अभ्यास मोहीम...भटकंती ऐतिहासीक वारसा लाभलेल्या शिवापूर येथील प्राचीन मंदिरांची

अभ्यास मोहीम...भटकंती  ऐतिहासीक वारसा लाभलेल्या शिवापूर येथील प्राचीन मंदिरांची 
                  १४  मार्च २०१९

      आजची भटकंती....ही खऱ्या अर्थाने सार्थकी लागली.अचानक बेत ठरला, रायबा यांच्या कडे तुषार दिघे हे आले होते , त्यांच्याशी गप्पा मारत असताना अचानक, त्यांनी विषय काढला की आमच्या गावात बरीच मंदिरे आहेत, त्यांची माहिती आपण सर्व सामान्य जनतेपर्यंत व सह्याद्रीत भटकंती करणाऱ्या प्रत्येक भटक्या मंडळी पर्यंत पर्यत पोहचवू . जेणेकरून  अंधाराकडून..प्रकाशाकडे  नेणाऱ्या या वास्तू विषयी जनमानसात याची ख्याती व्हावी. या भागात  असलेले रांजेश्वर, नागेश्वर मंदीर , विष्णू मंदीर, व त्याठिकाणी असलेल्या बाबाजी भिकाजी गुजर यांचा वाडा आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. ही सर्व ऐतिहासिक,धार्मिक ठिकाणे  पाहण्यासाठी आम्ही राहुल नलावडे, तुषार दिघे व मी सुशिल दुधाणे निघालो शिवापूर गावाच्या दिशेने.शिवापूर गावाला खुप महत्व आहे.पूर्वी या भागाला बाग म्हणून ओळखले जायचे.पुण्यातील लाल महाल बांधण्याच्या अगोदर छत्रपती  शिवाजी महाराज व जिजाऊ माता याच शिवापूर बागेत राहत असे.कात्रज च्या पुढे  अवघ्या १७  किलोमीटर अंतरावर असलेल्या,

रांजेश्वर  ( ता.भोर.जि.पुणे ) येथे पोहचलो.
मंदिराचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे

मंदीर खूपच छान आहे.
या मंदिराची रचना पाहता बनेश्वर मंदीर नसरापूर ची आठवण आल्या शिवाय राहत नाहि.

मंदीराची कलाकुसर खूपच वाखाणन्या सारखी आहे ,या परिसरातिल कुंड 
         रांजेश्वर मंदीर  पाहून झाल्यावर बाजूलाच असलेल्या विष्णू मंदीरात आम्ही  गेलो.
       विष्णू मंदीर पाहुन,मंदिराच्या परिसरातच  बाबाजी भिकाजी गुजर यांचा अंदाजे एक ते दीड एकरात असलेला वाडा पाहिला.

वाडा तीन मजली असावा, अशी शक्यता येथील बांधकाम पाहिल्यावर होते.
आज मीतीस येथे ' आनंद आश्रम ' आहे. 
          २८ जानेवारी १६४५ रोजी 
शिवरायांनी रांझ्याचा पाटिल  बाबाजी भिकाजी गुजर याचे, त्याने बद-अमल केला, म्हणून दोन्ही  हात, व दोन्ही  पाय कापून काढले व त्याची पिढीजात पाटिलकी जप्त केली.स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली.

      वाडा पाहून आम्ही  खुलेश्वर मंदिरा कडे धाव घेतली.मंदीर खूपच छान आहे.
   खुलेश्वर मंदिराच्या  जवळ बाबाजी कोंडे देशमुख यांची समाधी आहे,
     तसेच या ठिकाणी एक मोठा नंदादीप आहे, या नंदादिप च्या आतुन वरपर्यंत जायला चक्राकार पद्धतीचा पायरी मार्ग आहे.

        खुलेश्वर मंदीर पाहुन आम्ही खेड शिवापूर येथील श्रीरामनगर नागेश्वर मंदीर पाहण्यासाठी निघालो.

      नागेश्वर हे मंदीर हेमांड पंथी असावे, असे  येथील बांधकामांवरून वाटते.

    मंदिराच्या आवारात आम्हाला काही वीरगळ नजरेस पडल्या.
        राहुल(रायबा) ने आम्हाला या वीरगळ विषयी माहिती दिली.

      तसेच या मंदीर परिसरात एक शिलालेख ही आहे.
       या सर्व अपरिचित स्थळांना आम्ही भेटी देऊन परतीच्या प्रवासास निघालो.
     आपण प्रत्येकाने या स्थळांना अवश्य भेट द्यावी.आमच्या दृष्टीने हे अपरिचित ठिकाण आहे , काही जणांनी  ही ठिकाणी पाहिली ही असतील,परंतु बऱ्याच जणांनी कदाचीत या ठिकाणांना भेट दिली नसावी, असे आम्हाला वाटते.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

वाल्मिकी डोंगर/सात रांजण

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर