन बिबट्यांचा वावर आहे.हे ऐकल्यावर आमची तर फाटलीच.
मित्रांनो या मार्गावरुन कोन्हिही टेकर्स मंडळी अजुन पर्यत गेलेले नाहीत, फक्त स्थनिक मंडळी च या मार्गावरुन ये जा करित असतात.स्थनिक लोकांच्या म्हणण्यानुसार फक्त आम्हीच या भागातून सुर्या पर्वत/डोंगरावर जाऊन आलेलो आहोत.
हा ट्रेक अपरिचित व दुर्लक्षित आहे, जर कोन्ही भटकी मंडळी या सुर्या पर्वतावर जाऊन आली असतिल,तर हे ठिकाण अपरिचित असे म्हणता येणार नाही.
आम्ही या भागात ट्रेक करताना अगोदर स्थनिक गावकरी मंडळीची पुर्वपरवानगी घेतली होती.तसेच आमचे मित्र रवी गाडे हे येथेच शिक्षक असल्याने आम्हाला हे शक्य झाले आहे.
सध्या करोनाचा पादुर्भाव अजुन कमी झालेला नसल्यामुळे आपण भटक्या मंडळीनी येथे येणे टाळावे.
उन्हाळ्यात हा ट्रेक करु नये.करायचाच असल्यास पाणी जास्त सोबत घ्यावे.
हिवाळ्यात हा ट्रेक उत्तम आहे. आजच्या या हटके भटकंती मधे रवी गाडे,दिपक झोरी,सचिन मांढरे व मी सुशिल दुधाणे यांचा समावेश होता.







मस्तच बंधू ...
ReplyDeleteआपण यात माहिरच आहात, त्यामुळे आपल्याला ब्लॉग लिहायला अवघड नसेलच वाटले ..
मस्त लिखान ..
छान मुशाफिरी .. !!
अभिनंदन आणि यापुढील नवनवीन ब्लॉग साठी शुभेच्छा ... !!
धन्यवाद
Deleteसर मस्तच
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुप छान सर
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteखुप छान सर , आम्हाला ही आपली सोबत घडो
ReplyDeleteजरुर
Delete