घेवडेश्वर डोंगर

             भटकंती घेवडेश्वर डोंगर
   ता :   भोर 
   जि :   पुणे 
   मार्ग : पुणे -भोर -शिंद-नांद-
            महुडे.
   

      जर आपण पुण्याहून आपल्या खाजगी वाहनाने येणार असाल तर भोर एस.टी.स्टँड च्या अगोदर भोलावडे येथील पेट्रोल पंप च्या उजवीकडून शिंद गावाच्या रोड ने निघावे.शिंद , नांद , ब्राम्हणघर , माळवाडी ही गावे ओलांडून महुडे या गावी पोहचावे.या गावातून च पुढे एक दगडी बांधकामातील पाण्याची टाकी लागते , तेथून उजवीकडे सिमेंट रोड ने चढण चालू होते , त्या रोड ने वर निघावे.चार चाकी वाहन वर नेऊ नये.पुढे जवळपास एक किलोमीटर चा मातीचा रस्ता आहे.फ़क्त टू व्हीलर गाडी जाऊ शकते.वरती एक धनगर वस्ती वर  घर आहे तेथे टू व्हीलर गाडी पार्क  करून,

 पदभ्रमण सुरू करावे.


सुरुवातीपासूनच खड़ी चढण सुरू होते.नागमोडी वळणे घेत आपण चालत राहतो.चढण खूप असल्याने दमछाक होते.

चालताना उन नसले तरी घामाच्या धारा वाहत होत्या.


मध्यभागी पोहचल्यावर पावसाने क्रूपा केली.प्रचंड पाऊस चालू झाला.

घामाच्या धारा बंद होऊन , पावसाच्या पाण्याने अंग ओलेचीम्ब झाले.

अडीच किलोमिटर चे पदभ्रमण करून व दीड तास अंतर पार करून आम्ही डोंगरावर असलेल्या ,

प्राचीन हेमाडपंथी शंकर मंदिराजवळ पोहचलो.


येथे धनगर वस्ती ची तीन घरे आहेत.पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही येथुन वरती उंचावर असलेल्या डोंगराच्या माथ्यावर पंधरा ते वीस मिनिटे चालून पोहचलो.येथुन बरेचसे गड आपल्या नजरेस पडतात.परंतु आम्हाला काही दिसले नाहि , पाऊस असल्याने धुके खूप होते.माथ्यावर पाच मिनिटे थांबून परतीची वाट पकडून डोंगर पायउतार झालो.

उतरताना खूप काळजीपुर्वक उतरावे लागले.पाऊस जास्त झाल्याने चिखल खूप झाला होता.

तास-सव्वा तासात आम्ही खाली पोहचलो व टू व्हीलर गाडीने भोर कडे प्रस्थान केले.

शिंद गावात वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या प्रतिमेस वंदन करून पुढे निघालो.


आज माझ्या बरोबर माझे भोर येथील मित्र रवी गाडे


 बरोबर होते.

तसेच शिंद येथील मोहिते शिक्षक व त्यांचा पुतण्या शिवराज वय वर्ष ८,


ही आमच्या बरोबर या मोहिमेत सहभागी होते.
      घेवडेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी आपणाला भोर पासून १० किलोमीटर असलेल्या महुडे या गावी जावे.
   उंच डोंगरावर असलेल्या प्राचीन श्री क्षेत्र घेवडेश्वर(मु-हा) येथील  ठिकाणाहून अनेक गड -किल्ल्यांचे दर्शन होते , यामध्ये राजगड, तोरणा, रायगड, पुरंदर, रोहिडेश्वर, रायरेश्वर हे किल्ले दिसतात. तसेच भोर तालुक्यातील भाटघर व देवघर धरणे एकाच ठिकाणाहून पाहता येतात. वेळवंडचे संपूर्ण खोरे या ठिकाणाहून दिसते,  तसेच संपूर्ण भोर व म्हसर बु. व खुर्द परिसर व महुडे खोरे स्पष्ट दिसते. या सर्व कारणांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे किल्ला बांधायचे योजिले होते.

  घेवडेश्वर हे सह्याद्री डोंगररांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे.या पठारा वरील घेवडेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन आहे. हिंदवी स्वराज स्थापनेचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षापासुनच या भागातुन घोडदौड सुरू केली. या खो-यातुन स्वराज्याची सुरवात केली होती. त्यामुळे या खो-याला मंदिराला मराठा रियासतीच्या इतिहासात याला खूप पवित्र स्थान आहे.
     घेवडेश्वर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून या पठाराचा विस्तार खुप मोठा आहे. घेवडेश्वर मंदिराजवळ असलेल्या टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते. तसेच रायरेश्वर, केंजळगड, कमळगड, विचित्रगड व मकरंदगड दिसतात. येथे ५-७ विविध रंगाची माती आढळते. पश्चिमेकडे नाखिंदा टोक म्हणजेच नाकेखिंडीचे रोमांच उभे करणारे दृश्य पहावयास मिळते.

*भौगोलिक स्थान*
    घेवडेश्वर पठार भोरपासून १०  किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दर्‍या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट, यांमुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.

*इतिहास*
    याच घेवडेश्वराच्या डोंगरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील शिवकालीन महादेवाचे सुंदर प्राचीन मंदीर आहे.

घेवडेश्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. घेवडेश्वराचे पठार हे ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतूत पाहण्यासारखे असते. घेवडेश्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर आहे.पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुरंदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.
     या घेवडेश्वरावरील सर्वात महत्वाचे व आकर्षक भौगोलीक वारसा आसलेले स्थळ व वर्षारूतुतील पर्यटनाचा मानबिंदु ऊलट दिशेने वाहनारा धबधबा ज्याला "वारझोत" या स्थानीक नावाने ओळख आहे.
     निसर्गाची कीमया ती काय पहा घेवडेश्वराच्या दक्षीणेस असलेला सुमारे ५०० ते ६०० मी. उंचीवरून पडनारा धबधबा जो दक्षीणेकडूण अती वेगाने वाहना-या  वेगाणे ऊलट दिशेने गुरूत्वाकर्षणाच्या नियमाला डावलुन खाली न पडता वा-याच्या वेगाने पुन्हा  वरील बाजुस पाण्याचे तुषार ऊडवताना आपणास पहावयास मीळतो. असे हे नयनरम्य द्रुष्य डोळ्यांत साठवुन ठेवावेसे वाटते.
    या ठिकाणच्या "वारझोती" बद्दल काही काल्पनीक कथाही सांगीतल्या जातात.
     'सांगीतल जात की याठीकाणी काही गुराखी आपली जनावरे गाई- बकरी चरण्या साठी घेऊन गेले असताना त्याने त्या ठीकाणाहुण वाळलेल्या शेणाचा तुकडा टेकडीवरून खाली टाकला तेव्हा तो खाली न पडता परत वर आला परत त्याने आपल्या हातातील काठी खाली टाकली  ती पण वर आली वरील क्रुती त्याने घोंगडी तसेच गाईच्या वासरावर करून पाहीली ते पण पुन्हा वर आले नंतर त्याने स्वत: ऊडी मारायचे ठरवले व त्याने तसे केलेही परंतु तो वर नाही आला व तेथुन पडून त्याचा म्रुत्यु झाला.
    या मागील शास्रीय कारण हे असावे की वा-याच्या ऊलट जोरात वाहना-या गतीमुळे पहील्या वस्तु वर आल्या असाव्यात आणि गुराख्याने जेव्हा ऊडी मारली तेव्हा वा-याचा वेग कमी आसावा.
   असो पण अशा या प्रेक्षणीय स्थळाला व शिवकालीन वारसा लाभलेल्या शंभुमहादेवाच्या दर्शनाला तसेच घेवडेश्वराला आवश्य भेट द्या.याला काही जण घेवडेश्वर गड म्हणूनही संबोधतात , परंतु गडाचे कोणतेही अवशेष येथे नाहीत , त्यामुळे याला गड म्हणने मनाला पटत नाहि.
     सदर भटकंती १ नोव्हेंबर २०१९ रोजी केलेली आहे.

या भटकंती मधे मी सुशिल दुधाणे व रवी गाडे दोघांचा समावेश होता.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर