श्रावण महिन्यातील भटकंती: हरेश्वर मंदीर व कातुरजाई मंदिरांची

               हरेश्वर मंदीर 
               पांगारे गाव 
        ता : पुरंदर 
        जि : पुणे 



        हरेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आम्ही वडगाव-कात्रज-खडी मशीन चौक-बापदेव घाट मार्गे चार चाकी वाहनाने प्रवास करुन  सासवड येथे पोहचलो.

सासवड वरुन पुढे पिंपळे फाट्या पासुन आत सासवड वीर रोड ने साडेपाच किलोमीटर वर असलेल्या पिंपळे या गावी पोहचलो.



येथे हरेश्वर मंदीर असा बोर्ड लावलेला आहे.हरेश्वर मंदीर हे पिंपळे व पांगारे या दोन्ही गावांच्या हद्दीत येते.


     पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कऱ्हामाई व भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.
     शिवछत्रपतींच्या तीर्थरूपांचे  हे जहागिरीतील गाव. साबगर खिंड, पांगार खिंड, पानवडीची खिंड, बोपदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट, दिवे घाट, शिंदवणे घाट इ. ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते, ते  रास्त होय. निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयनमनोहर, तितकेच हे ऐतिहासिक दृष्ट्या रोमहर्षक, स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे. सासवडच्या अणुरेणूतही तेजस्वी इतिहासाची साक्ष आपणांस आजही इथे उभ्या असलेल्या प्राचीन भव्य वास्तू व ठिकठिकाणी विखुरलेल्या अवशेषांमधून मिळते. यामध्ये भैरोबा मंदिर, सोपानदेवांची समाधी, संगमेश्वर मंदिर, चांगावटेश्वर मंदिर, कऱ्हाबाई मंदिर, हरेश्वर मंदीर  आदी ठिकाणे येतात. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरू पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव यांची  समाधी इथे आजही साक्ष देईल.
      पिंपळे येथील हरेश्वर मंदीर हे पुण्यापासुन ३८ किलोमिटर अंतरावर आहे.

येथूनच आम्ही हरेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी निघालो.




पिंपळे हे गाव स.स.पासुन ७६२ मी.(२४९९ फुट) उंचीवर आहे.



सुरुवातीपासूनच खढी चढण सुरु झाली.




वाट अतिशय मळलेली आहे, स्थनिक लोकांची येथे वर्दळ असते.



श्रावण महिना असल्याने येथे भाविक महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन होणे, हे आमच्यासाठी खुप भाग्याचे होते.

साधारणतः पाऊण किलोमीटर व २५ मिनिटात आम्ही हरेश्वर मंदीर येथे पोहोचलो.




हरेश्वर मंदीर हे स.स.पासुन ८८४ मी.(२९०० फुट) उंचीवर आहे.




पायथ्यापासुन आम्ही १२२ मी.(४०० फुट) ची उंची पार करुन पोहचलो.

या येथे शंकराची पिंड व मंदीराबाहेर नंदी आहे.हरेश्वर चे मनोभावे दर्शन घेतले.




हरेश्वर मंदीराच्या परिसरात दत्त मंदीर आहे.

हरेश्वर मंदीर हे प्राचीन आहे.

मंदिराच्या माथ्यावरुन सभोवतालचा परिसर खुप छान दिसतो.येथून दुरवर पुरंदर, वज्रगड, सुर्य व चंद्र  डोंगर,सिंहगड, राजगड, विर धरण, नाझरे धरण हा सर्व परिसर दिसतो.



     मंदिराचा परिसर मोठा आहे, या येथे आम्ही न्याहारी केली.नंतर परत पायथ्याशी जाण्यासाठी निघालो.

उतरताना थोडी दक्षता व सावधानता बाळगून उतरावे लागते.उतरिनीच्या मार्गावर  छोटे-छोटे दगड विखुरलेले असल्याने, उतरताना पाय घसरून पडण्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळे उतरताना सावकाश उतरावे.



वीस ते पंचवीस मिनिटात आम्ही पायथ्याशी पोहचलो.


    पिंपळे गावापासून वीर गाव  फक्त २० किलोमीटर अंतरावर आहे.वीर येथे नाथ म्हस्कोबा चे मंदीर आहे.


     हरेश्वर मंदिरापासुन आम्ही परत सासवड येथे जाण्यासाठी निघालो, वाटेत आम्ही पिंपळे पोमण नगर येथील श्री.कालभैरव नाथ मंदिराचे दर्शन घेतले.मंदीर बंद असल्याने, गाभाऱ्यात जाता आले नाही.बाहेरुनच दर्शन घेतले.


सासवड वरुन भिवडी मार्गे नारायणपूर दत्त मंदिराच्या पुढे चिव्हेवाडी येथील कातुरजाई माता मंदीरा पाशी पोहचलो.चारचाकी वाहन थेट मंदिरापर्यत जाते.


आम्ही मात्र आमच्या कडील असलेले चार चाकी वाहन मंदिराच्या अलिकडेच पार्क केले, व मंदिराच्या दिशेने पायी  निघालो.






कातुरजाई माता मंदीर हे खुप जुने आहे.





येथून वरच्या बाजुला पुरंदर किल्ल्याची मागची बाजू दिसते.



येथील स्थानिक लोकांच्या सांगण्यावरुन, हे कातुरजाई चे मंदीर हे पुरंदर किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात होते, या भागातून एक मोठी शिळा खाली पडली.ही शिळा ज्या ठिकाणी पडली,त्या ठिकाणी आत्ता हे मंदीर आहे.

ही मोठी शिळा मंदिराच्या मागिल बाजूस आपणास दिसते.




कातुरजाई मंदिराचे दर्शन घेउन, संपूर्ण मंदीर परिसर फिरलो, मंदिर पाहण्यासारखे आहे.




  मंदीर पाहुन झाल्यावर कापूरहोल मार्गे पुण्याकडे मार्गस्थ  झालो.


     आजच्या मोहिमेत सचिन मांढरे, अतुल हरगुडकर व मी सुशिल दुधाणे यांचा सहभाग होता.




Comments

Popular posts from this blog

पद्भ्रमण ठोसेघर ते जुंगटी

कान्हुर पठार

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर