आडवाटेवरची भटकंती : फिरंगाई माता लेणी व पिर बाबा डोंगर

आडवाटेवरची भटकंती: फिरंगाई माता
नाणोली 
ता : मावळ 
जि : पुणे 
मार्ग : पुणे-देहू रोड फाटा-तळेगाव एम.आय.डी.सी.-जे.सी.बी.
कंपनी-बी.आय.येस.कंपनी.
अंतर : ५४ किलोमिटर.
पायथ्याची स.स.पासुन  उंची : ५६८ मी.( १८६३ फुट)
फिरंगाई माता मंदीराची उंची स.स.पासुन: ७४६ मी.( २४४७ फुट)
पायथ्यापासुन मंदीरापर्यंत प्रत्यक्ष चढाई: १७८ मी.(५८४ फुट)


फिरंगाई माता मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही  ६ सप्टेंबर २०२० रोजी  वर दर्शविलेल्या मार्गाने मार्गक्रमण  करित तळेगाव midc येथील jcb co.येथे पोहचलो.

या येथे चार   चाकी वाहन  पार्क करुन बाजुला असलेल्या गेट मधून पुढे मार्गस्थ झालो.



दुचाकी गाडी मंदिरापर्यत जाते,परंतू कच्चा मातिचा रस्ता व खढी चढण
असल्यामूळे दुचाकी वर जाणे, म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखी आहे.साधारणत ५०० मी.सपाटी भागातून व पंधरा मिनिटांचे पदभ्रमण केल्यानंतर आम्हाला डाव्या बाजूस एक कमान लागली.

या कमानी त प्रवेश करुन पुढे निघालो.




येथून पुढे ५०० मी.चालून गेल्यानंतर खढी चढण असलेली  वाट सुरु झाली.



आपण जर एप्रिल-मे महिन्यात जर या ठिकाणी येणार असाल, तर उन्हाची त्रिवता अधिक जाणवते.आम्ही  सप्टेंबर महिन्यात आलो होतो, त्या दिवशी पाऊस नसल्याने आम्हाला ही खढी चढण चढताना खुप त्रास झाला. ऑक्टोंबर महिन्यात जी उन्हाची झळ बसते, ती आम्हाला सप्टेंबर महिन्यातच जाणवली होती.वाट अतिशय मळलेली असल्याने, स्थानिक सोबतीला सोबत घेण्याची गरज लागत नाही.

मजल-दर मजल करित आम्ही  पायथ्यापासुन १.८६ किलोमिटर व एक तासांचे पद्भ्रमण करुन मंदिराच्या परिसरात  पोहचतो.






फिरंगाई मातेचे दर्शन घेण्यासाठी पुर्वी येथे कातळात  खोदलेलया पायरी मार्ग होतो, आजही आहे.परंतू हा मार्ग जोखमीचा असल्याने कोणी वापरत नाही.


स्थानिक  मंडळींनी येथे सिमेंट काँक्रीटचा पायरी मार्ग बनवीला आहे. 



नवरात्र उत्सवात या ठिकाणी स्थनिक व आजुबाजुच्या परिसरातील भक्त मंडळी येथे येतात.लहाण  मुले व जेष्ठ नागरिक ही मोठ्या प्रमाणात येथे येतात, त्यांची गैरसोय होवू नये, म्हणून सिमेंट काँक्रीटच्या पायऱ्या केल्या  आहेत.जवळपास ६० पायऱ्या चढून आपण फिरंगाई मातेच्या मंदिरात पोहचलो.


फिरंगाई मातेचे हे प्राचीन मंदीर आहे.





या येथे खुप लेण्या आहेत, परंतू लेण्या पर्यत जाण्यासाठी वाट नाही.सरळ सोट उभा कातळ मार्ग आहे.



या लेण्या सातवाहण म्हणजे जवळपास दोन हजार वर्षा पुर्वीच्या आहेत.या येथून सभोवतालचा परिसर खुप छान दिसतो.
भामचंद्र डोंगर समोरच दिसतो, तसेच त्यापाठीमागे भंडारा डोंगर ही  दिसतो.

तसेच पिरबाबा डोंगर ही दिसतो.




     फिरंगाई मातेचे दर्शन घेउन आम्ही मंदिराच्या डाव्या बाजुने पुढे निघालो.

येथे कातळात कोरलेली हनुमानाची मुर्ती आहे.



त्याच्या पुढे एक लेणी आहे.या लेणी च्या पुढे अजुन एक लेणी आहे, परंतू त्या ठिकाणी जाण्यासाठी  वाट नाही.डावी बाजू फिरुन आम्ही मंदिराच्या उजव्या बाजुने पुढे निघालो.


थोड्याच वेळात आम्ही  दगडी कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाकी पाशी पोहचलो .या ठिकाणी जाण्यासाठी साखळी ला पकडून वर जावे लागते.अतिशय थरार असा हा मार्ग आहे.



टाके पाहुन परत माघारी फिरलो.व नंतर  आल्या मार्गाने  पायउतार झालो.



    येथून जवळ असलेल्या गोळेवाडी येथे पोहचलो.हॉटेल समाधान च्या पाठीमागच्या बाजुने पिर बाबा येथील डोंगराची वाट आहे.



येथून आम्ही पद्भ्रमण सुरु केले.


उन्हाची झळ प्रचंड जाणवत होती.घामाच्या धारा वाहु लागल्या.वाट अतिशय मळलेली असल्याने वाटाड्या ला सोबत न घेता आम्ही निघालो.पंधरा-वीस मिनिटानंतर खढी चढण सुरु झाली.चालताना खुपच दमछाक होत होती.कासवाच्या चालीने आम्ही चालत होतो.तसा पाहिले तर या डोंगराच्या माथ्यावर पोहचायला पाऊण ते एक तास लागतो.परंतू आज उन्ह खुप कडक असल्याने चालण्याचा वेग मंदावला होता.


या मार्गावर खुप ठिकाणी  सिमेंट कॉंक्रीट च्या पायऱ्या केलेल्या आहेत.


मजल दर मजल करित आम्ही पावणे दोन तासात पिर  बाबांच्या  च्या दर्ग्यात पोहचलो.




या येथे पिर बाबांचे दर्शन घेतले.व आजुबाजुचा परिसर फिरुन लगेच पायउतार झालो.अर्ध्या तासात आम्ही गोळेवाडी येथे पोहचलो.
     आज आमची आडवाटेवरची फिरंगाई माता व पिर बाबा ही भटकंती पुर्ण झाली.

 
     मी व सचिन  मांढरे या आडवाटेवरच्या भटकंती त सामिल होतो.

Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर