भटकंती गणेशदुर्ग भुइकोट ची
गणेशदुर्ग किल्ला
किल्ल्याचा प्रकार: भुईकोट
तालुका : मिरज
जिल्हा : सांगली
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हे देखील संस्थान होते.कृष्णेकाठी वसलेले सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.१८०१ साली चिंतामणरावांनी सांगली संस्थान स्थापन केलं तरी सुरुवातीची त्यांची काही वर्षे, धोंडजी वाघाबरोबरची आणि करवीरकरांविरुद्ध चाललेल्या युद्धातच गेली. नंतर त्यांनी सांगली गावाच्या संरक्षणासाठी सुप्रसिद्ध गणेशदुर्ग बांधला. चारी बाजूंनी खंदक असलेला हा भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीचे एक वैशिष्ट्यच ! किल्ल्याचे बरेचशे भाग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले असले तरीही तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे.पटवर्धन घराणे परम गणेशभक्त. संरक्षणासाठी गणेशदुर्ग बांधल्यावर पूजेसाठी देऊळ हवंच, म्हणून १८११ साली चिंतामणरावांनी सांगलीचं भूषण ठरणारं गणपती मंदिर बांधायला घेतलं. त्याचं काम तब्बल तीस वर्ष चालू होतं.याच गणेशदुर्गाच्या तुरुंगातून खंदकात उड्या टाकून स्वातंत्र्यसंग्रामात वसंतदादा पाटील यांनी ऐतिहासिक पलायन केलं होतं.
गणेश दुर्ग हा भुईकोट किल्ला आहे.
आपण सांगली मधे गेलात तर सांगली नगरपालिका च्या मागे दरबार आहे , तेथेच हा भुईकोट किल्ला आहे.गणेश दुर्ग नावाने या भुईकोट किल्ल्याला या भागातील लोकं ओळखत नाहि.राजवाडा म्हणूणच हा प्रसिद्ध आहे.गडाच्या आत मधे कोर्ट आहे.हे कोर्ट आता काही वर्षातच विजयनगर येथे स्थलांतरित होत आहे.ही संपूर्ण जागा पटवर्धन संस्थान च्या अधिपत्याखाली आहे.प्रवेशद्वार अतिशय सुंदर आहे,
या येथील दरवाज्यांवरची कलाकुसर पाहण्यासारखी आहे.
प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला जेल आहे.या ठिकाणी कैद्यांना ठेवले जाते.जेल च्या आतमधे सुद्धा भुईकोट चे काही अवशेष आहेत.परंतु जेल असल्यामुळे आपल्याला आत मधे जाण्यास परवानगी मिळत नाहि.
प्रवेश द्वाराच्या मध्यभागी दरबार हॉल आहे.
आत मधे पटवर्धनांचा जुना वाडा , आजही चांगल्या अवस्थेत आहे.सागवानी लाकडामधे बांधकाम आहे.कलाकुसर अतिशय सुंदर आहे.तसेच आत मधे गणपतीचे मंदिर ही आहे.
हॉल च्या बाहेर दोन जुन्या तोफा दिमाखात उभ्या आहेत.
हॉल च्या डाव्या बाजूने पुढे गेल्यावर वस्तु संग्रहालय आहे.
दर सोमवारी हे बंद असते, त्यामुळे मला आज ते बघता आले नाहि.
संपूर्ण गडाची तटबंदी अजुन ही साबूत आहे.
तर समस्त भटक्यांनी आपण सांगलीत आलात तर या ठिकाणी अवश्य भेट दया.
मी या ठिकाणी २४ फेब्रुवारी २०२० रोजी भेट दिली होती.
















Comments
Post a Comment