भटकंती अपरिचित मानाई मंदिराची
भटकंती आडवाटेवरच्या अपरिचित श्री.मानुबाई माता(मानाई)मंदिराची
जय शिवराय,
नेहमीप्रमाणे आज ही हटके व अपरिचित अशी भटकंती करण्यासाठी मी सुशिल दुधाणे व अतुल हरगुडकर हिंगने खुर्द सिंहगड रोड,पुणे येथून चारचाकी वाहनाने बंगलोर हाईवेच्या च्या दिशेने प्रवासास सुरुवात केली.चेलाडी फाटा येथे आमचे मित्र रवी गाडे यांना घेउन देगाव फाट्या पासुन आत कांबरे गावाच्या दिशेने निघालो, देगाव,नायगाव या मार्गाने कांबरे या गावापासून पुढे शिंदे वस्ती फाट्याच्या पुढे ५०० मिटरवर पवार वस्ती येथे सकाळी ८ वाजता ३६ किलोमीटर चा चारचाकी वाहनाचा प्रवास करुन पोहचलो.पवार वस्तीची स.स.पासुनची उंची ७०० मी.(२२९६ फुट)आहे.तसेच ही वस्ती ता.भोर, जि.पुणे या हद्दीत येते. येथेच गाडी पार्क करुन लगेचच,
पद्भ्रमण सुरु केले.
रवी गाडे या ठिकाणी दोन-तिन वेळेला येउन गेल्यामुळे त्यांना वाट माहित असल्याने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल सुरु केली. सुरुवातीपासूनच खढी चढण सुरु झाली, आज वातावरण अगदी स्वच्छ होते.सुर्यदेवता ढगांच्या मागे लपुन बसले असल्याने उन्हाची झळ बसत न्हवती.साधारणतः वीस मिनिटांची चढण चढून आम्ही पहिल्या चढाच्या माथ्यावर जवळपास ७७७ मी.(२५४९ फुट) स.स.पासुन उंची असलेल्या ठिकाणी पोहचलो.म्हणजे पवार वस्ती येथून ७७ मी.चा चढ पार केला.
येथून पुढे सपाटीची वाट सुरु झाली,
खाली उजव्या बाजुला दुरवर गिरेवाडी नजरेस पडते.थोडे फार सपाटीवरुन चालल्यावर पुन्हा एकदा चढण सुरु झाली ,जवळपास पवार वस्ती पासुन १.५१ किलोमीटर व ३५ मिनिटांचे पद्भ्रमण करुन ८२६ मी.उंचीवर दुसरा टप्पा पार करुन माथ्यावर पोहचलो. येथून पुढची वाटचाल सपाटीवरुन सुरु झाली.
येथून पुढे नजरेच्या समोरच्या बाजुला लाळराशीची डोंगर रांग दिसते,
डोंगराकडे न जाता,उजवीकडे जाणाऱ्या वाटेने पुढे निघावे.उजवीकडील वाटेने वाटचाल सुरु ठेवावी. येथून पुढे अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात आपण पवार वस्ती पासुन एक तासांचे पद्भ्रमण व ३.२६ किलोमीटर पार करुन आपण ,
श्री.मानूबाई माता (मानाई ) मंदिरापाशी पोहचतो.
हे ठिकाण स.स.पासुन ८४४ मी.(२७६८ फुट) उंचीवर आहे.ज्या ठिकाणाहुन (पवार वस्ती) आपण पद्भ्रमण सुरु केले त्या ठिकाणाहुन येथे १४४ मी.(४७२ फुट) चढण पार करुन पोहचतो. हे ठिकाण दुरकर वाडी (ता.पुरंदर,जि.पुणे) या हद्दीत येते.
मंदीर खुप जुने आहे,
किती वर्षापूर्वीचे आहे हे सांगता येणार नाही.स्थानिक लोकांच्या माहितीनुसार त्यांच्या पंजोबा- खापर पंजोबा पासुन मंदीर आहे.
मंदिराची अंतर्गत रचना पाहुन असे जाणवते की हे खुप प्राचीन मंदीर असावे.
अंतर्गत भागाची रचना पाहता हेमाडपंथी पद्धतीचा कळस म्हणजे एकावर एक दगडी रचून तयार केल्याचे जाणवते.
मंदिराचा जीर्णोद्धार झाला असावा असे वाटते, आत मधील गाभार्याच्या कळसाचे प्लास्टर केलेले दिसून येते.असे माझे मत आहे, मी ठामपणे सांगू शकत नाही, माझा तसा तर्क असू शकतो.मंदिराच्या आवारात मोठा सभामंडप आहे.या येथे आम्ही अल्पोपहार घेतला.संपूर्ण मंदीर परिसर फिरलो, मंदिराच्या बाजुलाच मोठा पाण्याचा स्त्रोत्र आहे, हे पाणी मंदिराच्या बाजुने मानाई कड्याचे येथे जाते.पावसाळ्यात या ठिकाणाहुन पुढे छोटे-मोठे धबधबे वाहत असतात.दुरकर वस्ती येथे फेरफटका मारून आलो.दुरकर वस्ती ही जवळपास १५० ते २०० घरांची वस्ती आहे.
आपणाला जर फक्त या मंदिरात यायचे असेल तर आपण थेट गाडीने कासुर्डे खेबा येथून मठवाडी मार्गे दुरकर वाडी येथे येऊ शकता.हे अंतर कासुर्डे पासुन जवळपास ८ ते १० किलोमीटर भरते.
जर आपणास ट्रेक करायचा असल्यास पवार वस्ती पासुन ट्रेक करित येथे यावे.
स्थनिक लोकांच्या म्हणण्यानुसार खरे मंदीर हे पुर्वी येथून पुढे जो मानाई कडा आहे,त्या ठिकाणी होते.आम्ही हे ठिकाण पाहण्यासाठी गेलो.खुप मोठा कडा या ठिकाणी आम्हाला पहावयास मिळाला.
व्हॅली उतरून खाली जाणे
तसे अवघड आहे, तरी पण आम्ही कसे-बसे खाली उतरुन ,
कड्या च्या मध्यभागी पोहचलो.
या ठिकाणी पाण्याचा डोह मोठा आहे, याच ठिकाणी लाल रंगाच्या दगडाला खुणा केलेल्या काही दगडी आमच्या नजरेस पडल्या.याच ठिकाणी देवीचे मुळ ठाणे असावे,
असे स्थनिक लोक सांगतात.आम्ही ज्या ठिकानापर्यत पोहचलो होतो, त्याच्या खाली जवळपास पन्नास ते साठ फुटाचा मोठा डोह होता, त्या ठिकाणी खाली जाता आले नाही, तेथेच खाली कपारित हे मुळ स्थान असावे.तेथे दर्शन घेउन आम्ही पुन्हा थोडा चढ चढून वरती आलो.त्यानंतर आल्या वाटेने परत पवार वस्ती येथे येउन -जाऊन
सव्वा तिन तास व ६.८१ किलोमीटर चे पद्भ्रमण करुन ट्रेकची सांगता केली.
अश्या पद्धतीने थोडा हटके स्वरुपाचा व अपरिचित असा ट्रेक यशस्वीपणे पुर्ण केला.
पवार वस्ती पासुन पुढे आम्ही कांबरे या गावी ,
कांबरेश्वर या प्राचीन मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
या येथे शंकराची पिंड आहे.
दर्शन घेउन पुढे देगाव-नायगाव हे जलाशय पाहण्यासाठी कोंढाळकर वस्ती येथे पोहचलो.जलाशय पाहुन पुण्याकडे मार्गस्थ झालो.
आजच्या मोहिमेत अतुल हरगुडकर, रवी गाडे व मी सुशिल दुधाणे यांचा विशेष सहभाग होता.
Superb
ReplyDeleteधन्यवाद
Delete