डेरे घाट वाट
खडसांबळे लेणी - डेरे घाटवाट
नागशेट,
ता : सुधागड
जि : रायगड
मार्ग : पुणे -ताम्हिणी घाट मार्गे नागशेट .
८४ लक्ष्य योनीनंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो, असे म्हणतात. म्हणजे हा जन्म खूप हालअपेष्टा सहन करून मिळालेला आहे. तर या मनुष्य जन्माचा आपण पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे.आम्ही ट्रेकर्स मंडळी तर याचा पुरेपूर उपभोग घेत असतो.ऊन,वारा,पाऊस,थंडी अश्या सर्व आव्हानांचा सामना करीत आम्ही दर रविवारी ट्रेक करीतच असतो. मनुष्य जन्म पुन्हा नाही, जे काही करायचे ते याच जन्मात. दैनंदिन जीवन शैलीतून बाहेर पडा, निसर्गाचा आनंद घ्या, तुम्हाला वाटत असेल बाहेर खूप ऊन आहे, पण तुम्ही जंगलात भटकायला गेलात कि तुम्हाला वाटेल कि हा गारवा आला कोठून.
तर मित्रांनो, या सह्याद्रीच्या डोंगर कड्या-कपाऱ्यात फिरायला या,आणि ताजेतवाने व्हा.
आज ५ मार्च २०१७ रोजी सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन, पुणे या ग्रुप ने आयोजित केलेल्या डेरे घाट वाट हा ट्रेक करण्यासाठी,
पुणे-ताम्हिनी घाट मार्गे नागशेट या गावी खाजगी वाहनाने प्रवास करुन आम्ही पोहचलो.
गावातील स्थानिक वाटाड़या ला बरोबर घेउन ट्रेकची सुरुवात नागशेट पोस्ट :आटोने, ता : सुधागड, जिल्हा : रायगड येथून केली.
सुरुवातीला भातखाचरांमधुन जाणारी मळलेली वाट हळूहळू वर चढायला लागते.
उन्हाळ्यात हा ट्रेक केला तर उन्हाचे दिवस व कोकणातील दमट हवा यामुळे सर्वांगातून घामाच्या धारा वाहू लागतात.आम्ही हा ट्रेक मार्च महिन्यात च केला असल्याने या सर्व अनुभवाची प्रचिती आम्हाला येत होती.
साधारणतः एक तासांचे पदभ्रमण केल्यावर आम्ही खडसांबळेच्या प्रचंड मोठ्या लेण्यात दाखल झालो.
हे ठिकाण आडबाजूला असल्यामुळे येथे मानवी वावर फारच कमी आहे.त्यात पूर्वी असलेली पाण्याची टाकी उन्हाळ्यात कोरडी पडल्यामुळे पाण्याचेही दुर्भिक्ष जाणवते. या येथे आपण संपूर्ण लेणी फिरून , थोडीशी विश्रांती घ्यावी.
ही लेणी महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातल्या , सुधागड तालुक्यातील आहेत.हा इ.स.पू. पहिल्या शतकामध्ये कोरलेल्या ३७ बौद्ध लेण्यांचा समूह आहे . या लेणी नाडसूर लेणी ( ठाणाळ लेण्यापासून ) दक्षिणेस ९ कि.मी. तर पालीपासून ३५ किमी अंतरावर आहेत . या लेण्यांचा दगड हा लाल रंगाच्या मुरूम असणारा दगड असून जास्त टिकाऊ नाही , त्यामुळे या लेण्यांचे खूप नुकसान झालेले आहे . या ठिकाणी जवळपास ३० ते ४८ लेणी समूह असल्याचे लेणी अभ्यासकांचे म्हणणे आहे . काही जण २१ च लेण्यांचा उल्लेख करतात , कारण घाटवाट प्रत्यक्ष त्या लेण्या किती हे आता सांगणे कठीण झालेले आहे . कारण
प्रत्यक्ष त्या लेण्या किती हे आता सांगणे कठीण झालेले आहे . कारण बरीच लेणी ही गाडली गेली आहेत . डोंगराचा कडा कोसळल्याने बहुतांश लेणी नष्ट झालेली आहेत.
खडसांबळे लेणी ही नेणावली गावात असल्याने त्यांना नेणावली लेणी म्हटले गेले पाहिजे, परंतु ब्रिटिश अभ्यासकांनी खडसांबळे नाव दिले असावे असा अंदाज वर्तवणे चुकीचे ठरणार नाही. या लेण्यांचे वैशिष्ट्य असे की याच्या एका बाजूला ठाणाळे म्हणजे नाडसूरची लेणी आहेत , दुसऱ्या बाजूला गोमाशी लेणी आहेत . दोन्हीही बौद्ध लेणी आहेत . गोमाशी लेण्यात भूमी स्पर्श मुद्रेत असणारी बुद्धाची मूर्ती असून एक छोटेसेच लेणे आहे.
लेणे पाहुन झाल्यावर येथून परत खाली उतरून डावीकडे जाणार्या वाटेने समोर आडवी तिडवी पसरलेली सह्याद्रीची रांग ओलांडून या त्रिव उन्हात व वीरळ जंगलातून पुढे जात राहायचे.
थोड्या सपाटी नंतर एका कोरड्या पडलेल्या नदीपात्रात आपण पोहोचतो. येथे जवळच रांजणखळग्यात साठलेले पाणी आढळते. परंतु ते फारसे पिण्यायोग्य नाही, जर आपल्याकडे पाणीसाठा संपला असेल तर नाईलाजास्तव येथून बाटल्या भरून घ्याव्यात, कारण येथून पुढील मार्गावर पाणीसाठा कोठेही उपलब्ध नाही.
येथून पुढे संपूर्ण उरावरची चढण सुरु होते. याच घाट वाटेला डेरे घाट म्हणतात.
जंगल ही खुप आहे, परंतू या वाटेवरुन पुढे जाताना वाट चुकण्याची शक्यता बिलकुल नाही. काही ठिकाणी कातळात खोदलेल्या पायऱ्या हा मार्ग प्राचीन काळी ही चांगलाच वापरात असावा याची साक्ष देतो.एका ठिकाणी मात्र अवघड वळण व चढण असल्याने काळजीपूर्वक चढावे लागते.
उन्हाची झळ खूपच त्रिव स्वरुपाची होती, याला कारण म्हणजे रायगड जिल्हा, म्हणजे कोकणातील वाट उन्हाची झळ तर बसणारच. चढण बऱ्यापैकी होती, त्यात माथ्यावर सुर्यदेवता विराजमान असल्यामूळे पाण्याची कमतरता जाणवत होती. आज आम्ही सह्याद्री ट्रेकर्स चे ३० सदस्य या ट्रेक मधे सामिल झालो होतो. यातील काही सदस्य तर नवीनच होते, त्यामुळे त्यांना त्रास होणे हे सहाजिकच होते.परंतू विशेष म्हणजे, आज माझा हा २०७ वा ट्रेक असुनही, इतका प्रदिर्घ अनुभव असुन ही मला ही खुप त्रास होत होता. माझ्या पायाला प्रचंड cramp येत होते. साधारणतः ३ तासाच्या अथक पदभ्रमणानंतर मला त्रास होऊ लागला.एक पाय उचलला कि लगेचच दुसऱ्या पायाला cramp येत होता. दोन्ही पायाला आलटून- पालटून cramp येत राहिला. चढण चढताना खूपच त्रास होत होता. या माझ्या बिकट परिस्तिथीत मला राजू टिळेकर व दिपक खराडे यांची खूप मोलाची साथ लाभली.चढन चढून आम्ही पठारावर पोहोचलो.या येथे चार ते सहा घरांची वस्ती आहे, येथे आपण आपल्याकडच्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्याव्यात. येथून पुढे आपण थोड्याच वेळात , शेवटचे ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील घुटका या गावी बारा किलोमीटर चे पद्भ्रमण करुन पोहोचलो.
अश्या रीतीने आम्ही कठीण असा ट्रेक लीलया पणे पार केला.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Comments
Post a Comment