रायरेश्वर पठार
रायरेश्वर पठार
(पऱ्हर बु. ते कोर्ले )
ता :भोर
जि :पुणे
छत्रपती शिवाजी महाराज शंभू महादेवाचे भक्त होते. त्यांच्या राजगड ,रायगड या राजधान्या मध्येही महादेवाच्या मंदिराला खास स्थान होते. त्यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूमध्येही पूजेचे एक शिवलिंग नेहमी त्यांच्या बरोबर असायचे. त्यांच्या नावातच शिव शब्द आहे. तर या शंभू महादेवाविषयी एक आंतरिक ओढ कायम असायची.
महादेव हा वैरागी !
कंबरेला फक्त वाघाचे कातडे लावून राहणारा.
वैराग्याचे प्रतीक !!
हे प्रतीक महाराजांनी पुरेपूर अंगी बाणले होते. एका रियासतीचा सार्वभौम राजा होऊनही त्याचा भोग न घेता " रयतेच्या गवताच्या काडीलाही मोबदला दिल्याशिवाय हात न लावण्याची" आज्ञा आपल्या सैनिकांना देणारा हा राजा. हे वैराग्य त्यांना शोभून दिसते म्हणूनच राजा असूनही ते श्रीमान योगी होते.
महाराष्ट्राच्या मनांत रायरेश्वर या ठिकानाबद्दल एक आदराची भावना कायमच राहिली आहे. इथेच शंभू महादेवाला साक्षी ठेऊन महाराजांनी २७ एप्रिल १६४५ रोजी स्वराज्याची शपथ घेतली. त्या ठिकाणचा ट्रेक म्हणजे कोणासाठीही पर्वणीच !
हा ट्रेक करण्यासाठि आम्ही सह्याद्री ट्रेकर्स फाऊंडेशन चे सदस्य १८ ऑगस्ट २०१३ रोजी खाजगी वाहनाने प्रवास सुरु करुन,
पऱ्हर बुद्रुक येथील दाबके वाडीत पोहचलो.
येथूनच ट्रेकला सुरुवात केली.
नीरा देवधर च्या जलाशयाकडे पाठ करून सुमारे १८०० फूट उंचीचा डोंगर चढायला सुरुवात केली,
दोन तासांत आम्ही, एका टप्प्यावर येऊन पोहोचलो.
धुके असल्यास दाट धुक्याने संपूर्ण पठार भरून जाते.या ठिकाणी चुकामुक होण्याची शक्यता असल्याने ग्रूप मधील सर्वांनी बरोबर राहून पदभ्रमण करावे.
थोड्याच वेळांत पूर्वेकडे वळून आमची एका अद्भुत प्रदेशातून सफर सुरू झाली.
सर्वत्र जमिनीवर चांदण्यांचा सडा पडावा तशा अगणित रानहळद फुलांचा सडा पडलेला दिसला.
पाऊस....धुके.... सौम्य उजेड यामध्ये त्या पांढऱ्या-पिवळ्या फुलांचा रस्ता म्हणजे जणू स्वर्गाचीच वाट असावी असा भास होत होता.
ही फुले संपूर्ण जगात फक्त सह्याद्रीच्या पश्चिम आणि पूर्व रांगांवरच आढळतात. आणि जगातील दुर्मिळ होण्याच्या मार्गावर असलेल्या IUCN रेडलिस्ट मध्ये या फुलांचा समावेश आहे.
जवळपास तीन ते साडे तीन तासांचे पदभ्रमण केल्यावर आम्ही रायरेश्वर मंदिरापाशी पोहोचलो. मंदिरात आत जाऊन दर्शन घेतले.
मंदिर पाहून पुढे निघालो, अर्ध्या तासाची सपाट वाट संपून शिडीच्या वाटेवर येऊन आम्ही पोहोचलो.
आणि येथे ट्रेकचा दुसरा टप्पा सुरू झाला.
केंजळगड आणि रायरेश्वर या मधल्या वाटेने हिरव्या प्रदेशात प्रवेश करावा तसा प्रवास सुरु झाला.
आजूबाजूचे हिरवे गालीचे आणी डोंगरावरून एकामागोमाग ओळीने येणारे धबधबे पहात,
साधारणतः आम्ही दोन ते सव्वा दोन तासात कोर्ले गावांत पोहोचलो.
आणि एक अद्भुत,ऐतिहासिक,निसर्गरम्य पायवाट सहा ते साडे सहा तासांची पार करून आमच्या ट्रेक ची यशस्वी सांगता पूर्ण झाली.
वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.
आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.
Please Follow Above Links.
like, Subscribe, Share,
Regards
Sushil Dudhane
9822377653

प्रत्यक्षात रायरेश्वरावर जाऊन आल्याचा पुन्हा एकदा अनूभव आला. छान मांडणी आहे सर.
ReplyDeleteधन्यवाद
Delete