भटकंती शिब्रा डोंगर व प्राचीन भुयारांची

भटकंती अपरिचित व दुर्लक्षित प्राचीन भुयाराची
         

ता : भोर
जि : पुणे
पायथ्याचे गाव : खंडोबा माळ (५७० मी.१८७० फूट)
मार्ग : सिंहगड रोड-शिवापुर-नसरापूर-कापूर होळ फाटा-नेकलेस पॉईंट.

    जय शिवराय,
करोना गो....मित्रांनो करोना चा पादुर्भाव अजुन काही कमी झालेला नाही.संपूर्ण भारत देशात सध्या लॉकडाऊन चा पाचवा टप्पा सुरु झाला आहे.पण या पाचव्या टप्प्यांत थोडे निर्बंध कमी केलेले आहेत.फक्त एका राज्यातून , दुसरया राज्यात जाण्यासाठी परवानगी नाही.
    आम्हा भटक्या मंडळीना तर, गेली तिन महिने घरातच बसुन काढावी लागली.आमची तर अवस्था...पाण्यातील माशाला ,पाण्यातून बाहेर काढून जेव्हा जमिनिवर ठेवला जातो,त्या वेळेस जी माश्याची अवस्था होते म्हणजे त्याची जी तडफड होते  ...अगदी तशीच अवस्था आमच्या भटक्या मंडळीची झालेली आहे.थोडी शिथीलता झाल्या कारणाने आज मी थोडे हटके ठिकाण करायचे ठरविले, गर्दी पासुन दुर व स्थानीक गावकरिंना आम्हा पासुन कोणताही त्रास होऊ नये,असे ठिकाण निवडले.
    मी मुळचा भोर चा, नांद हे माझे गाव.सध्या पुण्यात स्थायिक असुन अधून-मधून गावाला येत जात असतो.
       ७ जुन २०२० भोर च्या अलिकडे,

नेकलेस पॉईंट आहे,


त्याच्या उजव्या बाजुला खंडोबा माळ आहे,

त्या ठिकाणी प्राचीन भैरवनाथ मंदीर आहे,


 त्याच्या वरती शिब्रा डोंगर आहे ,त्याच्या टॉप वर न जाता खालच्या बाजुला असलेल्या प्राचीन भुयाराला भेट देण्यासाठी निघालो.
     पुण्याहून खाजगी वाहनाने मी व माझ्या सोसायटीतिल माझा मित्र,

 निखिल गोसावी


 सकाळी ८.१५ वाजता सिंहगड रोड पुणे हिंगने खुर्द येथून  कार ने प्रवासास सुरुवात केली. बंगलोर  हाईवेने शिवापुर-नसरापूर-कापूरहोळ मार्गे भोर च्या दिशेने निघालो. कापूरहोळ फाट्या पासुन उजवीकडून भोर च्या दिशेने निघालो.कापूरहोळ फाट्यापासुन ५ किलोमीटर अंतरावर नेकलेस पॉईंट आहे,नेकलेस पॉईंट पुण्याहुन भोरला जाताना डावीकडे आहे, त्याच्या उजव्या बाजुला एक फाटा, आत खंडोबा माळ कडे जातो,त्या बाजुने २०० मी.वर प्राचीन खंडोबाचे मंदीर आहे.सिंहगड रोड वरुन ४० किलो.अंतर पार करुन आम्ही येथे पोहचलो.

भोर वरुन आमचे मित्र चंद्रशेखर शेळके साहेब,


तसेच त्यांचा भाचा साहिल वाघमारे 


व आमचे मेहुणे सुरेश शिंदे साहेब 


 तसेच आमचा मित्र वाटाड़या रवी  गाडे 



         हे  सर्व जण आम्हाला नेकलेस पॉईंट येथे भेटले.नंतर आम्ही सर्वजण एकत्र,

 भटकंती ला सुरुवात केली. 


मंदिराच्या बाजुनेच शिब्रा डोंगरावर जाणारी वाट आहे.मंदिरापासुन अवघ्या हाकेच्या अंतरावर एक समाधी आहे.गावकरी मंडळी च्या म्हणण्यानुसार ही समाधी नसुन पहिले येथे मंदीर होते.काही इतिहासकार म्हणतात की ही,

 कोयाजी बांदल यांची समाधी आहे.इतिहासातील संदर्भ  पाहता ही  समाधी कोयाजी  बांदल यांचीच  आहे.



   

     समाधी स्थळाचे दर्शन  घेउन आम्ही  शिब्रा डोंगरच्या दिशेने चालु लागलो.
     वाट खुपच मळलेली असल्यामूळे व आमच्या सोबत स्थानिक आमचा मित्र रवी गाडे होता म्हणून आम्ही वाटाड़या न घेता वाटचाल सुरु ठेवली.

थोड्या सपाटीनंतर खढी चढण सुरु झाली.


डाव्या बाजुला भाटघर धरणाचे विहंगम दुश्य नजरेस पडत होते.


नर्हे-संगमनेर वाडी ही नजरेस पडत होती.नेकलेस पॉईंट या डोंगरावरून अगदी मनमोहक दिसतो.

तसेच दक्षीणेकडे रोहिडा/विचित्रगड नजरेस पडतो.मजल-दर मजल करित आम्ही शिब्रा डोंगराच्या टॉप च्या जवळ जवळपास २.८० किलोमीटर  व दिड तासात ७८४ मी.(२५७२ फूट) स.स.पासुन व खंडोबा मंदिरापासुन २१४ मी.(८०० फूट) चढण चढून  पोहचलो.नजरेच्या अगदी जवळच्या टप्प्यांवर शिब्रा डोंगर दिसतो, पण आपण डोंगरावर न जाता त्याच्या उजवीकडची वाट पकडायची.वाट थोडी निमूलती आहे,जपुन पुढे जात रहावे.थोड्याच वेळात खाली जाणारी मळलेली वाट पकडून खाली उतरायला सुरुवात करावी.उतरताना सावधानता बाळगून व योग्य ती खबरदारी घेउन,प्रसंगी एकमेकांना हाथ देऊन उतरावे.उतार त्रिव स्वरुपाचा असल्याने,

 थोडी  फार घसरगुंडी करत उतरावे लागते.


थोड्याच वेळात आपण प्राचीन गुहेपाशी सुरुवातीपासुन म्हणजे खंडोबा मंदिरापासुन गुहेपर्यत २.९२ किलोमीटर व पावणे दोन तासात रमत-गमत , मज्जा-मस्ती करित पोहचतो.

निसर्गाचा अदभुत चमत्कार येथे आपणास पहावयास मिळतो.

दोन भुयार येथे आपणास पहावयास मिळतात.


या येथे आम्ही पोहचतास हा नजारा पाहुन आम्ही थक्कच झालो.येथे पोहचतास माझी अभ्यास मोहीम सुरु झाली.

    प्रथम उजवीकडे असलेल्या  गुहेची लांबी-रुंदी टेप च्या सहाय्याने घेण्यास सुरुवात केली.



सुरुवात जेथून होते त् या गुहेची उंची ६ʼ८ʼʼ , रुंदी ९ʼ९ʼʼ व लांबी, आत मधे शिरल्यावर जवळपास २३ फुटावर डावी व उजवी कडे दोन भुयार नजरेस पडतात.

डावी कडे असलेल्या भुयालातून ,तेथून पलिकडे असलेले भुयार दिसते, हे भुयार आरपार आहे, 

पण येथून पलिकडे जाता येत नाही,खुप अरुंद वाट आहे,लहान मुलगा ही जाऊ शकणार नाही असे.
   उजव्या बाजूचे भुयार ही आत मधे बरेच आहे.उजव्या व डाव्या बाजुच्या भुयारासमोर लांब अंतरावर म्हणजे ५० फूट आत पर्यत आम्ही जाऊ शकलो, तेथून पुढे हे भुयार अजुन पुढे निघते,

वटवाघुळ खुप प्रमाणात असल्यामुळे आम्ही पुढे जाण्याचे व आतील वाट ही खुप अरुंद असल्याने जाण्याचे टाळले.
  उजवीकडील भुयार पाहुन परत बाहेर आलो.नंतर डाव्या बाजूचे भुयार पाहण्यासाठी निघालो.हे भुयार २१ फूट रुंद प्रशस्त आहे,उंची सुरवातीला ५ʼ९ʼʼ  आहे, जवळपास ३५ फूट आत आहे.३५ फुटावर वाट बंद झालेली आहे.ज्या ठिकाणी वाट बंद होते त्या ठिकाणाची भुयाराची उंची ३ʼ४ʼʼ आहे.


    दोन्ही भुयारे आम्ही पाहिली,ही भुयारी नक्की कोठे निघतात,हे सांगता येणे कठिण आहे.स्थानिक गावकरी मन्डळीना ही माहित नाही.या भुयारात आर पार जाण्याचा प्रयत्न खंडोबा  मंदीर येथील पुजारि,

 दशरथ महाराज 


यांनी केला होता, पण दमछाक व अरुंद वाट असल्याने त्यांना शक्य झाले नाही.
    माझ्या मते, पण माझ्याकडे कोणताही पुरावा नसल्याने मी ठाम मत मांडू शकत नाही हे भुयार पुढे राजगड च्या सुवेळा माचिकडे जे भुयार आहे,तेथे निघत असावे,म्हणजे पुर्ण अंतर भुयारातून न जाता त्या पुढे कोठे तरी निघुन त्या दिशेने मिळत असावे,असे मला वाटते, मी दावा करु शकत नाही.कदाचित हे भुयार काही अंतरावर बंद सुद्धा झालेले असावे.
    दोन्ही भुयारे पाहुन आम्ही आलेल्या मार्गाने न जाता , भुयाराच्या डाव्या बाजुने खाली उतरण्यास सुरुवात केली, ही वाट खाली भैरवनाथ नगर,आळंदे वाडी गावात जाते.संपूर्ण उताराची व मळलेली अशी ही वाट आहे,आळंदे गावात न जाता आम्ही परत खंडोबा मंदिरापाशी भुयारापासुन जवळपास एका तासात पोहचलो.

आमचा ट्रेक ५.५ किलोमीटर व साडेतिन तासात पुर्ण झाला.



   वरिल ठिकाण हे फक्त स्थनिक गावातील लोकांना माहित आहे.भटकी मन्डळीना हे ठिकाण अपरिचित आहे.
     तुम्हाला जर फक्त भुयारे पाहायची  असल्यास तुम्ही भैरवनाथ नगर, आळंदे वाडी येथूनही जाऊ शकता, या वाडीहुन तुम्ही पाऊण तासात भुयारापाशी पोहचू शकता.
    शिब्रा डोंगर करण्यासाठी आम्ही गेलेल्या मार्गाने गेलात तर , या मार्गाने निसर्गाची बरसात पाहायला मिळते,व ट्रेक ही होतो.

   मंदिरात पेटपुजा उरकून 


आम्ही पुण्याकडे रवाना झालो.

    आजच्या भटकंती मधे श्री.चंद्रशेखर शेळके सर, श्री.सुरेश शिंदे साहेब, श्री.रवी गाडे, कु.साहिल वाघमारे, श्री.निखिल गोसावी व मी सुशिल दुधाणे यांचा सहभाग होता.



Comments

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर