भिमाशंकर ते पाटण

घोडनदी उगम ट्रेक - भीमाशंकर ते पाटण

भिमाशंकर 
 ता : खेड 
 जि : पुणे
 मार्ग : पुणे -खेड- भीमाशंकर 


    भीमा नदी ही  पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी एक  आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे तिला चंद्रभागा म्हणतात.ती महाराष्ट्रात भीमाशंकरजवळ उगम पावते व अंदाजे ७२५ कि.मी. आग्नेयेस वाहून कर्नाटकात रायचूरजवळ कृष्णा नदीला मिळते.घोड नदी ही भीमेची उपनदी आहे आणि मीना व कुकडी या घोड नदीच्या उपनद्या आहेत . याच नद्या पुढे जाऊन भीमा नदी या नावाने ओळखल्या जातात . 
महाराष्ट्रातील बहुतेक नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहतात आणि उर्वरित आठ महिने कोरड्या असतात . महाराष्ट्रावरील परकीय आक्रमण येथील नद्यांमुळे कधी अडले किंवा लांबले नाही. अडले ते केवळ सह्याद्रीमुळे.


     हा ट्रेक करण्यासाठी आम्ही २७ डिसेंबर २०१५ रोजी पुणे-खेड-राजगुरुनगर-  भिमाशंकर असा खाजगी वाहनाने प्रवास करुन भिमाशंकर येथे पोहचलो.





भीमाशंकराचे दर्शन घेऊन येथूनच  ट्रेकला सुरुवात  केली. 




भीमाशंकर परिसरातील जंगल वाटेने  दोन  तासांचे पदभ्रमण करून आम्ही कोंढवळ गवांडेवाडी येथे पोहोचलो.




सर्व रस्ता घोडनदीला समांतर असल्याने 
निसर्गदर्शन घेत  ट्रेक चालू ठेवला.


येथेच झुळझुळ वाहणाऱ्या नदीकाठी जेवणाचा बेत उरकून घेतला. 




या ठिकाणी जेवताना अन्नाची चव किती रुचकर  लागते , याची मजा काही औरच ; पण ही मजा घरी बसणाऱ्यांना समजणार नाही.त्याची मजा फक्त ट्रेकर्स मंडळीच घेऊ शकतात.पेट पूजा उरकून , थोडी विश्रांती घेऊन पुढे चालायला सुरुवात केली.

 आता जंगल मागे पडून मोकळा परिसर सुरू झाला.उन्हाच्या झळा घामातून बाहेर पडू लागल्या.



आमुंडे वस्तीचा डोंगर चढताना उन्हाचा खूप त्रास जाणवला.




 एक सलग तासभराची चढण संपवून आम्हाला  वनघरे वस्ती लागली.खेड्यातील काटक,कष्टाळू  लोक सुखाच्या शोधात उपजीविकेसाठी शहरात , आणि शहरातील सुखवस्तू ढेरपोटे लोक आरोग्याच्या शोधात रानावनात असे एक वर्तुळ चालू आहे.


    वनघरे वस्तीपासून अजून खूप पायपीट बाकी होती.रमत-गमत,फोटो शुट करित  पदभ्रमण चालू ठेवले.


 जवळपास सहा तासांच्या अथक परिश्रमाने साकेरी (खडकवाडी) ता:आंबेगाव, जि:पुणे या  गावात आम्ही  पोहोचलो. 






येथून डिभा धरणाचे बॅकवॉटर अगदी स्पष्ट  दिसत होते.ते उजवीकडे ठेवून आम्ही  आता पाटण गावात जाण्यासाठी छोट्या जंगलाच्या भागातून उतरण्यास सुरुवात केली. हवा आणि सावली असल्याने पद्भ्रमण करताना थकवा जाणवत न्हवता. प्रवासातील एक निरीक्षण म्हणजे , आभाळी या रानफुलांची संगत शेवटपर्यंत राहते . डोंगर उतरून आम्ही  पाटण गावात पोहोचलो. येथे बंधाऱ्यातील थंड पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला. अशा प्रकारे जवळपास सहा ते सात तासांचे पदभ्रमण करून आमच्या  ट्रेकची यशस्वी सांगता झाली.



वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.





Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर