राजगड प्रदक्षिणा

            राजगड परिक्रमा 
            १० मार्च २०१९
         
  आत्तापर्यंत मी ३  वेळा राजगड परिक्रमा केली आहे.
        परिक्रमा या शब्दांतचं याचा अर्थ दडलेला आहे.परिक्रमा म्हणजे थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, मंदिरात दर्शनाला गेल्यावर आपण, मंदिरातील देवांचे दर्शन घेऊन डावीकडून , उजवीकडे फेरी मारतो.अश्या पद्धतीने आपण फेरी मारतो.
      आज महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेर ही अनेक अशी ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी अशी पद्क्षिणा मारली जाते. आध्यात्मिक असो की गड फेरी.
   या मधे  प्रामुख्याने गिरनार परिक्रमा, नर्मदा परिक्रमा, रायगड परिक्रमा , राजगड परिक्रमा.
    परिक्रमा ही डावीकडून उजवीकडे मारली जाते.
      बरेच दिवस भटकंती...गड दुर्गाची मित्र परिवार चे संस्थापक राहुल नलावडे(रायबा) यांनी आम्हाला राजगड परिक्रमा करायची आहे ,

 असे मत मांडले होते.मागील रविवारी मी त्यांना सांगितले पुढिल  रविवारी आपण जाऊ , त्याप्रमाणे ग्रूप वर मेसेज टाकला , व १७ जणांची टीम तय्यार झाली.मोहिमेचे नेतृत्व मला देण्यात आले , कारण या आधी मी  दोन वेळा ही परिक्रमा केली होती. शनिवारी रात्री आम्हि वाजेघर येथे मुक्कामी जाण्यासाठी निघालो.रात्री दीड ला मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो, तेथील एका मंदिरात रायबाने आमची राहण्याची व्यवस्था केली.वाजेघर हे रायबा चे मुळ गाव.पहाटे सर्व नित्य कर्मे उरकून आम्हि रविवारी सकाळी ६.१५  ला भुतोडे खिंडीत पोहचलो.आज सह्याद्री ट्रेकेर्स फाउंडेशन, पुणे यांचाही हाच ट्रेक होता, मी या संस्थेचा एक जुना सदस्य आहे.त्या तेथे आमची भाऊ दुगड यांची भेट झाली.व ६.३० आम्हि ,

भुतोंडे खिंड पासून ट्रेकला सुरुवात केली.


सर्व सदस्यांना ट्रेक ची माहिती देऊन आम्हि निघालो.

सुरुवातीपासून च खडी चढण सुरू झाली.


अर्ध्या तासात आपण पाले खिंड येथे पोहचतो,

 या ठिकाणी डावीकडची वाट पाल या गावी जाते, आम्हि मात्र सरळ वाट पकडून साधारणतः पाऊण तासात  तासात आम्हि ,
संजीवनी माची च्या खाली पोहचलो.


या प्रदक्षिणा मार्गावर आपण गडाच्या खालच्या बाजूने प्रदक्षिणा मारतो.संजीवनी माचीच्या जवळ रायबाने शिव गर्जना दिली, व आम्हि माचीच्या डाव्या बाजूने प्रदक्षिणा चालू केली.

येथून पुढे  वाट अतिशय अरुंद आहे , एक पाऊल पडेल, इतकीच वाट.एक पाऊल जरी चुकले , तर थेट दरीच्या कुशीत विराजमान होण्याची नामी संधी.एका पाठोपाठ आम्हि चालत राहिलो.

मी सोडून सर्व सदस्यांची ही राजगड प्रदक्षिणा पहिलीच वेळ, त्यामुळे मी त्यांना वेळोवेळी सूचना देत होतो.संजीवनी माची पार करून आम्हि सूवेला माची च्या खाली पोहचलो.राजगड आपण सर्व वरच्या बाजूने फिरून पाहतो, पण या मार्गावर आपण गडावर न जाता, सर्व माच्या या गडाच्या खालच्या बाजूने पाहतो.तटबंदी कश्या प्रकारे बांधली आहे, ती या मार्गावरून पाहता येते.

या प्रत्येक माचीचे महत्व रायबा आम्हाला सांगत होता.

पाली दरवाजाच्या प्राचीन पायऱ्या च्या जवळ आम्हि पोहचलो.


व या येथून दरवाज्याला न जाता डावीकडच्या वाटेने पुढे  निघालो.उन्हाचा तडाखा प्रचंड जाणवत होता.पाण्याची कमतरता पावलो पावली जाणवत होती.

या मार्गावर कोठे ही पाण्याचा साठा उपलब्ध नाहि.त्यामुळे आपल्याजवळ कमीत कमी चार ते पाच लिटर पाणी जवळ बाळगावे लागते.सुरूवातीला जवळ पास पाच ते सहा तास मी आरामात चाललो होतो, नंतर मात्र माझी अवस्था खूपच बिकट होत चालली.माझी खूपच दमछाक होत होत होती.मी फक्त दोनच लिटर पाणी घेतले होते.ही माझी  सर्वात मोठी घोडचुक झाली.प्रदिर्घ अनुभव असुन सुद्धा माझ्याकडून ही चुक झाली.त्यामुळे माझ्याकडचे पाणी संपले होते.आमची टीम केव्हाच पुढे  निघून गेली होती.आता माझ्याबरोबर रवींद्र कुंभार हा एकच सदस्य बरोबर होता.त्याच्या कडे थोडेफार पाणी शिल्लक होते , ते मला तो देत राहीला.माझी अवस्था खूपच बिकट होत चालली होती.  वॉकी टॉकी वर  माझे सहकारी माझी विचारपूस करीत होते, सर तुम्ही कोठे आहात, मी मात्र त्यांना सांगत होतो, तुमच्या मागेच आहे.त्यांना मी माझी अवस्था सांगितली नाहि.फक्त त्यांना सांगायचो, तुम्ही पुढे चालत रहा. आता  मात्र मला चालणे खुप अवघड झाले होते, प्रत्येक पाऊल मी हळूहळू टाकत होतो, त्यातच मला सह्याद्री ट्रेकर ग्रूप मधील माझे सहकारी प्रसन्न कुलकर्णी चे  वडील रमेश कुलकर्णी  माझ्याजवळ आले, माझी अवस्था पाहुन ते माझ्याबरोबर चालू लागले.कुंभार व कुलकर्णी सर या दोघांनी मला हाताला पकडून अवघड वाट पार करायला मदत केली.काही अंतर चालल्यावर माझी अवस्था अजुन च बिघडली.पाण्याची प्रचंड कमतरता जाणवू लागली.बऱ्याच वेळा मी वाटेवर उन्हा-तानात तर कधी सावलीच्या छायेत थोड्या वेळ झोपून राहणे पसंद केले.पदभ्रमण मार्गावर सर्व जण माझी विचारपूस करीत होते.कोणाकडे ही पाणी शिल्लक न्हवते.सर्वांची अवस्था माझ्या सारखीच होती.ज्यांच्याकडे पाणी होते, ते मला एक घोट देत होते.माझा सहकारी रवींद्र कुंभार याने पाणी कोठे उपलब्ध होते का, ते पाहण्यासाठी पुढे  गेला.माझे नशीब बलवत्तर होते , त्याला एका ठिकाणी पाण्याचा भरलेला बॉक्स नजरेस पडला, आजूबाजूला विचारपूस केली , पण त्या ठिकाणी कोणीच दिसले नाहि.गडावर जे पाणी विकतात, त्यांचाच हा बॉक्स होता.त्यातील दोन पाण्याच्या बॉटल त्याने काढुन घेऊन माझ्याकडे आला.तोपर्यंत माझी अवस्था अजुन च बिघडली होती.सकाळपासून जे काही खाले होते, मोसंबी, काकडी ते उलटी वाटे बाहेर आले.नंतर तसेच पुढे  जात राहिलो.दिसेल त्या जागी वेळोवेळी थोडी फार वामकुक्षी घेत राहिलो.कसेबसे मी पाच वाजता पाल खिंडीच्या माथ्यावर पोहचलो.आता मात्र चालणे खूपच अवघड झाले होते, त्यातच माझ्या  पायाला cramp  येऊ लागले, मी वॉकी टॉकी वर माझ्या सदस्यांशी बोलून माझी अवस्था सांगितली.तोपर्यंत ते सर्व जण वाजेघर ला पोहचले होते.त्यातील दोन सदस्य रवी जांभुळकर  व तानाजी राजगुडे हे माझ्या मदतीला धावून आले.येताना त्यांनी दोन लिटर पाणी व गोळ्या घेऊन आले.पाणी पिऊन थोडी तरतरी आली.व त्यांच्या सहाय्याने मी पुढे  निघालो.राजू टिळेकर ही माझ्या बरोबर राहून त्याने  मला मदत केली.कसे बसे मी ६.३० वाजता भुतोंडे खिंडीत पोहचलो, व नंतर गाडीत बसून  वाजेघर ला पोहचलो, तेथे जेवण करून पुण्याकडे प्रस्थान केले.

       या मोहिमेत डॉ.अजय इंगळे , राहुल नलावडे, रवींद्र थोपटे, तानाजी राजगुडे , रवी जांभुळकर , सुनील क्षीरसागर , रवी गाडे , श्रीकांत कुंभार , वरून पेडणेकर , कुमार बिडवे , आदेश ढवळे , भाऊसाहेब दाणे , गायकवाड , ऋषिकेश वांजळे,भिसे , राजेंद्र धुमाळ व मी सुशिल दुधाणे यांचा सहभाग होता.



       सकाळी ६.३० ला चालू केलेला ट्रेक सायंकाळी ६.३०  ला माझा पूर्ण झाला.जवळपास १२  किलोमीटर चे पदभ्रमण झाले, व मला १२ तास लागले.
     या  ट्रेकला जास्तीस्त जास्त सहा ते सात लागतात.
जर आपण हा ट्रेक  उन्हाळ्यात करणार असाल तर, आपल्याकडे कमीत कमी सात लिटर पाणी बरोबर असणे आवश्यक आहे.

Comments

  1. एवढा त्रास होऊनही धीर सोडला नाही हे खरच खऱ्या ट्रेकरचे लक्षण...मुख्य म्हणजे झालेला त्रास लपून न ठेवता सर्वांना सांगून नवीन ट्रेकर्स ना सांगितले व सावधान केले, शाबास...

    ReplyDelete
  2. सुंदर वर्णन,आम्हालाही ही परिक्रमा करायची आहे,आपण सोबत आलात तर सोन्याहून ही पिवळे अशी अवस्था होईल आमची
    लॉक डाऊन संपला की करू ही परिक्रमा

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर