सोलापुर चा भुइकोट

            सोलापूरच्‍या भुईकोट
            २१ फेब्रुवारी २०१९
   
            श्री.प्रभाकर स्वामी महाराज माझे आध्यात्मीक गुरू.गेली २२  वर्ष मी सोलापूर ला दरवर्षी,
 श्री.प्रभाकर स्वामी महाराज,


 सम्राट चौक सोलापूर येथे महाराजांच्या पुण्यतिथी  सोहळय़ाला आवर्जून उपस्थित राहतो.पण आजपर्यंत मी कधीही सोलापूर भुईकोट ला भेट दिली न्हवती, किंबहुना असे ही म्हणता येईल की मला या भुईकोट विषयी माहिती नसावी.असो पण मित्रांनो आज मला तो योग आला.सोलापूर एस.टी.स्थानकापासून अवघ्या ९०० मीटर अंतरावर हा भुईकोट आहे.प्रथम आपणास २५  रू नाममात्र प्रवेश फी भरून,
 प्रवेश करावा लागतो.


सकाळी ९ ते सायंकाळी ५  पर्यन्त प्रवेशाची वेळ आहे.सायंकाळी ५ नंतर प्रवेश दिला जात नाहि.

प्रवेश करताच आपणाला दोन तोफा दिसतात.


त्या पाहून तेथून लगेचच  माघारी फिरावे.व ज्या ठिकाणा हून आपण प्रवेश करतो ,

 त्याच्या डाव्या बाजूने एक दगडी पायऱ्यांची वाट चढून 


आपण तटबंदी असलेल्या बुरुजावरून गड फिरण्यास निघावे.तटबंदी अफलातून आहे.

पहिली तटबंदी साधारणता १५ फूट असावी.


दहा ते पंधरा फूट अंतर सोडून लगेचच दुसरी तट बंदी आहे, ही साधारणता पहिल्या तट बंदी पैक्षा पाच ते दहा फुटाने उंच आहे.

सम्पूर्ण तट बंदी वरून आपल्याला गड पद्श्रिणा  मारता येते.अफलातून अशी तट बंदी आहे.भुईकोट गडावर मी प्रथमच अशी दुहेरी तट बंदी पाहिली.राजगडावर सुवेळा  व संजीवनी माचीवर ही अशी दुहेरी चिलखत असलेली तटबंदी आढळते.एक किलो मिटर अंतराची ही तट बंदी आहे.संपूर्ण  गड फेरी अभ्यास पूर्ण करावयाचा  असल्यास दोन तास पुरेशा होतात.


     सिद्धरामेश्‍वरांच्या वास्तव्याने पुनित झालेली भूमी म्हणून सोलापूरचा गौरव होतो.आणि सार्थही आहे.ऐतिहासिकदृष्ट्या महत्व असलेल्या शहरातला हा भुईकोट गड  महाराष्ट्रातील प्राचीन दुर्गातील मानला जातो.आजही तो प्राचीन इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. सोलापूर शहराचे हे वैभव आहे.
    
         गडावर हेमाडपंथी अवशेष आढळतात.


 त्या काली  गडावर  तीनशे घरे असावी . उत्तरेच्या भिंतीत बुजलेले देऊळ आढळते.

 त्याचे उत्खनन १९१९ साली झाले व ते चालुक्य देवालय असल्याचे कळले. तेथे हिंदू स्थापत्यकलेची ओळख सांगणारी शिल्पे कोरलेली दिसतात.


सोलापूरचा भुईकोट म्हणजे तर दुर्गबांधणीतले एक बुलंद असे रूप आहे.

 विजापूर, बेळगाव, मिरज, बिदर, नळदुर्ग, औसा, परंडा या दुर्ग साखळीतील  हा एक जणू भक्कम बुरूजच आहे.
दुहेरी तटबंदी, त्याभोवती खंदक आणि खंदकानंतर पुन्हा तट, अशी चिलखती रचना असलेला हा एक भक्कम कोट!

 अशा या गडात शिरण्यासाठी उत्तरेकडून मूळ मार्ग होता. 

मात्र आज तो बंद केल्याने पश्चिमेकडील नव्या मार्गानेच गडात दाखल व्हावे लागते. पहिला तट, मग खंदक आणि त्यानंतर ती दुहेरी तटबंदी ओलांडतच आत शिरायचे. आत शिरताना भुईकोटाच्या या अजस्र रूपाचेच मनावर दडपण येत असते. 

ते मुस्लीम दुर्गस्थापत्यातील भरभक्कम बुरूज, त्याच्यावरचे ते आक्रमक सज्जे, मारगिरीच्या जागा हे सारे इतिहासकाळाचे दडपण वाढवते. आत गेल्या गेल्याच समोरच ब्रिटिशांच्या दोन प्रचंड आकारांच्या तोफा आपले स्वागत करतात. या तोफा पाहातच ही बुलंद वास्तू पाहण्यास सुरुवात करायची.
     कोकणातून महाड मार्गे दक्षिणेत विजापूर, बिदरच्या दिशेने येणाऱ्या राजमार्गावर सोलापूर हा इतिहासकाळापासून एक महत्त्वाचा थांबा आहे. त्याच्या या महत्त्वामुळेच साधारणपणे चौदाव्या शतकात बहमनी राजवटीत सोलापुरात ही बुलंद वास्तू आकारास आली. पुढे त्यात आदिलशाही, निजामशाहीपासून ते थेट मराठय़ांपर्यंत अनेक राजवटींनी आपापल्या गरजा-सोयीनुसार बदल केले. आदिलशाही आणि निजामशाहीच्या तर अगदी सरहद्दीवर हा भुईकोट! यामुळेच या शाही फौजांमध्ये या गडावरूनच अनेकदा लढाया झाल्या. शेवटी लढाईचे मैदान ठरणारा हा गडच पुढे या दोन शाही राजवटींच्या मनोमिलनाचे स्थळही ठरला! साठ वर्षांचा संघर्ष थांबवत इसवी सन १५२३ मध्ये याच गडा त निजामशाह आणि आदिलशाहमध्ये मैत्रीचा तह झाला. या तहात आदिलशाहने आपली मुलगी मरिअमचा विवाह बुऱ्हाण निजामशाहशी लावला. पुढे १५५२मध्ये पुन्हा निजामशाहची कन्या चांदबिवी हिचा विवाह अली आदिलशाहबरोबर, तर आदिलशाहची कन्या हादिया सुलताना हिचा विवाह मूर्तझा निजामशाहबरोबर याच गडा त झाला. या शाही विवाहांनी तेव्हा हा गड  गाजला होता. पुढे दक्षिण मोहिमेवर आलेल्या औरंगजेबानेही हा गड  घेत काही काळ इथे मुक्काम ठोकला होता. यानंतर यथावकाश मराठय़ांचेही या गडा वर वर्चस्व प्रस्थापित झाले आणि शेवटी याच गडा ने १४ जून १८१८ रोजी मराठेशाहीचा शेवटही पाहिला! गतकाळातील हा सारा घटना-घडामोडींचा इतिहास लक्षात घेतला, की हे तटबुरूजही आपल्याला सहाशे वर्षे मागे घेऊन जातात आणि मग या चिऱ्यांनाही एक अर्थ प्राप्त होतो.
      या गडाला दुर्ग संर्वधनाची गरज आहे.

केंद्र शासित पुरातत्व खात्या कडे हा गड आहे.जर हा गड दुर्ग संर्वधन केला तर , अनेक दुर्ग प्रेमी या ठिकाणी भेट देऊ शकतात, याची मला खात्री आहे.या दुर्ग संर्वधनाची माहिती मी तेथील पुरातन खात्याचे असिस्टंट श्री.एच.जे.दसरे साहेबांची आवर्जून भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर दहा मिनिटे चर्चा केली.सोलापूर  भागातील कोणी  दुर्ग संर्वधन करणारी संस्था असल्यास किंवा इतरही संस्थांनी या कार्यात हातभार लावावा.जेणेकरून हा अपरिचित गड सर्व दुर्गप्रेमीच्या नजरेस येईल.तसेच गेली पन्नास वर्षांपासून श्री.विठ्ठल नुणे या ठिकाणी मंदिराची विना मोबदला सेवा करीत आहे.

Comments

  1. सर छानच, मी आत्ताच डॉ जी बी शाह यांचा सोलापूरचा किल्ला वाचत होतो🙏⛰️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर