भटकंती खुटा घाट वाटेची

              ट्रेक  घाटवाटा खुटा
  
         सह्याद्री ट्रेकर्स  फाउंडेशन , पुणे या संस्थेचा मी एक सदस्य  , आत्तापर्यंत संस्थेने जवळपास ५५०  च्या वर ट्रेक केले आहेत, गेली १७  वर्षापासून एक हि रविवार न चुकता ट्रेक अखंडित पणे चालू आहेत. संस्थेचे जवळपास २००० च्या वर सदस्य आहेत. श्री सुरेंद्र भाऊ दुगड हे या संस्थेचे संस्थापक/ सर्वेसर्वा आहेत. तसेच सुधाकर कुलकर्णी व विजय बुटाला साहेब हे देखील कमिटी पदावर कार्यरत आहेत.
           मी या संस्थेचा एक भाग म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, सह्याद्री मध्ये मनसोक्त भटकणे हा माझा छंद, सह्याद्री या नावातच सर्व काही  आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या  काळात शत्रूंना सह्याद्री चे नाव ऐकताच छातीत धडकी भरत असे, सह्याद्री ची रांग दूरवर विखुरली  आहे. महाराष्टाच्या पश्चिम भागात अरबी समुद्राला समांतर ४०  ते ८०  किलोमीटर अंतरावर दक्षिणोत्तर सह्याद्री पसरला आहे. यालाच पश्चिम घाट नावाने ओळखले जाते.उत्तरेस तापी नदीच्या खोऱ्यापासून दक्षिणेस कन्याकुमारी पर्यंत दक्षिणोत्तर लांबी १६००  किलोमीटर व महाराष्ट्रातील लांबी ४४०  किलोमीटर , उंची ९००  ते १२००  मीटर. या पर्वताचा पश्चिम उतार अतिशय त्रीव व पूर्व उतार एकदम मंद स्वरूपाचा आहे, सह्याद्री ची उंची उत्तरेस जास्त व दक्षिणेस कमी. दक्खन पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजे सह्याद्री पर्वत. पर्वत रांगेत दोन्ही प्रदेशात जाण्या-येण्या जोगा किंवा दळण वळणाचा डोंगर रस्ता म्हणजे घाट.सह्याद्रीत अनेक घाटवाटा आहेत, आता काळानुसार वाहने उपलब्ध  झाल्यामुळे गावकरी शक्यतो या वाटेने जात नाही. ट्रेकर्स मंडळी मात्र या घाटवाटा आवर्जून करतात, काही घाटवाटा अजूनही दुर्लक्षित  व अपरिचित आहेत, आम्ही नेहमी वेगवेगळ्या घाटवाटा शोधत असतो, काही पुस्तकांची मदत घेऊन , तर काही स्थानिक लोकांच्या मदतीने.
         आज आम्ही खुटा घाटवाट करण्यासाठी  १२ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे ५ वाजता ४५ सदस्यांनी  पुण्याहुन खाजगी वाहनाने प्रवासास  सुरुवात केली. 

भोर मार्गे गाडी वरंधा घाट रस्त्याने निघाली, 

वाजघाई मातेचे दर्शन घेउन,

 पुढे शिवथर घळ येथे सकाळी ८.३०  वाजता पोहचलो.

 चहा,बिस्किटे चा अल्पोपहार घेतला  व नंतर ,

श्री समर्थ रामदास स्वामींचे शिवथळ  घळीत दर्शन घेतले.

 या ठिकाणी रामदास  स्वामींनी दासबोध या महान ग्रंथाचे  लेखन केले होते. या ठिकाणाहूनच सकाळी ९.३०  वाजता  ट्रेकला सुरुवात केली. 

सुरुवाती पासून चढणीचा मार्ग सुरु झाला. 

साधारणतः १.७५  किलोमीटर चे पदभ्रमण करुन   गेल्यानंतर चंद्रराव मोरे यांचा वाडा लागला.वाडा पाहुन पुढे मार्गस्थ झालो. 

येथून पुढे २.१५  किलोमीटर वर  शेरवाडी येथील  महादेवाचे मंदिर लागले.


येथे जास्त वेळ न  थांबता पुढे  चालू लागलो. 

साधारणतः १.२५ तासात ३.५०  किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पठार चालू झाले. 


पठाराच्या उजवीकडच्या बाजुने  कुंड गावाकडे कूच केले, 

कुंड गावात ३५ घरे आहेत. कुंड गावातून पुढे  शिलिंब गावाकडे जायला २  किलोमीटर डांबरी रस्ता लागतो. डांबरी रस्त्याने जाताना पाय दुखू लागतात. शिलिंब गावी पोहचायला  जवळपास ७.३०  किलोमीटर अंतर पार करून आपण पोहचतो.  या येथे जेवणाचा बेत उरकून ,

पुढे  डाव्या बाजूने खढी  चढाई सुरु होते.


येथून पुढे आपले  लक्ष्य  हिरडोशी गाव गाठण्याचे.त्यादृष्टीने पुढे  मार्गस्थ झालो.येथून पुढची वाट खढी चढणीची असल्यामुळे चालण्याचा  वेग कमी  होत होतो.खढी चढणीची वाट जवळपास १  तासांची पार  करून नंतर,  

सपाटीची वाट सुरु होते.

 त्यानंतर लगेचच उताराची वाट  सुरु होते.साधारणतः अर्ध्या तासाची उताराची वाट  उतरून आपण  हिरडोशी फाट्याला लागतो.व या येथेच आपल्या  ट्रेकची सांगता होते.
       या  ट्रेक चे पद्भ्रमण साडे दहा किलोमिटर व जवळपास  पाच तासांचे होते.



        आजच्या ट्रेक मध्ये सर्वात लहान ८  वर्षाचा कृष्णा कोंडे व सर्वात ज्येष्ठ सदस्य  जयंत जोशी वय वर्ष ७० या सर्व वयोगटातील तरुण तुर्क म्हातारे अर्क सामील झाले होते.


वरिल घाट वाटेचे सविस्तर वर्णन मी माझ्या 'घाट वाटा ' व 'सह्याद्रीतील घाट वाटा ' या पुस्तकात लिहिले आहे.

     आपणा पैकी कोणाला माझी दोन्ही पुस्तके हवी असल्यास ९८२२३७७६५३ या माझ्या whatts up मोबाईल नंबर वर आपले नाव व राहत्या घरचा पत्ता पाठवून द्या.कुरियर किंवा स्पीड पोस्ट ने पुस्तके घरपोच पाठविण्याची व्यवस्था केली जाईल.



Comments

  1. Liked this short but sweet blog. We are friends on FB also. Presently I am not in India and as such unable to buy your book. But will surely do as soon as I come back.

    Thanks

    ReplyDelete
  2. छान माहिती व एक चांगला ट्रेक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर